राज्यातील रुग्णांची संख्या 5 हजारच्या पुढे, मुंबई-पुण्यात लॉकडाऊनच्या सवलती रद्द

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारताने FDI धोरण बदलल्यामुळे चीन नाराज, बीबीसी मॉनिटरिंग टीम

    भारताने आपल्या थेट परदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI विषयक धोरणांमध्ये बदल केलाय. चीनी कंपन्यांना भारतीय व्यापारी संस्थांमधला आपला हिस्सा वाढवता येऊ नये, अशी तरतूद करण्यासाठी पाऊल उचलण्यात आलंय.

    भारतातली गृहकर्ज देणारी सर्वात मोठी बिगर-बँकिंग संस्था असणाऱ्या - हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HDFC मध्ये चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने आपली भागीदारी काही दिवसांपूर्वी वाढवली. पीपल्स बँक ऑफ चायनाने आपला हिस्सा 0.8% वरून वाढवून 1.01% केला आहे.

    शी जिनपिंग

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, शी जिनपिंग

    थेट परदेशी गुंतवणूक धोरणांमध्ये करण्यात आलेल्या या बदलांविषयी चीनने अपेक्षेनुसार नाराजी व्यक्त केलीय. हा भेदभाव असल्याचं चीनने म्हटलंय.

    भारतामधल्या चीनच्या गुंतवणुकीमुळे भारताच्या औद्योगिक विकासाला नेहमीच प्रोत्साहन मिळत आलं असल्याचं भारतातल्या चिनी दूतावासाने म्हटलंय.

    चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते जी राँग यांनी एका ट्वीटद्वारे भारत सरकारला आवाहन केलंय. ते म्हणतात, "व्यापारातल्या या भेदभावात बदल करण्यात यावा आणि निष्पक्ष, पारदर्शक आणि समान संधी उपलब्ध असणाऱ्या व्यापारविषयक वातावरणाची निर्मिती करायला प्रोत्साहन देण्यात यावं."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    कोव्हिड-19मुळे भारतामध्ये सध्या चीनच्या विरोधात नूर आहे.

    भारताच्या थेट परदेशी गुंतवणूक धोरणांनुसार ज्या देशांच्या जमिनींच्या सीमा भारताला लागून आहेत ते देश जर भारतातल्या एखाद्या उद्योगात वा कंपनीत गुंतवणूक करत असतील तर त्यांना यासाठी भारत सरकारची परवनागी घेणं आवश्यक असेल. यापूर्वी हा नियम फक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या गुंतवणूकदारांना लागू होता. आता यामध्ये चीनचाही समावेश असेल.

    18 एप्रिलला भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. याच्या हवाल्याने द हिंदू वृत्तपत्राने 19 एप्रिलला दिलेल्या बातमीत म्हटलं होतं, "थेट परदेशी गुंतवणुकीच्या धोरणामध्ये करण्यात आलेल्या बदलांचा हेतू स्पष्ट आहे. कोणत्याही परदेशी गुंतवणूकदाराने कोव्हिड 19च्या साथीचा फायदा घेत कोणतीही भारतीय कंपनी विकत घेऊ नये वा तिचा ताबा घेऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत."

  2. लॉकडाऊन शिथील झालं आणि सलूनमध्ये उसळली गर्दी

    लॉकडाऊनमध्ये एक समस्या सर्वांनाच सतावतेय, ती म्हणजे वाढते केस!

    केस कापायला सलूनशिवाय पर्याय नाही आणि घरी हा प्रयोग करून पाहण्याची प्रत्येकाची हिंमत नाही.

    आणि ही परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर जिथेजिथे लॉकडाऊन सुरू आहे, तिथे पाहायला मिळते आहे.

    डेन्मार्कमध्येसुद्धा जवळपास महिनाभरानंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आलं, आणि लोकांनी.डोक्यावरच्या केसांचा भार हलका करण्यासाठी सलूनमध्ये गर्दी केली.

    "आमच्याकडे रीघ लागली आहे. पुढच्या दोन तासांसाठी बुकिंग फुल्ल आहे," असं फिल ओलँडर यांनी सांगितलं. ते फिल्स बार्बर चेनचे प्रमुख आहेत.

    कोरोना

    फोटो स्रोत, Reuters

    "पुढच्या तीन आठवड्यांकरता मी बिझी असेन. लय काम आहे. जराही फुरसतीचा वेळ मिळणार नाही," असं एका हेअरड्रेसरने सांगितलं.

    प्रत्येक ग्राहकाचे केस कापल्यानंतर आमची उपकरणं सॅनिटाईझ करायची आहेत. दुकान स्वच्छ करायचं आहे. ऑनलाईन व्यवहार असल्याने कार्ड्स सॅनिटाईझ करायची आहेत. ही अतिरिक्त कामं वाढली आहेत, असं सलून चालवणाऱ्या अनेकांनी सांगितलं.

    तरुण मंडळी सलूनमध्ये येऊन केस कापू लागली आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीला धोका लक्षात घेऊन ते बाहेर पडत नाहीयेत.

  3. देशभरात 24 तासात कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू

    कोरोनामुळे देशभरात गेल्या 24 तासात 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात 1336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

    देशातील कोरोनाबाधितांची संख्या 18, 601 इतकी झाली आहे. 3,252 जण बरे झाले आहेत.

    आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. कालचे अपडेट्स कुठे पाहायचे?

    चांगला प्रश्न आहे. आम्ही दररोज हा लाईव्ह ब्लॉग चालवतोय, जगभरातल्या मोठ्या घडामोडी यात पाहू शकता.

    काल दिवसभरात काय काय घडलं, ते पाहायचं असेल तर इथे क्लिक करा

  5. कच्च्या तेलाची भानगड नेमकी काय आहे?, सांगतीय अमृता दुर्वे अगदी सोप्या शब्दांत...

  6. ब्रेकिंग, अमेरिकेत प्रवेश बंद - ट्रंप

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

    "अदृश्य अशा शत्रूचा धोका लक्षात घेऊन तसंच अमेरिकेच्या नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्याच्या उद्देशाने मी लवकरच खास आदेश जारी करत आहे. यानुसार अन्य देशातील व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

    सध्या तरी तात्पुरत्या पातळीवर हा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

    अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं असून, गेल्या 24 तासात कोरोनाने 1,433 जणांचा मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. कोरोना लॉकडाऊनमुळे अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती गेल्या शून्याखाली

  8. मुंबईत महिला सारथीची गरजूंना फ्री राईड

    मुंबईतील ऑटो रिक्षा चालक शीतल सरोदे लॉकडाऊन काळात गरजू प्रवाशांकडून पैसे न घेता काम करत आहेत.

    "लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडल्यावर वाहन मिळणं अवघड आहे. मी माझा फोन नंबर दिलेला नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला तातडीने कुठे पोहोचणं आवश्यक असेल तर मी त्यांना सोडते", असं शीतल यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण

    राष्ट्रपती भवनात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. 125 कुटुंबांना आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार सावधानतेचा उपाय म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. सुप्रभात!

    गुड मॉर्निंग. कसे आहात?

    आज मंगळवार. तुम्ही घरातच आहात ना? घरीच राहा. काळजी घ्या.

    तुमच्यापर्यंत कोरोनाचे सर्व अपडेट्स आम्ही नियमितपणे पोहोचवत आहोतच. आजच्या या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत.

    सुरुवातीला आतापर्यंतच्या काही ठळक अपडेट्सवर नजर टाकू या... त्यावर...

    • कोरोना लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाच्या किमती आटल्या, ऐतिहासिक पडझड
    • जगभरात 24 लाख लोक कोरोनाबाधित, मृतांचा आकडा 1 लाख 67 हजारांवर तर 6 लाखांपेक्षा जास्त बरे झाले
    • देशात रुग्णांची संख्या 17 हजारावर गेली आहे
    • कालपर्यंत राज्यात 4,666 रुग्ण, 232 जणांचा मृत्यू
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 17 एप्रिल रोजी नियोजित अभियांत्रिकी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
    • मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट. या पत्रकारांबरोबर नियमितपणे संवाद साधताना संपर्कात असल्यामुळे सेल्फ क्वारंटाइनमध्ये जाण्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा निर्णय.

    मात्र तुम्ही जर अत्यावश्यक सेवांमध्ये असाल तरच बाहेर पडा, शक्यतोवर घरूनच काम करा. आणि नियमितपणेहात स्वच्छ धुवा.

    आणि हो, बीबीसी मराठीच्या या लाईव्ह ब्लॉगला शेअर नक्की करा, बरं का! :)