You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

LIVE: भाजपच्या हातून झारखंड निसटलं, मुख्यमंत्रीही पराभूत

एकूण 81 जागांच्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक निकालांचे सर्वांत ताजे अपडेट्स इथे.

लाईव्ह कव्हरेज

  1. रघुवर दास यांना 342 मतांची आघाडी

    भाजपा नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना 342 मतांची आघाडी मिळाली आहे. ते जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  2. काँग्रेस आणि झामुमोला 38 जागांवर तर भाजपला 33 जागांवर आघाडी मिळाली आहे.

    साजेनऊ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस आणि झामुमोला 40 जागांवर तर भाजपला 31 जागांवर आघाडी मिळाली आहे.

  3. भाजपला 32 जागांवर आघाडी

  4. काँग्रेस- झामुमोला 37 जागांवर आघाडी तर भाजपला 34 जागांवर आघाडी

    झारखंड विधानसभा निवडणूक मतमोजणीत काँग्रेस आणि झामुमोला 37 जागांवर तर भाजपला 34 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.

  5. काँग्रेसला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे.

    सुरुवातीच्या मतमोजणीतून आलेल्या कलामध्ये काँग्रेसला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे.

  6. काँग्रेसने 26 जागांवर तर भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

    सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 26 जागांवर तर भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

  7. काँग्रेसने घेतली 18 जागावंर आघाडी

    काँग्रेसने 18 जागांवर आघाडी घेतली असून भाजपाने 9 जागांवर आघाडी घेतली आहे.

  8. मतमोजणीला सुरुवात

    झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे.

  9. मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष

  10. 81 मतदारसंघांमधील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार

    झारखंड विधानसभेच्या 81 मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजण ीसकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार

  11. एक्झिट पोल्सचा अंदाज

    इंडिया टुडे-My Axisचा अंदाज आहे की काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट बहुमत मिळू शकतं. तर IANS-CVoter-ABPचा अंदाज आहे की त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊ शकते.

    इंडिया टुडे-My Axisनुसार भाजपला 22-32 जागा, काँग्रेस-झामुमो-राजद आघाडीला 38 ते 50 आणि इतरांना 5-7 जागा मिळू शकतात.

    IANS-CVoter-ABP नुसार भाजपला 28-36 जागा तर काँग्रेस-झामुमो-राजद आघाडीला 31 ते 39 जागा मिळू शकतात.

  12. निवडणुकीतले मुद्दे काय?

    भाजपनं गेल्या 5 वर्षांत राज्यात विकासाची गंगा आणल्याचं भाजपचं म्हणणं आहे. झारखंड निवडणुकीत विरोधकांनी बेरोजगारी, मागासवर्गीयांना आरक्षण, वाढतं स्थलातंर, भ्रष्टाचार, कुपोषण आदी मुद्द्यांना प्रचारात जोर देण्यात आला आहे.

    याशिवाय झारखंडच्या निवडणुकीत कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, नरेंद्र मोदींची विश्वासार्हता हे मुद्दे परिणामकारक ठरतील, असं मत भाजपचे झारखंडचे प्रवक्ते दीनदयाल वर्णवाल यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

  13. झारखंड विधानसभा निवडणुकीविषयी थोडक्यात

    • भाजप विरुद्ध काँग्रेस-झामुमो-राजद आघाडी, असा थेट सामना होता.
    • झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत आणि बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत.
    • सध्या भाजपचे रघुवर दास मुख्यमंत्री आहेत. 2000 साली बिहारपासून वेगळं काढण्यात आलेल्या झारखंडचे पाच वर्ष पूर्ण करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री.
    • 5 टप्प्यांमध्ये मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 13, दुसऱ्या 20, तिसऱ्या 17 आणि चौथ्या टप्प्यात 15 आणि पाचव्या टप्प्यात 16 जागांसाठी मतदान घेण्यात आलं.