रुग्णांना त्यांच्या धर्मानुसार
वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येत असल्याचा आरोप अहमदाबादमधील सिव्हिल
हॉस्पिटलवर करण्यात आला आहे.
12 एप्रिलपर्यंत सगळ्या रुग्णांना
एकाच वॉर्डमध्ये ठेवण्यात येत होतं. पण आता हिंदू आणि मुस्लीम रुग्णांना
वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे, असं इथल्या रुग्णांचं म्हणणं आहे.
12 एप्रिलच्या रात्री मुस्लीम
समुदायाच्या रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये जाण्यास सांगितलं आणि हिंदू समाजाच्या
रुग्णांना मात्र जुन्याच वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं, असं इथल्या एका रुग्णानं
बीबीसीला सांगितलं.
या हॉस्पिटलमधल्या C4 वॉर्डमध्ये फक्त मुस्लीम समाजाचे रुग्ण आहेत, असंही त्यांनी
सांगितलं.
पण, हॉस्पिटलचे मेडिकल सुपिरिटेंडंट डॉ. जी.एच.राठोड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.