You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 778 नवे रुग्ण, एकूण संख्या 6427 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. चीनने कोरोनामुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी लपवली का?

  2. कोरोना संसर्ग रोखणाऱ्या सिंगापूरमध्ये स्थलांतरित मजूरांना कोव्हिडने कसं गाठलं?

  3. वाधवान कुटुंब राहाणार पोलिसांच्या नजरेसमोर

    लॉकडाऊन असताना महाबळेश्वरला आलेल्या वाधवान कुटुंबीयांना आता पोलिसांच्या नजरेत राहावं लागणार आहे.

    वाधवान कुटुंबीयांना हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारत पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्या महाबळेश्वर इथल्या घरी पाठवण्यात आले.

    वाधवान कुटुंबातील सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मिनी बसमधून त्यांना पाचगणीतून महाबळेश्वरला आणण्यात आले.

    सीबीआय न्यायालयाच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबीयांना 5 मे पर्यंत पुढील आदेश येईपर्यंत सातारा जिल्हा सोडता येणार नाही.

  4. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार खरंच वाईन शॉप्स सुरू केले तर...

  5. लॉकडाऊनमुळे जम्मूत अडकलेल्या पुण्याच्या ‘त्या’ तिघांना मुस्लीम कुटुंबाने दिला आश्रय

  6. बडोद्यातले 45 रुग्ण परतले घरी

    बडोद्यामधले 45 रुग्ण ठणठणीत बरे होऊन आज घरी गेले आहेत. या सर्व रुग्णांनी नव्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्लाझ्माही देऊ केला आहे.

  7. नागपूर कोरोना रेड झोनमध्ये

    नागपूरचा समावेश आता रेडझोनमध्ये करण्यात आला आहे. माहिती लपवणाऱ्या एका रुग्णामुळे 55 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तसेच अजूनही 144 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे.

  8. कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात फ्रंटलाईनवर लढणारे पोलीस, डॉक्टर आणि पत्रकार

  9. आईची आणि बाळाची अशी झाली भेट

    कोव्हिडने आजारी असलेल्या आईची आणि तिच्या नवजात बाळाची औरंगाबादमधील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अशी व्हीडिओमधून भेट घालून दिली. हे बाळ 18 एप्रिल रोजी जन्माला आले आहे.

  10. जितेंद्र आव्हाडांवर मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  11. , हा टीव्ही विकत घ्यायचाय का?🤔😉

  12. 3 मे रोजी रुग्णसंख्या, संसर्गात वाढ होईल याबद्दल सांगणे अवघड

    3 मे रोजी कोव्हिड रुग्णांच्या संख्येत उसळी, किंवा संसर्गात वाढ होईल का याचे उत्तर देणे अवघड असल्याचे मत आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

  13. नेपाळमधून संगमनेर येथे आलेल्या 14 पैकी 4 जणांना कोरोनाची लागण

    नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्तींपैकी 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर गेली आहे.

    4 एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

    दरम्यान, बुधवारी रात्री जामखेड येथील दोघा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्णाची दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

    आज त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

  14. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँक कसा उभा करते पैसा?

  15. 30 दिवसांच्या लॉकडाऊनचा फायदा

    गेल्या 30 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आपण देशामध्ये कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि तो रोखण्यासाठी प्रयत्न करता आले. त्याचप्रमाणे हा वेळ कोरोना रुग्णांची चाचणी आणि भविष्यातील तयारीसाठी वापरु शकलो आहोत. असं मत पर्यावरण सचिव सी. के. मिश्रा यांनी व्यक्त केले.

  16. यवतमाळमध्ये आणखी 7 जणांना कोरोनाची लागण, एकूण संख्या 13वर

    गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 13 वर पोहचली आहे.

    हे सातही जण पुर्वी दिसून आलेल्या कोव्हिड-19 रुग्णांच्या संपर्कात आले होते. तसेच यात काही जण त्यांच्या कुटुंबातीलसुद्धा आहेत.

    जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझिटिव्ह आढळत असल्याने या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ शहर शनिवार, रविवार आणि सोमवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

    जिल्ह्यात इतरत्र मात्र मर्यादीत वेळेनुसारच दुकाने सुरू राहतील, असे यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

  17. कोरोनाग्रस्तांचे मृतदेह रस्त्यांवर पडून- पाहा व्हीडीओ

  18. गेल्या 28 दिवसांत 12 जिल्ह्यात एकही नवा रुग्ण नाही

    गेल्या 28 दिवसांमध्ये देशातल्या 12 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही तर 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळला नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

  19. ट्रंप यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयामुळे भारतीयांचं अमेरिकन ड्रीम अपूर्ण राहणार?

  20. गेल्या 24 तासांत 1409 रुग्ण

    गेल्या 24 तासांत 1409 रुग्ण आढळले असून देशातील रुग्णांची संख्या 21,393 वर गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.