You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात 4666 कोरोनाग्रस्त, 232 जणांचा मृत्यू, 567 रुग्ण पूर्णपणे बरे

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. 'मी व्हेंटिलेटर बंद करून लोकांना वेदनेतून मुक्त करते'

  2. पालघर मॉब लिचिंगची घटना अफवा पसरवल्यामुळेच- अनिल देशमुख

  3. सर्वांत ताजे अपडेट्स...

    हे लाईव्ह पेज इथे थांबवण्यात येत आहे.

    यानंतरचे सर्व ताजे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा - LIVE BLOG एप्रिल 21

  4. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

    आज दिवसभरात महाराष्ट्र आणि देशभरात विविध महत्त्वाच्या घटना घडल्या.

    1) मुंबईमध्ये पत्रकारांच्या करण्यात चाचणीमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

    2) कोरोना साथीच्या काळात पालघर जिल्ह्यात झालेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हमधून भूमिका स्पष्ट केली.

    3) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सेल्फ क्वारंटाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

    4) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱी 17 एप्रिलची अभियांत्रिकी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.याबरोबरच हे लाईव्ह पेज येथेच थांबवत आहोत.

  5. महाराष्ट्रात 75 हजार रॅपीड टेस्ट करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

    " महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील. "

    "मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे" आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.

    राजेश टोपे म्हणाले-• राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.

    • राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे 7 दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.

    • कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिंजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिंजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

    • हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मत्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा 60 वर्षांवरील आणि 15 वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.

    • काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

    • ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

  6. दिल्लीतल्या हॉटस्पॉटवर ड्रोनची नजर

  7. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा फेसबूकद्वारे लोकांशी संवाद

  8. कोरोनाचं संकट टळलं नाहीये, गाफील राहू नका असं उद्धव ठाकरे का म्हणाले?

    #CoronaPodcast : कोरोनाचं संकट टळलं नाहीये, गाफील राहू नका असं उद्धव ठाकरे का म्हणाले? पालघरमध्ये नेमकं काय घडलं? मुंबईत ३० पत्रकारांना कोरोनाची लागण याबद्दल सांगतायत विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित

  9. एमपीएससीतर्फे घेतली जाणारी 17 मेची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

    एमपीएससीतर्फे 17 मे रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे आयोगाने पत्रकाद्वारे कळवले आहे.

  10. कोव्हिड झालेला पत्रकार : ‘कोरोना झाल्याचं ऑफिसला सांगितल, त्यांची रिअॅक्शन फार थंड होती'

  11. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सेल्फ क्वारंटाईन

    कोरोना पाॅझिटीव्ह पत्रकारांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन,

    लवकरच टेस्ट करणार, किशोरी पेडणेकर यांची माहिती

  12. धारावीत 30 नवे रुग्ण

    धारावीतल्या रुग्णांची संख्या 168 वर गेली आहे.

  13. बेळगावात व्हायरल झालेल्या व्हीडियोतील नर्स आणि लेकीची पुन्हा गळाभेट

  14. काश्मीरवासी कसा करतायत कोरोनाचा सामना

  15. कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं नागरिकांवर लक्ष ठेवताहेत.

  16. महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण

    महाराष्ट्रात कोव्हिडचे 283 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आज सकाळपर्यंत 4483 वर गेली होती.

  17. केरळ, भिलवाडा, आग्रा पॅटर्नमधून महाराष्ट्रानं काय शिकायचं?

  18. हा कोणता व्हायरस आहे?

  19. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

    हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि पॅरासिटमॉलच्या गोळ्या दिल्याबद्दल अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

  20. मनरेगाच्या मजुरीत वाढ

    केंद्र सरकारने कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या मजुरीत सरासरी 20 रुपयांची वाढ केली आहे.