You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात 4666 कोरोनाग्रस्त, 232 जणांचा मृत्यू, 567 रुग्ण पूर्णपणे बरे
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
पोलीस आणि दुकानदारांमध्ये वाद आणि धक्काबुक्की
कोरोना व्हायरससंदर्भातील नियमावलींचे पालन करण्यास सांगणारे पोलीस आणि दुकानदार यांच्यात धक्काबुक्की होण्याची घटना पंजाबमध्ये घडली.
पत्रकारांनी काम करताना नियमांचे पालन करावे
पत्रकारांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचं मत आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ब्रेकिंग, मुंबईत 30 पत्रकारांना कोरोनाची लागण - आरोग्य मंंत्रालय
मुंबईत एकूण 30 पत्रकारांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पत्रकारांनी त्यांचं कर्तव्य बजावताना स्वतःची योग्य काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. तसंच ही घटना अत्यंत दुःखद असल्याचही त्यांनी म्हटलंय.
देशात कोरोनाचे एकूण 17,265 रुग्ण - आरोग्य मंत्रालय
गेल्या 24 तासांमध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला आहे.
2546 लोकांची तब्येत आता पूर्णपणे सुधारली आहे.
59 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांमध्ये एकही केस नाही.
18 राज्यांमध्ये रुग्णांची वाढ कमी झाली आहे.
लॉकडाऊनच्या नियमांबाबत केंद्राचे राज्यांना पत्र
लॉकडाऊनचे नियम स्वतःच्या स्तरावर शिथिल करू नका असं केंद्रानं राज्यांना पत्र पाठून स्पष्ट केलं आहे.
मुंबई आणि पुण्याचं सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सकारकडून विशेष पथक येणार आहे.
कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटातून मोदी सरकार भारताला कसं वाचवणार?
शांघायमधून वैद्यकीय मदत घेऊन विमान दिल्लीत दाखल
शांघायमधून वैद्यकीय मदत घेऊन विमान दिल्लीत दाखल झाले आहे. स्पाइसजेटने अशी देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय 430 उड्डाणे केली आहेत.
महाराष्ट्रासाठी 3 टीम हाॅटस्पाॅट असेसमेंट करणार
मुंबई आणि पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर. केंद्राने 6 इंटर मिनिस्टिरिअल टीम तयार केल्या.
महाराष्ट्रासाठी 3 टीम या हाॅटस्पाॅट असेसमेंट करणार आणि राज्यांना आवश्यक सूचना देणार व केंद्राला याबाबत रिपोर्ट देणार.
लाॅकडाऊन, अत्यावश्यक सुविधा, सोशल डिस्टंसिंग, आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेणार.
तो मुस्लीम आहे, पण कोरोनामुळे मरण पावलेल्या हिंदूंचेही अंत्यसंस्कार करतो
लोकसभा-राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांचे कामकाज सुरु करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारच्या तपासण्या करुनच कर्मचाऱ्यांना इमारतीमध्ये प्रवेश दिला जात आहे.
-पालघरमधील घटना धार्मिक कारणाने झालेली नाहीय, गैरसमजातून हा हल्ला झालाय
- नम्रपणे सांगतो, या प्रकरणातील सर्व आरोपी तुरुंगात आहेत.- मुख्यमंत्री
100 आरोपी अटकेत
- निर्जन आणि दुर्गम परिसरात कुट्ट काळोखात हे घडत असताना रात्री 12.30 वाजता आपले पोलीस तिथं गेले होते, काळोखात आरोपींचा शोध सुरू झाला, 17 तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी 100 पेक्षा जास्त आरोपी पकडले गेले आणि ते तुरुंगात आहेत
- 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावणी आलीय
- पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णींच्या नेतृत्त्वात शोध पथकही तयार केलंय, सीआयडी क्राईमकडे हे प्रकरण सोपवलंय
गैरसमजुतीमधून हल्ला
-पालघरमधील घटना 16 तारखेला घडली
गेल्या 5 वर्षात सुद्धा आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झाले, हे व्हायला नको
- हे साधू सरळ मार्गानं जाऊ शकत नाही म्हणून आडमार्गानं जात होते - लॉकडाऊन उठवल्यानंतर गडचिंचले गावात जाऊन बघा, हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे, एकप्रकारे हा पाडा आहे
- हे दोघे गुजरातमध्ये जात होते, तिथं त्यांना अडवलं गेलं, त्यामुळं परतत असताना गैरसमजुतीनं त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला
- या घटनेवेळी पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला.
सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, तर निर्बंध कायम राहतील-मुख्यमंत्री
रुतलेलं अर्थचक्रासाठी केवळ काही परवानग्या दिल्यात
- लॉकडाऊन उठवण्याचं आपल्याच हातात आहे, शिस्त पाळल्यास लॉकडाऊन लवकर उठेल
- सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, तर निर्बंध कायम राहतील
- महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्याला आज 6 आठवडे पूर्ण होत आहेत
'वर्क फ्रॉम होम' उत्तमरीत्या करण्यासाठी या 5 टिप्स नक्की वाचा
कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला बाळाला जन्म
पुण्यात 25 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती उत्तम असून, त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.
या महिलेला 16 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
बाळाला स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आल्याचं ससून हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4483
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोमवारी सकाळी अकरापर्यंत 4483 इतकी झाली आहे.
यामध्ये भिवंडी 1,कल्याण डोंबिवली 16,मीरा भाईंदर 7,बृहन्मुंबई 187,नागपूर 1,नवी मुंबई 9,पनवेल 6,पिंपरी चिंचवड 9,रायगड 2,सातारा 1,सोलापूर 1,ठाणे 21,वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
'आपला माणूसच व्हायरस घेऊन घरात आला तर...': कोरोनाशी लढणाऱ्यांच्या कुटुंबीयांना धास्ती
डिस्ने लाखभर कर्मचाऱ्यांचा पगार थांबवणार?
वॉल्ट डिस्ने कंपनी येत्या आठवड्यापासून लाखभर कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाही. कोरोनामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे.
जगातली सगळ्यात मोठी एंटरटेनमेंट कंपनी असा नावलौकिक असणाऱ्या डिस्ने कंपनीचे युरोप, अमेरिका आणि आशिया खंडांमध्ये थीम पार्क आणि हॉटेल्स आहेत.
लाखभर म्हणजे एकूण मनुष्यबळाच्या निम्म्या टक्के कर्मचाऱ्यांचे पगार खंडित केल्यामुळे डिस्ने कंपनीचे 500 मिलिअन डॉलर्स वाचतील असं फायन्नॅशियल टाईम्सने म्हटलं आहे.
2019च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये डिस्ने कंपनीने 1.4 बिलिअन डॉलर्स इतकी कमाई केली होती.
पगार स्थगित करण्यात येणार असला तरी सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळत राहतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी मदतीकरता अर्ज करावा असंही कंपनीने म्हटलं आहे.