हे लाईव्ह पेज आता बंद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात आज 150 नव्या रुग्णांची नोंद, एकूण संख्या 1018
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
लाईव्ह कव्हरेज
दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 550
दिल्लीमध्ये आज कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले. दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 550 झाली आहे. यापैकी 331 रुग्ण हे निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत.
170 रुग्ण हे परदेश प्रवास करून आले आहेत तर उर्वरित 49 रुग्णांची तपासणी सुरू आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात 758 रुग्णांचा मृत्यू
ब्रिटनच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोरोनामुळे 758 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 5655 झाली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
परदेश प्रवासाची माहिती लपविणाऱ्या रुग्णावर मध्य प्रदेशमध्ये FIR
मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात कोव्हिड-19 च्या रुग्णाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या रुग्णानं आपली परदेश प्रवासाची माहिती लपविली होती. त्याचबरोबर आपल्या आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी अनेक लोकांना बोलावले होते.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आजचा #CoronaPodcast
कोरोनासंदर्भात आज नेमकं काय घडलं सांगतायत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड...
कोरोना व्हायरस संकटात अर्थव्यवस्था वाचवायची की लोकांचे जीव?
राज्यात आज 150 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात आज 150 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण आकडा हजारच्याही वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
क्षेत्रनिहाय आज वाढलेले रुग्ण -
मुंबई - 116
पुणे - 18
अहमदनगर - 3
औरंगाबाद - 3
नागपूर - 3
बुलढाणा - 2
ठाणे - 2
सातारा - 1
रत्नागिरी - 1
सांगली - 1
याशिवाय, एकूण 79 रुग्ण बरे झाले आहेत, असंही टोपे यांनी ट्वीट करून सांगितलंय.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता?
राज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 21 दिवसांच्या लॉकडाऊनला अजून सात दिवस शिल्लक आहेत.
त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहेत. देशात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपुष्टात येईल की त्यात पुन्हा वाढ होईल? पाहा व्हीडिओ.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
मोदींनी लॉकडाऊन आधीच जाहीर करायला पाहिजे होता – जितेंद्र आव्हाड
पुण्यात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू
पुण्यामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात मंगळवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला.
ज्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांना इतरही आरोग्यविषयक समस्या होत्या, असं राम यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
उमरखेड ते त्रिची- 7 तरुणांचा घर गाठण्यासाठी 1000 किमीचा पायी प्रवास
रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात काम करणाऱ्या तामिळनाडूतील थिरुवरुर आणि नागापट्टणम इथल्या सात तरुणांनी तब्बल हजार किलोमीटरचं अंतर पायी कापत गाव गाठलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात घर गाठण्याच्या ध्यासानं केलेल्या या पायपिटीत त्यांना अनेक अडचणीही आल्या. पण शेवटी ते आपल्या राज्यात, आपल्या घरात पोहोचले. त्यांचा हा प्रवास वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

टोपेंची धारावी पोलीस स्टेशनला भेट
धारावीमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर विशेष दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज धारावी पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलिसांकडून या परिसरात काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा घेण्यासाठी टोपे यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली.
त्यांच्यासोबत स्थानिक आमदार आणि राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यादेखील होत्या.

फोटो स्रोत, ANI
बोरिस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर
कोरोनाची लक्षणं तीव्र झाल्यामुळे ICU मध्ये हलविण्यात आलेले युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर असल्याचं 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यांची श्वसनक्रिया सामान्य होत असून कोणत्याही व्हेंटिलेशन किंवा कृत्रिम साधनांशिवाय ते श्वासोच्छवास करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
जॉन्सन यांना न्यूमोनिया झाला नसल्याचं निदान स्पष्ट झालं आहे.
.
हॅप्पी बर्थडे WHO, पण...
आजपासून 72 वर्षांपूर्वी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या संघटनेची स्थापना झाली होती.
कोरोना विषाणूच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात WHOने पुरेशी पावले उचलली नाहीत, WHOची भूमिका चीनधार्जिणी आहे, अशी टीकाही जगभरातील तज्ज्ञांनी केली आहे. या आजाराची तीव्रता समजून घेण्यात चीननं उशीर केला आणि त्यावर WHOने पांघरूण घातलं, असे आरोपही आहेत.
विशेषतः तैवाननं तर WHO आपल्याशी दुजाभाव करत असल्याचं म्हटलं आहे.खरंच WHO चीनला पाठीशी घालत आहे? कोरोना संसर्गकाळात चीनबाबतची त्यांची भूमिका संशयास्पद आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
लॉकडाऊन न पाळल्यास एका रुग्णाकडून 406 जणांना संसर्गाची भीती
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तसंच सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
1.देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 354 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 4,421 झाला आहे. आतापर्यंत 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
2. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी सरकार विशेष हॉस्पिटल्सच्या उभारणीवर जोर देत आहे. कोव्हिड केअर सेंटर बनविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू.
3.लोकांना आयसोलेट करण्यासाठी ट्रेनच्या डब्यांचा वापर केला जाणार असून रेल्वेच्या अडीच हजार कोचेसमध्ये 40 हजार बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.
4. क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
5. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजिबात पाळले नाहीत, तर एक व्यक्ती 406 लोकांना इन्फेक्ट करू शकते. याउलट लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम 75 टक्के जरी पाळलं तर हे प्रमाण शेकडो पटीनं कमी होतं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनामुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झालाय?
कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं आता वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरून नागरिकांवर लक्ष ठेवत आहेत. नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी सरकारं स्वतःकडे अधिकाधिक शक्ती एकवटत आहेत.
त्यामुळे जगात अनेक विचारवंत कोरोना व्हायरसमुळे लोकशाही धोक्यात येत आहे का, अशी भीती व्यक्त करत आहेत. या भीतीमागची नेमकी कारणं काय आणि त्यावरचे उपाय काय?
पाहा आजची ही सोपी गोष्ट.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
जपानमध्ये आणीबाणी घोषित
जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी राजधानी टोकियो तसंच ओसाका आणि पाच अन्य शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. बुधवारपासून (8 एप्रिल) ही आणीबाणी लागू होईल आणि एक महिन्यापर्यंत आणीबाणी लागू राहील, असं जपान टाइम्सनं म्हटलं आहे.
ज्या पाच शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे, तिथल्या गव्हर्नरना शाळा आणि अन्य व्यवसाय-उद्योग बंद करण्यासंबंधीचे अधिकार आहेत, मात्र नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यासंबंधीचे अधिकार त्यांना नसतील.
मात्र आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हे निर्णय घेण्यात खूप उशीर झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा लांबणीवर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा तसंच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचं घोषित केलं आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 26 एप्रिल 2020 रोजी नियोजित होती, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 10 मे 2020 रोजी नियोजित होती.
या दोन्ही परीक्षांच्या तारखा यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसची तपासणी
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन औरंगाबादमध्ये सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील नर्सेस आणि डॉक्टरांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दिल्लीत 82 वर्षाच्या रुग्णाची कोरोना व्हायरसवर मात
दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमधील मनमोहन सिंह नामक रुग्ण बरा झाल्यांनं त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. मनमोहन सिंह हे 82 वर्षांचे आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता ते पूर्णपणे बरे झालेत.