You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा' - मोदींच्या हाकेला देशाची साद

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. टाटांनी केली 'ताज'मध्ये डॉक्टरांच्या राहाण्याची सोय

  2. कोरोना व्हायरसमुळे व्हीडिओ कॉलवरुन लग्न

    औरंगाबादमध्ये व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून निकाह पार पडला. पाहा व्हीडिओ

  3. अंडर-17 वुमन्स फुटबॉल वर्ल्डकप पुढे ढकलला

    अंडर-17 वुमन्स फुटबॉल वर्ल्डकप पुढे ढकलण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघानं (FIFA) घेतलाय. येत्या नोव्हेंबर महिन्यात भारतात हा वर्ल्डकप नियोजित होता. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

  4. व्हॉट्सअॅपवरुन अफवा पसरवणाऱ्याला बेड्या

    कोरोना व्हायरससंदर्भात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अफवा पसरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात एका तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्यात. मोहम्मद शाहीद या तरुणाला प्रयागराज पोलिसांनी अटक केलीय.

  5. माणसं घरात आणि जंगलातले प्राणी रस्त्यावर

    कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात बहुतांश देशांमध्ये झाला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. लोकांची वर्दळ कमी झाल्यावर आता शहरांमधल्या रस्त्यांवर एरव्ही जंगलात दिसणारे प्राणी दिसू लागले आहेत.

  6. एकदाच लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाड होईल - ऊर्जामंत्री

    महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाईट बंद करण्याच्या आवाहनावर चिंता व्यक्त केलीय.

    नितीन राऊत म्हणाले, "सर्व लाईट एकाचवेळी बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता आहे आणि पुन्हा सुरळीत होण्यास आठवडा लागू शकतो. त्यामुळं जनतेला माझं आवाहन आहे की, लाईट बंद न करताच मेणबत्त्या, दिवे लावा."

  7. तबलीगीचे लोक पोलिसांवर खरंच थुंकले का?

  8. कोरोनाशी लढण्यासाठी रेल्वेने तयार केले आयसोलेशन कोच

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या किंवा क्वारंटाइन करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी पूर्व-उत्तर रेल्वे विभागाने रेल्वेगाड्यांमध्येच काही विशेष कोच तयार केले आहेत.

  9. पुण्यातल्या शास्त्रज्ञांचे नवे यश

    पुण्यामध्ये राहाणारे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी पॉलीमर स्वॅब तयार केले आहेत. रुग्णांच्या चाचणीची संख्या वाढवण्यासाठी हे संशोधन उपयोगी पडणार आहे.