You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात दिवसभरात 394 नवे रुग्ण, 18 मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 6817वर
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
कोरोना रुग्णांना पोटावर का झोपवतात?
कोरोना लस कधी येणार?
प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाग्रस्तांना फायदा नाही - एम्स हॉस्पिटल
कोव्हिड-19 आजारावर सध्या जगभरात उपचार कोणकोणते सुरू आहेत?
एप्रिल 25 चे अपडेट्स पाहण्यासाठी...
तुम्हाला माहितीय, आम्ही दररोज जगभरातले सर्व महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये अपडेट करत असतो.
यापुढचे, म्हणजेच एप्रिल 25 चे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
धन्यनाद.
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
1) आज राज्यात 117 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात 18 कोव्हिड रुग्णांचा आज मृत्यू झाला.
2) राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.3) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामध्ये कोव्हिडवर चर्चा झाली.
4) प्लाझ्मा थेरपी सुरु करण्याला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवल्याचे महाराष्ट्राचे आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आता हे लाइव्ह पेज येथेच थांबवत आहोत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपचार सुरू
जगात कोरोनाच्या लशीच्या चाचण्या सुरु तर चीनमध्ये पहिला प्रयोग अपयशी. डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोनाविरोधात लढण्याचा दिल्ला अजब सल्ला सांगतायत विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित
कोटा येथील विद्यार्थ्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्याच्या विनंतीला उत्तर
राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यावर महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरु असल्याचे उत्तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहे.
जपानमधील तज्ज्ञांना करोनामुळे नेमकी कशाची भीती वाटतेय?
राज्यात 117 रुग्ण घरी परतले
महराष्ट्रात कोव्हिड झालेले 117 रुग्ण आज पूर्ण बरे होऊन घरी परतले. आज राज्यात कोरोनाची लागण झालेले 394 नवे रुग्ण आढळले. तर राज्यात 18 रुग्णांचा आज मृत्यू झाला
महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजस्थानचे मुख्यमंत्र अशोक गेहलोत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल विविध विषयांवर चर्चा केली.
धारावीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण
धारावीमध्ये आज कोरोनाचे 6 नवे रुग्ण सापडले आहेत. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 220 वर गेली आहे. आजवर धारावीत कोरोनामुळे 14 जणांचे प्राण गेले आहेत.
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कोरोनाला हद्दपार करणार?
मुंबईच्या रस्त्यांवर आज कशी परिस्थिती आहे?
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 47 हजार स्थलांतरित मजुरांचे आरोग्य विभागाने केलं समुपदेशन
कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे 944 निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत.
तसेच त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत राज्यभर सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील 47 हजार स्थलांतरित मजूरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे.
त्याचबरोबर ज्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचेही समुपदेशन केले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी राजकोटच्या उद्योजकाने बनवला 1 लाख रुपयांमध्ये व्हेंटिलेटर