You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा' - मोदींच्या हाकेला देशाची साद

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. लहान मुलांच्या मास्कबाबत काय काळजी घ्याल? WHO चे नवे नियम

  3. कोरोना व्हायरस गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठं संकट - शक्तिकांत दास

  4. 5G तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरसचा जास्त प्रसार झाला का?

  5. 'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा'

    रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील दिवे बंद करून घराबाहेर किंवा बाल्कनीत पणत्या आणि मेणबत्या पेटवा, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला.

    स्वतः मोदी यांनी एका मोठ्या समईत ज्योत लावून कोरोनाचा काळोख जावो, ही प्रार्थना केली.

  6. 'टप्प्याटप्प्याने विमानं सुरू होणार नाहीत'

    सरकार 15 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने विमानप्रवास सुरू करण्याचा विचार करत असल्याची बातमी चुकीची आहे, असं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.

    PTI वृत्तसंस्थेच्या एका ट्वीटनुसार काही अधिकाऱ्यांनी ही शक्यता वर्तवली होती की सरकार 15 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने विमानप्रवास सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र पुरी यांनी स्पष्ट केलं की सर्व उड्डाणं 15 एप्रिल पर्यंत बंद राहीतील. ती पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. तो निर्णय परिस्थिती पाहून घ्यावा लागेल, असंही ते म्हणाले.

  7. बहरिनमध्ये क्वारंटाईन केलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टॅग

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन किंवा आयसोलेशन करण्यात आलेले संशयित रुग्ण आणि इतरांवर लक्ष ठेवण्यासाठी बहरिन या देशात इलेक्ट्रॉनिक टॅगचा वापर केला जात आहे. प्रत्येक संशयित रुग्णाला हा टॅग घालावा लागेल.

    हा टॅग एखाद्या घडाळ्याप्रमाणे मनगटावर घालता येतो. एका अॅपशी तो जोडलेला आहे. रुग्ण जर त्यांच्या ठिकाणावरून 15 मीटरपेक्षा जास्त दूर गेला तर प्रशासनाला तातडीने मॅसेज जातो.

    असं कृत्य करणाऱ्या रुग्णाला किंवा व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 26 हजार अमेरिकन डॉलर इतका दंड होऊ शकतो.

    बहरिनमध्ये सुमारे 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यांच समोर आलं आहे. तर कोव्हिड-19 मुळे आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

  8. 9 वाजता सर्व लाईट बंद केले तर पावर ग्रिड फेल होईल का?

  9. पाहा आजचा #CoronaPodcast, आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड यांच्याबरोबर

    महाराष्ट्र, देश आण जगभरातले सर्व मोठे अपडेट्स आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा रोजच्या या कोरोना विशेष संवादात...

  10. जपान करतोय फ्ल्यूवरच्या औषधांची मोठ्या प्रमाणात साठवणूक

    कोरोना व्हायरसग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जपानने फ्ल्यूवरच्या औषधांचा साठा करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

    कोरोना व्हायरसचा उगम झालेल्या वुहान परिसरात चीनने अॅव्हिगन आणि फेविपीरावीर नावाची औषधं वापरली होती. या औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि साठा करण्यात येत आहे.

    सुमारे 20 लाख लोकांवर उपचार करता येऊ शकेल, या उद्देशाने हा साठा करण्यात येत आहे.

  11. मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावणारी डॉक्टर

    कोरोना व्हायरसचं निदान करण्यात डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका आहेच. त्यातच एअरपोर्टवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणारे डॉक्टर हा रोग भारताच्या सीमेवरच रोखण्याचं काम करत आहेत.

    22 वर्षीय डॉ. मानसी रेगेनं जे.जे. रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतलं आणि मुंबईतील जीटी रुग्णालयात इंटर्न आहे.

    आणि या संकटादरम्यान तिची ड्युटी लागली मुंबई विमानतळावर. आता ती होम क्वारंटाईनमध्ये आहे.

    पाहा तिचा अनुभव कसा होता...

  12. कोरोनाला दमदार उत्तर देणाऱ्या तैवानचा प्रश्न WHOने का ऐकला नाही?

  13. युकेमध्ये 621 मृत्यूंची नोंद, आकडा 4 हजार 434 वर

    युकेमध्ये कोराना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा संख्या आज 4 हजार 434 वर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागाने दिली आहे.

    आज सुमारे 621 मृत्यूंची नोंद झाली.

    मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कोरोनाग्रस्तांचं वय 33 ते 103 वर्षांदरम्यान होतं. यापैकी 29 जण 35 ते 95 वयोगटातील होते. त्यांना इतर कोणतीही आरोग्यविषयक व्याधी नव्हती.

    सध्या युकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 47 हजार 806 इतकी आहे.

  14. महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 690

    महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांची संख्या 55 ने वाढून 690 झाली आहे. आज आढळलेले नवीन रुग्ण खालीलप्रमाणे -

    • मुंबई 29
    • पुणे 17
    • पिंपरी-चिंचवड 04
    • अहमदनगर 03
    • औरंगाबाद 02

    आतापर्यंत 56 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  15. आंबा बाजारावर कोरोनाची टांगती तलवार

  16. 'सोशल मीडियावरून खोटे मेसेज पसरवल्यास कठोर कारवाई'

    निझामुद्दीन, दिल्ली इथं झालेल्या घटनेसंदर्भात जुने आणि दिशाभूल करणारे व्हीडिओ, व्हॉट्सअॅप तसंच इतर सोशल मीडियाद्वारे पसरवून धार्मिक दुही, तेढ पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

  17. मुंबईच्या धारावीत कसा घुसला कोरोना? आता त्याला कसं रोखणार?

  18. गेल्या 24 तासांत 472 नव्या रुग्णांची नोंद, 11 मृत्यू

    गेल्या 24 तासांत 472 नव्या रुग्णांची नोंद, 11 मृत्युमुखी पडले आहेत तर 267 लोक बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

    देशात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दर 4.1 दिवसांमध्ये दुप्पट होते आहे, हा आकडा 7.4 असता जर तबलीगी जमातचं प्रकरण पुढे आलं नसतं तर. देशात आतापर्यंत एकूण 79 जणांचा मृत्यू झाला आहे, असंही ते म्हणाले.

    आजची ताजी स्थिती माध्यमांना सांगताना त्यांनी मांडलेले काही मुद्दे -

    • देशभरातील 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं समोर आली आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी समान स्वरूपाची उपाययोजना करावी, अशी सूचना देेण्यात आली आहे.
    • कोरोना व्हायरसवरची लस शोधण्याचं काम सुरू आहे, तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग हीच सर्वात मोठी लस आहे.
    • केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यात अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कंटेनमेंट झोन, बफर झोन, घरोघरी सर्वेक्षण आदींचा आढावा घेण्यात आला.
  19. औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी

    औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते.

    3 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

    सदरहू रुग्णाला 10 वर्षांपासून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार होता. चाचणीचे रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र रविवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांचं निधन झालं.

    कोरोनामुळे श्वसन यंत्रणेत बिघाड झाल्याने मृत्यू झाल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी स्पष्ट केलं.