महाराष्ट्रात कोरोनाचे 120 नवीन रुग्ण, एकूण 868 कोरोनाबाधित

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

  3. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखांना आत्मसमर्पणासाठी एक आठवड्याची मुदत

  4. कोरोना व्हायरसच्या संकटात कशी साजरी होणार शब-ए-बारात?

  5. कोरोना व्हायरस : अमेरिकेची औषध पुरवठ्याची मागणी भारत मान्य करणार?

  6. 'काळजी घ्या', एका पंतप्रधानांच्या दुसऱ्या पंतप्रधानांना शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना ट्वीट करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    "तुम्हाला लवकर हॉस्पिटल मधून सुटी मिळेल, हीच आशा करतो," असं त्यांनी म्हटलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. नागपुरात कोरोनाचा पहिला बळी

    4 एप्रिलला एक 68 वर्षांचा रुग्ण नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) दाखल झाला होता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, मात्र त्याचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता.

    सोमवारी आलेल्या त्याच्या अहवाला तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. 'सर्व सूत्र अजूनही पंतप्रधानांच्याच हाती'

    युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केल्याचं 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रतिनिधीने सांगितलं आहे.

    स्वतः पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये आहेत, मग सध्याच्या परिस्थिती देश कोण चालवतंय, असा प्रश्न बीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा कुएनसर्ग यांनी युकेचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांना विचारला.

    त्यावर उत्तर देताना राब यांनी म्हटलं, की "लक्षणं कायम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या करून घेण्यासाठी पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती नीट आहे आणि अजूनही सर्व सूत्रं त्यांच्याच हातात आहेत."

    लॉकडाऊन खरंच परिणामकारक ठरत आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रोफेसर अँजेला मॅकलीन यांनी म्हटलं, की सध्या करण्यात आलेल्या उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी संसर्गाच्या प्रत्येक टप्प्याची आकडेवारी तपासावी लागेल. आताच त्याबद्दल काही बोलणं हे फार घाईचं ठरेल, असंही मॅकलीन यांनी म्हटलं.

    लोकांनी उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन केलं, तर तीन आठवड्यांनंतर लॉकडाऊनचा खरंच परिणाम झाला का, हे सांगता येत असल्याचं अँजेला मॅकलीन यांनी सांगितलं.

    बोरिस जॉन्सन

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

  9. मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोरोनानं घेतला बळी

  10. 'मातोश्री'जवळ सॅनिटायजेशन

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. राज्यात कोरोनाचे 120 नवीन रुग्ण, रुग्णांची एकूण संख्या 868

    राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 868 झाली आहे, तर 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    राज्यात आज 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 52 झाली आहे.

    मृतांच्या आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर 73 टक्के रुग्ण हे पुरूष असल्याचं समोर आलं आहे. 60% मृत्यू हे 61 वर्षावरील व्यक्तींचे आहेत.

    सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

    महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
  12. वर्ध्यात भाजप आमदाराचं वाढदिवसाला धान्यवाटप, ऐन लॉकडाऊनमध्ये उसळली गर्दी

  13. तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे, असं वाटत असेल तर काय करावं?

    राज्य सरकारने सुरू केलेल्या COVID-MADAT हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा...

    0951361550

    CMO
  14. आजचा #CoronaPodcast

    महाराष्ट्र, भारत, अमेरिका आणि इतर देशांत आज कोरोनाविषयी काय काय घडलं? सांगत आहेत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड आजच्या #CoronaPodcast मध्ये.

  15. 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा रुग्ण?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. .

    काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार, कलानगर बाहेरील चहा विक्रेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा परिसर 'मातोश्री' पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कलानगर परिसर सील करण्यात आला आहे.

    शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका रोहिणी कांबळे यांनी सांगितलं की कलानगरचा परिसर सील करून सॅनिटाईज करण्यात येतो आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेनं या वृत्ताला कोणताही दुजोरा दिलेला नाहीये.

  16. स्थलांतरित मजूरांसाठी महाराष्ट्र सरकारची मदत केंद्रं

    महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण 4,653 मदत केंद्रं स्थापन केली आहेत. यामध्ये 4,54,142 स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5,53,025 मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. 'इटली-स्पेन आशेचा किरण'

    इटली आणि स्पेनमधील ही आकडेवारी ‘आशेचा किरण’ आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले.

    तर अमेरिकेचा कोरोना संकटाबद्दलचा अल्पकालीन दृष्टिकोन हा घातक असल्याची टीका व्हाईट हाऊस कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या डॉ. अँथनी फौची यांनी केली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. इटली, स्पेनमध्ये परिस्थिती सुधारतेय

    युरोपात कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलेल्या इटलीतही संसर्ग होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण काहीसं घटलं आहे.तसंच स्पेनमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सलग चौथ्या दिवशी घटलं.

    सोमवारी स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 637 होती. 24 मार्चपासूनचा मृतांचा हा सर्वात कमी आकडा आहे.इटलीमध्ये आतापर्यंत 15,887 जणांचा मृत्यू झालायतर स्पेनमध्ये 13, 055 जणांचा मृत्यू झालाय.

  19. जगभरात मृतांचा आकडा 69 हजाराच्या वर

    • जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 70 हजारहून अधिक झाली आहे, तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 12.86 लाख झालीये.
    • जॉन हॉपिकन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले आहेत. त्याखालोखाल स्पेन, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये मृत्यू झाले आहेत.अमेरिकेत 9653, फ्रान्समध्ये 8,093 आणि ब्रिटनमध्ये 4,943 जणांचा मृत्यू झालाय.
    किती रुग्ण? किती मृत्यू? किती रुग्ण बरे झाले?
    फोटो कॅप्शन, किती रुग्ण? किती मृत्यू? किती रुग्ण बरे झाले?