महाराष्ट्रात आज 25 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, रुग्णांची एकूण संख्या 1364

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. मुंबई, पुणे या शहरांमध्ये मृतांचं प्रमाण कमी आहे की जास्त?

    मुंबई आणि महाराष्ट्रातला मृतांचा आकडा वेगाने वाढत चाललाय. पण सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे ती म्हणजे मृतांची वाढणारी टक्केवारी. महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे 6 टक्के आहे. समजून घेऊया आपल्या राज्यात असं का होतंय? पाहा व्हीडिओ

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना महाराष्ट्र : मुंबई, पुणे शहरांत मृतांची टक्केवारी सर्वाधिक का आहे?
  2. कोरोनाव्हायरसमुळे सलग दुसऱ्या दिवशी सुमारे 2000 जणांचा मृत्यू

    कोरोनाव्हायरसमुळे सलग दुसऱ्या दिवशी सुमारे 2000 जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राने जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केले आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. दिल्लीमधील वर्धमान अपार्टमेंट्स बिल्डिंग सील

    दिल्लीमधील मयुर विहार फेज वन (एक्स्टेंशन) येथे असणारी वर्धमान अपार्टमेंट्स बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

    दिल्लीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या कटेंटमेंट झोनमध्ये या इमारतीचा समावेश आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदत विसरणार नाही'

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

    "अशा विशेष स्थितीमध्ये मित्रदेशांमध्ये अधिक सहकार्याची गरज असते. हायड्रॉक्सीक्लोक्विनवर निर्णय घेतल्याबद्दल आम्ही भारताचे आणि भारतीयांचे आभारी आहोत. ही मदत कधीच विसरणार नाही.

    (कोरोनाविरुद्धच्या) या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ भारताची नव्हे तर मानवतेची मदत केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. आम्ही मागितलेली मदत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार.

    ते एक उत्कृष्ठ (व्यक्ती) आहेत. त्यांनी केलेली मदत विसरणार नाही." अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. 'कोव्हिड- 19 ला राजकीय रंग देणं थांबवा'

    कोरोना व्हायरसवरुन होणारं राजकारण थांबवा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक तेद्रोस अधोनॉम घेब्रोयसस यांनी केलं आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांनी हे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटना अधिकाधिक चीनकेंद्री वागत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला होता, तसेच अमेरिका या संघटनेला करत असलेल्या मदतीवर पुन्हा विचार करावा लागेल असंही ते म्हणाले होते.जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, आम्हाला सर्व देश जवळचे आहेत, आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी कोरोनावर राजकारण नको अशी विनंती करुन कोव्हिड-91 राजकारणालाच क्वारंटाइन करा असं आवाहन केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. 'घरी बसून फक्त MDची तयारी करणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागात उतरवा'

  7. खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी - सुप्रीम कोर्ट

  8. महाराष्ट्रात आज 25 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, रुग्णांची एकूण संख्या 1364

  9. नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या कोरोना व्हायरसविषयीच्या लाईव्ह अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे.