राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी 55 विशेष रुग्णालये, 6660 खाटांची उपलब्धता
राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढवून 55 करण्यात आली आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीत कोरोनाग्रस्तांसाठी 6660 खाटांची उपलब्धता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वी राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने 17 रुग्णालये त्यासाठी अधिसूचित केली आहेत. त्यामुळे रुग्णालयांची संख्या वाढून55 झाली आहे.
त्यामुळे पूर्वी घोषित केलेल्या 30 रुग्णालयातील 2305 खाटा आणि आताच्या ४३५५ खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, maharashtra dgipr
