You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात दिवसभरात 394 नवे रुग्ण, 18 मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 6817वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय - उदय सामंत, ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही

    राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

  2. 24 तासांमध्ये कोव्हिडचे 1752 रुग्ण, 37 जणांचा मृत्यू

    देशात गेल्या 24 तासांमध्ये कोव्हिडचे 1752 रुग्ण आढळले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  3. विनय दुबेच्या कोठडीत वाढ

    14 एप्रिल रोजी वांद्रे येथे लोकांना जमवल्याबद्दल पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या विनय दुबेच्या कोठडीची मुदत 28 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

  4. भारतीय राजदुतांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

    चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी चीनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली.

  5. सांगा आता काय करावं ?

  6. कोरोना झालेल्या आईला जेव्हा तिचं बाळ पहिल्यांदा पाहातं

  7. 'संपूर्ण देश कोव्हिडविरोधात लढत असताना काँग्रेस मात्र सरकारविरोधात लढत आहे'

    'संपूर्ण देश कोव्हिडविरोधात लढत असताना काँग्रेस मात्र सरकारविरोधात लढत आहे' असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर कधीतरी प्रश्नचिन्ह निर्माण होईलच आणि तेव्हा त्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, असंही जावडेकर म्हणाले.

  8. राजकोटच्या उद्योजकाने बनवला 1 लाख रुपयांचा व्हेंटिलेटर

  9. ठाणे पोलिसांप्रती कलाकारांनी व्यक्त केला आदर

  10. 15 जिल्हयांमध्ये 28 दिवसांपासून एकही रुग्ण नाही

    गेल्या 28 दिवसांमध्ये देशातील 15 जिल्हयांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. तर 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही- लव अग्रवाल

  11. गेल्या 24 तासांमध्ये 1684 रुग्ण

    गेल्या 24 तासांमध्ये देशात 1684 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील एकूण कोव्हिड रुग्णांची संख्या 23,077 वर गेल्याचे त्यांनी सांगितले

  12. राज्याने केलेल्या मागण्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता- राजेश टोपे

  13. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेला सुुुरुवात

  14. रमजानच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळा- ओवेसी

    रमजानच्या काळात लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केले आहे.

  15. जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?, पाहा व्हीडिओ-

  16. दिल्ली प्राणीसंग्रहालयात वाघिणीचा मृत्यू

    दिल्ली प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या वाघिणीची आता कोरोना चाचणीसुद्धा होणार आहे.

  17. लॉकडाऊनने भारतातल्या स्थलांतरित गरीबांचे कसे केले हाल?

  18. पालघर प्रकरणाचा तपास एनआयएकडून व्हावा- याचिका

    लॉकडाऊनच्या काळात पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास एनआयएकडून व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

  19. लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेशमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

  20. 'लॉकडाऊनमध्ये वसतीगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करा'

    मुंबई विद्यापीठात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे.

    " मुंबई विद्यापीठात वसतीगृहात राहुन शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण तथा कनिष्ठ उत्त्पन्न गटाची पार्श्वभूमी असणारे आहेत. खाण्याकरिता/आपात्कालीन खर्चाकरिता सदर विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

    सदर विद्यार्थ्यांचे पालक सध्याच्या परिस्थितीत पैसे पुरविण्यास असमर्थ असल्यामुळे या आणीबाणीच्या परिस्थितीत विद्यापीठाने वसतीगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे", अशी मागणी छात्रभारतीने पत्राद्वारे कुलगुरुंकडे केला.