राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5649 वर, दिवसभरात 431 रुग्ण वाढले

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. अमेरिकेत ग्रीन कार्डवर 60 दिवसांसाठी निर्बंध- ट्रंप यांची घोषणा

    डोनाल्ड ट्रंप

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोनाच्या संकटामुळे देशांतर्गत वाढू शकणाऱ्या बेरोजगारीचा विचार करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी परदेशातून अमेरिकेत वास्तव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठीचे निर्बंध कठोर केले आहेत. ट्रंप यांनी इमिग्रेशनवर 60 दिवसांसाठी निर्बंध घातले आहेत.

    अमेरिकन अधिकारी परिस्थिचा आढावा घेऊन हे निर्बंध शिथिल करायचे की नाही, यासंबंधीचा निर्णय घेतील. अर्थात, हा निर्णय पूर्णपणे अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

    जे लोक अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा नियम लागू होईल. जे तात्पुरत्या कारणांमुळे अमेरिकेत येणार असतील, त्यांना हा नियम लागू होणार नाही.

    डोनाल्ड ट्रंप यांनी ग्रीन कार्डवर तात्पुरते निर्बंध लादण्याचं कारण स्पष्ट करताना म्हटलं आहे, की अमेरिकेला आधी आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी करणं भाग आहे.

    ट्रंप यांनी म्हटलं,“कोरोनाचा संसर्ग आणि त्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नात आतापर्यंत लाखो अमेरिकन नागरिकांनी रोजगार गमावला आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांना पुन्हा रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे अमेरिकन सरकारचं कर्तव्य आहे.”

  2. सुप्रभात

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    गुड मॉर्निंग, मंडळी! कसे आहात?

    आज बुधवार.तुम्ही घरातच आहात ना? घरीच राहा. काळजी घ्या.

    तुमच्यापर्यंत कोरोनाचे सर्व अपडेट्स आम्ही नियमितपणे पोहोचवत आहोतच. आजच्या या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत.

    सुरुवातीला आतापर्यंतच्या काही ठळक अपडेट्सवर नजर टाकू या... त्यावर...

    • महाराष्ट्रात कोरोनाचे 552 नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5218 वर पोहोचलीय.
    • भारतातील रुग्णांची एकूण संख्या 18 हजार 601 झालीय. भारतात आतापर्यंत 590 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
    • कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे.
    • केंद्राकडून 6 टीम स्थापन करून चार राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे अतिरिक्त सचिव या टीमचे नेतृत्त्व करत आहेत.
    • रॅपिड टेस्टिंग पुढच्या दोन दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश ICMRने सर्व राज्यांना दिले आहेत. किट्समध्ये काही चुका असल्यास तपास करून दोन दिवसांनी पुढील स्पष्ट आदेश देण्यात येतील.