कोपर्डीमध्ये विवस्त्र करून मारहाण केल्याने दलित तरुणाची आत्महत्या

आजच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी. त्याचबरोबर राज्यातील बातम्या आणि लोकसभा निवडणुकीबद्दलचे अपडेट जाणून घ्या

थोडक्यात

  • कर्नाटकामध्ये कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणी जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवण्णा यांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.
  • राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर अमेठीतून काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
  • तुर्कीने इस्रायलबरोबर सर्व प्रकारच्या व्यापारांवर बंदी घातली आहे.
  • काँग्रेसकडून अद्याप अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवारांची घोषणा नाही. दोन्ही ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस.
  • आयपीएल 17 च्या 50व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला एका रननं पराभूत केलं.

लाईव्ह कव्हरेज

नितिन सुलताने आणि ओंकार करंबेळकर

  1. 'रोहित वेमुलाची आत्महत्या जातिभेदामुळे झाली नाही,' पोलिसांच्या अहवालात काय म्हटलं?

    रोहित वेमुला

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी राहिलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अंतिम अहवाल दाखल केला आहे.

    पोलिसांनी हे प्रकरण बंद करताना सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, रोहितला त्याची खरी जात लोकांना कळेल याची 'भीती' सतावत होती आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली. रोहित वेमुलाने 17 जानेवारी 2016ला आत्महत्या केली होती. तेलंगणा पोलिसांनी या अहवालात अनेक राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली आहे.

    या प्रमुख लोकांमध्ये सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन रामचंद्र राव, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावांचा समावेश आहे. स्मृती इराणी त्या वेळी मानव संसाधन आणि विकास मंत्री होत्या. अभाविपच्या अनेक सदस्यांनाही क्लीन चिट देण्यात आली आहे.

    पोलिसांना त्यांच्या तपासात असे आढळून आले आहे की, रोहित वेमुला अनुसूचित जातीचा नसल्यामुळे त्याच्या खऱ्या जातीचे सत्य बाहेर येण्याची भीती होती.

    पोलिसांनी आपला अहवाल तेलंगणा उच्च न्यायालयात सादर केला असून रोहितला त्याच्या आईला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याचे माहीत होते. या प्रमाणपत्राद्वारे रोहित वेमुलाने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रगती केल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वेमुलाला भीती वाटत होती की जर आपल्या जातीबद्दल सत्य बाहेर आले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या आत्महत्येनंतर देशभरातील विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू झाली. रोहित वेमुला आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेचा सदस्य होता.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    भाजपाच्या प्रवक्त्या रचना रेड्डी म्हणतात, "तेलंगणाच्या गृह मंत्रालयानं 2016 च्या रोहित वेमुला आत्महत्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या वादग्रस्त प्रकरणासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला आहे.

    व्यवस्थापनाच्या धोरणामुळे दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करावी लागल्याबद्दल हैदराबाद सेंट्रल विद्यापीठात आगडोंब उसळला होता आणि निदर्शनं झाली होती...या प्रकरणातील तपासात भाजपाचे मातब्बर नेत्यांवर आरोप होता. मात्र पोलिसांनी मार्च महिन्यात सादर केलेल्या विस्तृत अंतिम अहवालात म्हटलं आहे की या प्रकरणात अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं (एससी-एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटिज अॅक्ट) उल्लंघन झाल्याचं आढळून आलं नाही.

    रोहित वेमुला याची आत्महत्या दुर्दैवी होती. मात्र यात आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचं दिसून येत नाही, असं या अहवालात म्हटलं आहे आणि तपास थांबवण्यात आला आहे..."

  2. कोपर्डीमध्ये विवस्त्र करून मारहाण केल्याने दलित तरुणाची आत्महत्या

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

    अहमदनगरमधील कोपर्डीमध्ये विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे दलित तरुणाने आत्महत्या केली आहे.

    त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून कार्यवाही करुन आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी काही लोकांना अटक केली असल्याची माहिती नगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

    तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, कोपर्डी येथील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी (1 मे) गावात तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं.

    गावातच राहणारा तरुण नितीन उर्फ विठ्ठल शिंदे तमाशा दरम्यान व्यासपीठावर नाचत होता. ‘हा खालच्या जातीचा आमच्यात का नाचतोय’, म्हणत आरोपींनी त्याला हटकलं आणि मारहाण केली. यानंतर तमाशात गोंधळ उडाला आणि तमाशा बंद पडला.

    त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करण्यात आलं आणि मारहाण केली. त्याचा मोबाइलही हिसकावून घेतला. त्यामुळे नितीनला रात्रभर स्मशान भूमीत बसावं लागलं.

    हा प्रकार घरच्यांना समजल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला घरी आणण्यात आलं. आपल्याला नाचताना मारहाण करण्यात आली, विवस्त्र करण्यात आलं असून आपली जगण्याची कसलीच इच्छा उरली नसल्याचं नितीन याने घरच्यांना सांगितलं.

    घरच्यांनी त्यावेळी त्याला समजावून सांगितलं पण दुसऱ्या दिवशी आजूबाजूला कोणी नसताना त्याने आत्महत्या केली. तसेच आपण कोणत्या कारणावरून आत्महत्या करत आहोत हे देखील चिठ्ठीत लिहिले आहे.

    यासंदर्भात नितीनचे वडील कांतीलाल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक (तिघेही रा. कोपर्डी, कर्जत) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

  3. कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक, तुम्हाला सगळे कागदपत्र नव्याने काढावे लागणार का?

  4. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात, 6 जणांचा मृत्यू

    शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाल्याचं वृत्त आहे.

    या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

    गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होते.

    दोन गाड्या आमनेसामने धडकून हा अपघात झाला. अकोला जिल्ह्यातील पातुर शहराजवळ अपघात झाला.

    अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    अपघात घटना
  5. रायबरेलीतून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

    राहुल गांधींनी वायनाड सोबतच उत्तरप्रदेशच्या रायबरेलीमधूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रायबरेली ही काँग्रेस अध्यक्षांची पारंपरिक जागा मानली जाते आणि काँग्रेसने बराच काळ इथून त्यांचा उमेदवार जाहीर केला नव्हता.

    अखेर वायनाडचे विद्यमान खासदार असणाऱ्या राहुल गांधींनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल करायला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित होते.

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, CONGRESS

    उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींनी रायबरेलीत त्यांच्या हजारो समर्थकांसह रोड शो केला. राहुल गांधी हे वायनाडमधूनही उभे आहेत आणि तिथे मतदान झालं आहे.

    2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीमध्ये पराभूत झाले होते. राहुल गांधी पुन्हा अमेठीतून उमेदवार होतील अशी अटकळ बांधली जात होती मात्र त्यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केली आहे.

    यंदा मात्र सोनिया गांधी लोकसभेच्या रिंगणात स्वतः उतरलेल्या नाहीत. त्या सध्या राज्यसभेच्या खासदारं आहेत.

  6. पंतप्रधानांचा राहुल गांधींवर त्यांच्याच शब्दांत हल्लाबोल, म्हणाले-'डरो मत, भागो मत'

    पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    फोटो स्रोत, ANI

    काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांनी हल्ला चढवला आहे.

    पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता म्हटलं की, "मी आज यांना सांगू इच्छितो की, डरो मत और भागो मत."

    पीएम मोदी म्हणाले की, "आता कुठल्याही ओपिनियन पोलची गरज नाही की एक्झिट पोलची गरज नाही. निकाल अगदी स्पष्ट आहे."

    "मी आधीच सांगितलं होतं. दोन-तीन महिन्यांपूर्वीच म्हटलं होतं की, यांच्या सर्वात मोठ्या नेच्या निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवणार नाही आणि पळ काढतील. त्या राजस्थानातून राज्यसभेवर गेल्या."

    मोदी म्हणाले, "शहजादे वायनाडमधून पराभूत होत आहेत. पराभवाच्या भीतीनं वायनाडमध्ये मतदान होताच ते तिसरा मतदारसंघ शोधू लागतील, हेही मी आधीच म्हटलो होतो."

    "सगळे म्हणत होते की, ते अमेठीत जातील पण अमेठीलाही एवढे घाबरले की, पळून रायबरेलीत जागा शोधत आहेत," असंही पीएम मोदी म्हणाले.

    "ते सगळ्यांना सांगतात, डरो मत. मी आज त्यांना सांगू इच्छितो की, डरो मत, भागो मत."

    काँग्रेस पक्षाला यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळणार असल्याचा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    राहुल गांधी यावेळी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी 2004 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते.

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पराभूत केलं होतं.

  7. 150 वर्षांपूर्वी लुटून नेलेला ऐवज ब्रिटिशांनी केला परत

  8. पाकिस्तानच्या आयेशाला भारतात मिळालं नवं हृदय, कॅनडाचा पर्याय सोडला कारण...

  9. सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कोणालाही इजा नाही

    सुषमा अंधारे

    फोटो स्रोत, FACEBOOK

    फोटो कॅप्शन, सुषमा अंधारे

    महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. सुषमा अंधारेंसह पायलट आणि इतर सगळे सुखरुप आहेत.

    सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबूक लाईव्ह करून त्यांच्यासह सगळे सुखरुप असल्याची माहिती दिली आहे.

    सुषमा अंधारे गुरुवारी प्रचारासाठी कोकणात होत्या. त्यानंतर आज त्या हेलिकॉप्टरद्वारे बारामतीला सभांसाठी जाणार होता. त्यासाठी त्यांना नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं.

    पण हेलिकॉप्टर लँड होत असतानाच ते क्रॅश झालं. लँड होतानाच ते क्रॅश झाल्यानं आतमध्ये पायलटशिवाय दुसरं कोणी नव्हतं.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्याच पक्षांचा प्रचाराचा वेग वाढला आहे.

  10. गांधी कुटुंबीय पराभवानंतर मतदारसंघ सोडून पळतात, भाजपचा आरोप

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, ANI

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अखेर रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर यावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    गांधी कुटुंबीय ज्या मतदारसंघातून पराभूत होतात तो मतदारसंघ सोडून देतात, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गिरिराज सिंह म्हणाले की, "गांधी कुटुंबीय जिथून पराभूत होतात त्याठिकाणी पुन्हा जात नाहीत. जसे राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले तर अमेठी सोडून गेले. यावेळी रायबरेलीतूनही पराभूत झाले तर रायबरेलीही सोडतील."

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    तर राहुल गांधी वायनाडमधून पराभूत होणार असल्यानं ते रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत, असं भाजपचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंह सिरसा एएनआशी बोलताना म्हणाले.

    मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले की, "पंजाबमधून केएल शर्मा यांना आणलं आहे. कोणताही कार्यकर्ता तिथून लढायला तयार नाही. वायनाडमधून पळ काढल्यानंतर राहुल गांधींना रायबरेलीतूनही पळून जावं लागेल."

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

    राहुल गांधी 2004 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. 2019 मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना अमेठातून पराभूत केलं होतं.

    पण यावेळी काँग्रेसनं राहुल गांधींऐवजी केएल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या तिकिटावर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.

    राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीतून निवडणूक लढवतील. सोनिया गांधी 2004 ते 2024 पर्यंत रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत.

  11. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट, त्यानंतर पावसाची शक्यता

    हवामान विभागाचा अंदाज

    फोटो स्रोत, IMD-Nagpur RMC

    विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून अचानक ऊन्हाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं विदर्भातील तापमानातही वाढ झाली आहे. गुरुवारी नागपुरात 39.9 अंश सेल्सिअस तर चंद्रपुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान होतं.

    या आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

    एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना चार आणि पाच असे दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

    अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवारी सहा मे रोजी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

    गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सहा मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  12. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार, अमेठीतून कुणाला दिली उमेदवारी?

    राहुल गांधी.

    फोटो स्रोत, ANI

    काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमेठीतून काँग्रेस पक्षानं किशोरीलाल शर्मा यांना उमेदवार बनवलं आहे.

    राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    राहुल गांधी तीन वेळा अमेठीतून निवडून आले आहेत. पण 2019 मध्ये राहुल गांधींना अमेठीतून पराभवाचा सामना करावा लागला होता.

    2019 मध्ये राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून लोकसभेत पोहोचले होते. यावेळीही राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत.

    1999 नंतर पहिल्यांदाज गांधी कुटुंबातील एखादा सदस्य अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    अमेठीतून उमेदवारी जाहीर झालेले केएल शर्मा रायबरेलीतील सोनिया गांधींचे संसद प्रतिनिधी आहेत.

    काँग्रेसनं यादी जाहीर करण्यापूर्वी प्रियांका गांधी अमेठी किंवा रायबरेलीतून रिंगणात उतरणार असं समजलं जात होतं. पण काँग्रेसच्या यादीत प्रियांका यांचं नाव नाही.

  13. हिरामंडी : गणिकांची जिथे सत्ता होती, पण अफगाण आक्रमणानंतर देह व्यापार सुरू झाला आणि

  14. गाझातील मानवी संकट : तुर्कीने इस्रायलबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

    तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (संग्रहित छायाचित्र)

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (संग्रहित छायाचित्र)

    तुर्कीनं इस्रायलबरोबरच्या सर्व व्यापारांवर बंदी घातली आहे.

    गाझातील गंभीर 'मानवी' संकटासाठी तुर्कीनं इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे. त्याचाच हवाला दे त्यांनी व्यापार बंदीचं पाऊल उचललं आहे.

    जोवर गाझामध्ये कोणत्याही अडळ्याविना पुरेशी मदत पुरवली जात नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहील, असं तुर्कीच्या व्यापार मंत्रालयानं म्हटलं आहे.

    गेल्यावर्षी या दोन देशांमध्ये सात अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता.

    या पावलानंतर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्यावर हुकूमशाही वर्तन करत असल्याचा आरोप केला आहे.

    "तुर्कीतील लोक, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कराराकडं दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे," असं इस्रायलचे पराष्ट्र मंत्री काट्ज यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं.

    तुर्कीनं त्यांच्याकडून जारी केलेल्या निवेदनात, या बंदीवर सर्व प्रकारच्या उत्पादनांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.

    "तुर्की अत्यंत कठोरपणे ही बंदी लागू करेल. जोपर्यंत इस्रायल सरकार गाझामध्ये कोणताही कोणताही अडथळा न आणता पुरेशी मदत पोहोचवत नाही, तोपर्यंत ही बंदी कायम राहील."

    1949 मध्ये इस्रायलला मान्यता देणारा तुर्की हा पहिला मुस्लिम बहुसंख्याक लोकसंख्या असलेला देश बनला होता. पण गेल्या काही दशकांमध्ये दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे.

  15. 3 मे महत्त्वाच्या बातम्या

  16. अमेरिकेतील विद्यापीठात गाझा समर्थनार्थ निदर्शनं होत आहेत. देशात निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यानिमित्ताने राज्यभर आणि देशभरात नेत्यांच्या सभा होताना दिसत आहेत.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या सर्व बातम्यांच्या ताज्या अपडेटस तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर वाचायला मिळतील.