राज्यात आज 232 नवे रुग्ण तर 295 बरे झाले, एकूण 2,916 बाधित
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
कोरोनाच्या संकटकाळात केरळकडून महाराष्ट्रानं काय शिकावं?
मुंबईमध्ये कोव्हिड-19 पॉझिटिव्ह पेशंटची आत्महत्या
मुंबईमध्ये कोव्हिड-19 पॉझिटिव्ह पेशंटनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये आज पहाटे चार वाजता ही घटना घडली.
28 वर्षीय कोव्हिड-19 पॉझिटिव्ह तरुणानं आत्महत्या केली असून या घटनेची पोलिस चौकशी सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
वांद्रे इथं जे घडलं, ते पुन्हा घडू नये याची काळजी घ्यायला हवी- शरद पवार
कुणीतरी आवई उठवली आणि लोक वांद्र्यात जमले. कुणीही लोकांमध्ये गोंधळ होईल, अशा गोष्टी सांगू नये. राजकीय पक्षांना विनंती आहे,की कुणाचं सरकार आहे हा विचार करून आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. यापुढे वांद्र्यात घडलं तसं घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
लॉकडाऊन वाढवल्यानंतर अनेकांना गावाकडे जाण्याची इच्छा होणं साहजिक आहे. पण आपण त्यांना आज प्रवासासाठी सुविधा देऊ शकत नाही. मात्र अनेक सेवाभावी संस्थांनी या लोकांना जेवण दिलं असून त्यांना उपासमारीपासून वाचवलं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.
पंतप्रधानांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहून 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला. सगळ्या राज्यांनी सहकार्याची भूमिका घेतली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्या आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत असं आवाहनही केलं.
शरद पवारांनी मांडलेले अन्य मुद्दे-
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांची समस्या गंभीर आहे. त्यांना राज्य सरकार मदतीचा निधी उपलब्ध करून आधार देणार
- समाजातले सगळे घटक या संकटकाळात काम करत आहेत. यात कुणी राजकारण आणत नाही, ही जमेची बाजू
- मुंबईतली APMC बाजारपेठ काही वेळ उघडण्याचा निर्णय घेतलाय, पण सबंध राज्याचा विचार केला तर बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय
- पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
- पीपीई हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत, पण आधीपेक्षा जास्त आज उपलब्ध आहेत
- छोटे आणि मध्यम उद्योग आता पूर्ण क्षमतेने चालवण्यात आता मर्यादा आल्या आहेत. त्यांना काय सुविधा देता येतील, कुठे काम सुरू करता येईल याबद्दल केंद्र सरकारने पत्रक काढलंय.
- माध्यमिक आणि प्राथमिक परीक्षा होणार नाहीत. बाकीच्यांचा कार्यक्रम शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलंय. काही गोष्टींचा निर्णय लवकरच होईल. त्यासाठी परीक्षार्थींना पुरेसा वेळ दिला जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
वाढवलेल्या लॉकडाऊनसंबंधी गृहमंत्रालयाकडून नवीन गाइडलाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी (14 एप्रिल) देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भात गृहमंत्रालय नवीन गाइडलाइन प्रसिद्ध करेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं होतं.
गृहमंत्रालयनं आता त्यासंबंधी गाइडलाइन प्रसिद्ध केल्या आहेत. या नवीन गाइडलाइन्सनुसार-
- सर्व शैक्षणिकआस्थापनं म्हणजेच शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस या काळात बंद राहतील.
- सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनंही बंद राहतील.
- सिनेमागृहं, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, स्पोर्ट्सकॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल ही सर्व ठिकाणंबंद राहतील.
- कुठल्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्याची परवानगी नसेल.
- सर्व धार्मिक स्थळं या काळात बंद राहतील.
- हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, क्लिनिक्स, टेलिमेडिसिन केंद्र सुरू राहतील. केमिस्ट, जन औषध केंद्र सुरू राहतील. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत सर्व आस्थापनं सुरू राहतील.
- कृषीक्षेत्राशी निगडीत (अॅग्रीकल्चर आणि हॉर्टिकल्चर) आस्थापनं सुरू राहतील.
- हॉटस्पॉट जाहीर क्षेत्रांमध्ये अत्यंत कठोर निर्बंध लागू असतील. त्याचं पालन न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल.
- 20 एप्रिलपासून काही अतिरिक्त आस्थापनं खुली करण्यासंदर्भात विचार. केंद्र तसंच राज्य सरकारच्या समन्वयातून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनच्या काळातही रेल्वे बुकिंग का सुरू होते?- प्रियंका गांधी
लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि रोजंदारीवरील मजुरांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. या वर्गाचा विचार करून निर्णय का घेतले जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
प्रियंका गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लॉकडाऊन असतानाही रेल्वेच्या तिकिटांचं बुकिंग का सुरू होतं, असा प्रियंका यांचा सवाल आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनावर उपचारासाठी मदत होईल?
कोरोनावर उपचार शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोनावर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
पण ही प्लाझ्मा थेरपी काय आहे? तिचा भारतात वापर होतोय का? यामुळे खरंच कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 हजारांवर
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 439 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने 15 एप्रिलला सकाळी आठ वाजता देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
या आकडेवारीनुसाक देशात आतापर्यंत कोरोनामुळे 377 लोकांचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा सर्वाधिक म्हणजे 2687 आहे. महाराष्ट्रात 178 रुग्णांचा मृत्यू झालाय.
दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1561 असून तीस रुग्णांचा मृत्यू झालाय.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप यांनी अमेरिकेकडून WHO ला मिळणारा निधी थांबवला
जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) अमेरिकेकडून मिळणारा निधी बंद करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी (14 एप्रिल) स्पष्ट केलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये WHO ची भूमिका काय होती, याचंही समीक्षण केलं जाईल, असं ट्रंप यांनी म्हटलं.
जगासमोर कोरोनाचं संकट वाढत असताना ट्रंप यांनी WHO चा निधी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ट्रंप यांनी संयुक्त राष्ट्रांना दिल्या जाणाऱ्या निधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ट्रंप यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवरही निशाणा साधला होता.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांवर
सुप्रभात. कोरोनासंदर्भातले देशातले आणि जगभरातले अपडेट तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. पण त्यापूर्वी मंगळवारी दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा.
- भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
- भारतातील एकूण रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचलीय. सध्या देशात 10363 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तर 353 जणांचा मृत्यू झालाय.
- महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 350ने वाढून 2,684 वर पोहोचलीय, तर मुंबई महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 1756 वर पोहोचलीय
- मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर स्थलांतरितांनी मोठी गर्दी केली. ट्रेन सुरू होणार असल्यानं लोक इथं जमले होते.
- केरळनंतर आता मुंबईतही ‘प्लाझ्मा थेरेपी’च्या चाचणीला सुरुवात झाली.
