दक्षिण मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने, शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात
लोकसभा निवडणूक 2024 चं वारं देशभरात आहे. निवडणुकीच्या बातम्यांसह आजच्या, 30 एप्रिलच्या इतर बातम्याही तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.
थोडक्यात
कर्नाटकमध्ये भाजप-जेडीएस आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएसने पक्षातून निलंबित केलं आहे.
आगामी ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी भारताचा पुरुष संघ जाहीर झाला आहे. निवड समितीनं पंधरा जणांच्या भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या हाती दिलंय तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
उत्तराखंड सरकारने रामदेवबाबांच्या 14 उत्पादनांचे लायसन्स केले रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छेडछाड केलेल्या व्हीडिओच्या संदर्भात दिल्ली पोलिसांची तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना नोटीस
स्कॉटलॅंड सरकारचे प्रमुख हमजा युसुफ यांनी दिली राजीनामा
प्रज्ज्वल प्रसन्नाबद्दल असदुद्दीन औवेसींचे विधान, हजारो महिलांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्यांचा पंतप्रधानांकडून प्रचार
लाईव्ह कव्हरेज
अमृता कदम
उत्तर मुंबईत काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी
मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असा सामना इथे होताना दिसेल.
उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. गोयल यांच्यापूर्वी गोपाळ शेट्टी हे दोन टर्म भाजपचे खासदार इथून होते.
फोटो स्रोत, INC
दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गट आमने-सामने, शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात
फोटो स्रोत, Facebook
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं यामिनी जाधव यांना उमेदवारी दिलीय. यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं, त्यावेळी यामिनी जाधव आणि यशवंत जाधव हे दाम्पत्य शिंदे गटात सामिल झाले. ठाकरे कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे हे दाम्पत्य शिंदे गटात गेल्यानं अनेकांना धक्का बसला होता.
दुसरीकडे, दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय. त्यामुळे दक्षिण मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच लढत होईल.
फोटो स्रोत, Shivsena
टी-20 वर्ल्डकप : रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ जाहीर, अशी असेल 'टीम इंडिया'
फोटो स्रोत, Getty Images
आगामी ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी भारताचा पुरुष संघ जाहीर झाला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीनं पंधरा जणांच्या भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या हाती दिलंय तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
भारतीय संघात रोहित आणि हार्दिकशिवाय विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खानचा समावेश आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
या स्पर्धेच्या साखळी फेेरीत भारताचे सामने अमेरिकेत होणार आहेत. 5 जूनला आयर्लंडविरुद्ध लढतीनं भारत वर्ल्ड कप कँपेनची सुरुवात करेल.
न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल तर 9 जूनला न्यूयॉर्कमध्येच भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून 12 जूनला तिथे भारत- अमेरिका लढत खेळवली जाईल. तर 15 जूनला फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये भारत-कॅनडा सामना आयोजित केला जाईल.
काश्मीरमध्ये जोरदार हिमस्खलन कॅमेऱ्यात कैद झालं तो क्षण
व्हीडिओ कॅप्शन, काश्मीरमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन, सोनमर्गमध्ये हिमस्खलन, नद्या फुगल्या
लैंगिक शोषणाच्या कथित व्हीडिओ प्रकरणी प्रज्वल रेवण्णा जेडीएसमधून निलंबित
कर्नाटकमध्ये
भाजप-जेडीएस आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएसने पक्षातून निलंबित
केलं आहे.
पक्षाचे सरचिटणीस के. आर
शिवकुमार यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
प्रज्वल रेवन्ना यांच्या
कथित लैंगिक शोषण प्रकरणाचा व्हीडिओ पेन ड्राइव्हच्या माध्यमातून सोशल झाल्यानंतर
कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
हे व्हीडिओ पेन ड्राइव्हमधून
बस स्टॉप, पार्क, गावांमधील यात्रा आणि अगदी घरांमध्येही पोहोचविण्यात आले.
त्यावरून राजकारण तापायला
लागल्यानंतर जेडीएसने रेवण्णा यांना निलंबित केलं.
हासन लोकसभा मतदारसंघातील
मतदानाला पाच दिवस बाकी असताना हा व्हीडिओ सार्वजनिक करण्यात आला.
फोटो स्रोत, FACEBOOK/PRAJWAL REVANNA
प्रज्वल रेवण्णा हे एचडी
देवेगौडा यांचे नातू आणि एचडी कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत.
सोमवारी (29 एप्रिल) सकाळी कुमारस्वामी यांनी म्हटलं
होतं की, पक्ष कोणालाही पाठीशी घालत नाहीये. जे झालं ते खूप निंदनीय आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की,
“नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही एक निर्णय
घेतला आहे. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. काका नात्याने नाही तर
देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो की, लोकांनी आता हे मागे टाकावं. ही
निंदनीय घटना आहे. आणि मी कोणालाही पाठिशी घालत नाही.”
“आम्ही या प्रकारच्या
घटनांविरोधात लढत आलोय, हा गंभीर मुद्दा आहे. सरकार कोणाचं आहे, खऱ्या गोष्टी
त्यांना समोर आणायच्या आहेत आणि वस्तुस्थिती त्यांनी सांगायची आहे; मी नाही.”
नाशिक : चांदवडजवळ एसटी बसची ट्रकला धडक, चार प्रवाशांचा मृत्यू
नाशिकमधील चांदवड येथे एसटी बसची ट्रकला धडक झाल्यानंतर चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
तर या घटनेत 25 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 9 जण गंभीर जखमी आहे आणि 16 जण किरकोळ जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मंगळवारी (30 एप्रिल) सकाळी 8 च्या सुमारास चांदवड तालुक्यात ही घटना घडली. रेणुका देवी घाटाच्या पुढे रस्त्याच्या कडेला ट्रक उभी होती. त्याठिकाणी नाशिककडे जाणाऱ्या बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली.
बसमध्ये एकूण 47 प्रवासी होते. बस ट्रकला धडक दिल्याने बसमधील प्रवाशांना जबर मार लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे.
जळगावकडून वसईला जाणाऱ्या बसमध्ये धुळे, एरंडोल, मालेगाव उमराने या बस स्थानकावरून प्रवासी घेतले होते.
सध्या जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं असून काही प्रवाशांना खाजगी रुग्णालयात तर काहींना मालेगाव येथे नेण्यात आलं आहे.
दरम्यान, सरकारकडून मृत नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
'मी माझ्या जवळच्या 200 जणांना या युद्धात गमावलं', गाझा युद्धात बीबीसी रिपोर्टरला अश्रू अनावर
बस्तरमध्ये झालेल्या पोलीस चकमकीत चार नक्षलवादी ठार
फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, फाईल फोटो
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या वेगवेगळ्या तुकड्या नारायणपूरच्या मध्य भागात नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशनसाठी निघाल्या होत्या, तिथे त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "मृत नक्षलवाद्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचेही पुरावे आहेत. सुरक्षा दलाचे संपूर्ण पथक घटनास्थळावरून परतल्यानंतरच अंतिम परिस्थिती सांगता येईल."
16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातील काल्पर आणि हिदूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत 29 नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला होता.
याशिवाय चकमकीच्या आणखी एका घटनेत 13 नक्षलवादी ठार झाले.
या वर्षी जानेवारीपासून चकमकीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये, सुरक्षा दलांनी बस्तरमध्ये चकमकीत 80 हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे म्हटले आहे.
मुंबई लोकलमधून पडल्याने तरुणीचा मृत्यू, पाच दिवसांत दुसरी घटना
फोटो स्रोत, ANI
मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय रिया राजगोर हिचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे.
सोमवारी (30 एप्रिल) सकाळी गर्दीच्या वेळी ती डोंबिवलीहून प्रवास करत होती.
लोकल ट्रेनमधून पडल्याने मुंबईत गेल्या पाच दिवसांतील हा दुसरा मृत्यू आहे.
सकाळी लोकलच्या डब्यात जागा न मिळाल्याने रिया राजगोर ही फूटबोर्डवरून प्रवास करत होती. पण तिचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार रिया डोंबिवली (ईस्ट) इथे तिच्या आई-वडील आणि भावासोबत राहायची. ती ठाण्यातील एका बांधकाम कंपनीत काम करत होती.
याआधी गुरुवारी (25 एप्रिल) अवधेश दुबे या 25 वर्षीय विद्यार्थ्याला डोंबिवली ते ठाणे लोकल ट्रेनमधून प्रवास करताना जीव गमवावा लागला आहे.
सोमवारच्या प्रकरणात, रेल्वेतील प्रवाशांनी रियाला खाली पडताना पाहिले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सावध केले. तेव्हा रियाला शास्त्रीनगर रुग्णालयात नेले.
पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले, असं रेल्वे पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना दिल्ली पोलिसांची नोटीस
फोटो स्रोत, ANI
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छेडछाड केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना नोटीस बजावलीय.
हा व्हीडिओ तेलंगाना काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला होता.
शाह यांनी यापूर्वी भाजप सत्तेत आले तर तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमधील मुस्लिमांसाठी असलेले 4 टक्के आरक्षण काढून टाकलं जाईल, असं म्हटलं होतं. पण छेडछाड केलेल्या व्हिडिओमध्ये मागासवर्ग आणि अनुसूचित जमातींसह सर्वांचं आरक्षण हटवलं जाईल असं भासवण्यात आल्याचा भाजपने आरोप केला आहे.
याशिवाय हा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने आसाम पोलिसांनी गुवाहाटी येथील काँग्रेस कार्यकर्त्यालाही अटक केली आहे. त्याच्याकडील दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे.
पण लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप अशा गोष्टी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
रेवंत रेड्डी हे तेलंगाना काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. ते सोमवारी (29 एप्रिल) कर्नाटकात प्रचार करत होते. गुलबर्गा येथील एका सभेत त्यांनी आरोप केला की भाजप आता निवडणूक जिंकण्यासाठी दिल्ली पोलिसांचा वापर करत आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आतापर्यंत निवडणूक जिंकण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग आणि सीबीआयचा वापर करत होते. पण मला माहिती मिळाली की, सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे दिल्ली पोलीस तेलंगाना काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले आहेत. ज्यात त्यांना तेलंगाना काँग्रेस अध्यक्ष आणि तेलंगानाचे मुख्यमंत्री यांना अटक करायची आहे," असं रेवंत रेड्डी यांनी म्हटलं.
इराण : लैंगिक छळ करून किशोरवयीन मुलीची हत्या, गोपनीय दस्तावेजात आणखी काय माहिती?
फोटो स्रोत, Atash Shakarami
फोटो कॅप्शन, निका शक्रमाणी
इराणच्या सुरक्षा दलासाठी काम करणाऱ्या तीन पुरुषांनी एका किशोरीवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
सुरक्षा दलाच्या एका लीक झालेल्या दस्तऐवजातून ही गोष्ट स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
2022 मध्ये इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अचानक बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय निका शक्रमाणीचे काय झाले, हे बीबीसीला या कागदपत्रांच्या माध्यमातून शोधण्यात यश आलं आहे.
मृत्यूनंतर नऊ दिवसांनी निकाचा मृतदेह सापडला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा इराण सरकारने केला होता.
या विषयी इराण सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला पण. बीबीसीला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हा अहवाल "अत्यंत गोपनीय" म्हणून चिन्हांकित करण्यात आला आहे. हा अहवाल इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने निकाच्या प्रकरणावर केलेल्या सुनावणीचा सारांश आहे.
त्यात तिचे मारेकरी आणि त्याविषयीचं सत्य लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ कमांडरच्या नावांचा समावेश आहे.
निकाला एका गुप्त व्हॅनमध्ये ठेवण्यात आले होते आणि तिच्यासोबत जे घडते ते अस्वस्थ करणारे आहे.
बीबीसी अनेक महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करत आहे. निकाचा मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या देशात नाईलाजाने करावा लागतोय क्रेडिट कार्डचा वापर; सावकाराच्या तगाद्याने नागरिक हैराण
उत्तराखंड सरकारने 15 एप्रिल रोजी पतंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने रद्द केले असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.
रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि पतंजली यांच्याविरुद्ध कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
ज्या उत्पादनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत त्यामध्ये स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कॉम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट, आयग्रिट गोल्ड आणि पतंजली डॉ. आयड्रॉप्सचा समावेश आहे.
उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हे उत्तर दिले आहे.
रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना राज्य सरकारची ही कारवाई झाली आहे.
नुकतीच पतंजलीची बिनशर्त माफी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.
सर्वोच्च न्यायालय इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या 2022 च्या याचिकेवर सुनावणी करत आहे. यामध्ये कोव्हिड लसीकरण मोहीम आणि औषधांच्या आधुनिक प्रणालींची बदनामी केल्याचा आरोप आहे.
नमस्कार
देशात निवडणुकीचा प्रचार जोरात होताना दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोठमोठ्या नेत्यांचा सभा राज्यात होत आहेत. या व्यतिरिक्त अनेक बातम्या देशात घडत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष पेटलेला दिसत आहे. अशा वेळी तुम्हाला सर्व बातम्या या एकाच पेजवर वाचायला मिळतील,