You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राष्ट्राध्यक्षपदासाठी नॅन्सी पलोसी यांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

थोडक्यात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर
  • वित्तीय तूट (Fiscal Deficite) जीडीपीच्या 4.9%
  • विश्लेषकांच्या मते, देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा श्रीमंतांइतका लाभ न झालेल्या बहुसंख्य ग्रामीण भागावर केंद्रातील नवीन सरकारला प्रकर्षानं लक्ष देण्याची आवश्यकता भासू शकते.
  • महिलांना रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग विमेन हॉस्टेल, पाळणाघरांची स्थापना करणार- अर्थमंत्री
  • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्याला प्राधान्य- सीतारामन
  • पूर्वेकडच्या राज्यांसाठी पूर्वोदय प्लान सुरू करणार- निर्मला सीतारामन
  • आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणारी योजना - 1 कोटी तरुणांना पुढच्या 5 वर्षांत इंटर्नशिप देणार, 5000 रुपये महिना मोबदला मिळणार आणि पहिल्यांदा 6000 रुपयांची मदत करणार.
  • स्पेस इकॉनॉमी पुढच्या 10 वर्षांत पाचपट वाढवणार. 1 हजार कोटींच्या व्हेंचर कॅपिटल फंडची स्थापना

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. राज्यांच्या मदतीने शहरांचा विकास 'ग्रोथ हब' म्हणून करणार- अर्थमंत्री

    • राज्यांच्या मदतीने शहरांचा विकास ग्रोथ हब म्हणून करणार.
    • PM आवास योजनेतील अर्बन हाऊसिंगसाठी 10 लाख कोटींची तरतूद
    • 1 कोटी घरांसाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
    • राज्यांना स्टँप ड्यूटी कमी करण्याचं आवाहन
    • PM स्वनिधी योजना - रस्त्यांवरील फेरीवाल्यांसाठी 100 अर्बन हाट, आठवडी बाजार लागणार
  2. भारताचं बजेट कसं तयार होतं, जाणून घ्या 'या' 18 रंजक गोष्टी

    भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशेबाला अर्थसंकल्प (बजेट) म्हणतात. घटनेनुसार, सरकारनं दरवर्षाच्या सुरुवातीला संसदेत बजेट सादर करणं आवश्यक आहे.

    वित्तीय वर्षाचा अवधी चालू वर्षाच्या एक एप्रिलपासून पुढच्या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत असतो. सरकारतर्फे सादर करण्यात येणाऱ्या आर्थिक हिशेबात सरकारचा महसूल आणि इतर मिळकती, तसंच खर्चाची गोळाबेरीज दिली जाते.

  3. रोजगार निर्मितीसाठी सरकारचं विशेष पॅकेज, उद्योग आणि कौशल्यविकासावर भर, मदतीची घोषणा

    • लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज
    • सेवा, उत्पादन MSMEsना पॅकेज मिळणार
    • MSMEs साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम
    • मुद्रा लोन घेऊन यशस्वीपणे फेडलेल्यांना 20 लाखांपर्यतचं कर्ज मिळू शकणार
    • नव्या योजनेत MSMEs ना 100 कोटींपर्यंतचं कर्ज मिळू शकणार
    • आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणारी योजना - 1 कोटी तरुणांना पुढच्या 5 वर्षांत इंटर्नशिप देणार, 5000 रुपये महिना मोबदला मिळणार आणि पहिल्यांदा 6000 रुपयांची मदत करणार.
    • 12 नवीन इंडस्ट्रियल पार्क्सची स्थापना करणार.
  4. राज्यांना काय मिळणार?

    • पूर्वेकडच्या राज्यांसाठी पूर्वोदय प्लान सुरू करणार
    • आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचं अर्थसहाय्य
    • बिहारमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र
    • ईशान्य भारतात इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जाळं वाढवणार
    • ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांसाठी 2.66 लाख कोटी रुपयांचे नियोजन
    • महिलांसाठीच्या योजनांसाठी 3 लाख कोटींची तरतूद
  5. नवीन रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद- सीतारामन यांची घोषणा

    • महिलांना रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग विमेन हॉस्टेल
    • पाळणाघरांची स्थापना करणार. महिलांमधील कौशल्य विकासाला चालना देणार
    • 1000 इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अपग्रेड करणार. तेथिल अभ्यासक्रम आधुनिक होणार.
    • नवीन रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद
    • देशातल्या संस्थांमधील शिक्षणासाठी घेतलेल्या 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मदत करणार
    • शैक्षणिक कर्ज 3 टक्के व्याजाने मिळण्यासाठी ई व्हाऊचर मिळणार
  6. कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य- अर्थमंत्री

    • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
    • डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्याला प्राधान्य
    • त्याची साठवण क्षमता वाढवणार
    • कोळंबी उत्पादन, शेती, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी नाबार्डद्वारे सहाय्य देणार
    • हवामान बदलात टिकून राहणाऱ्या शेती वाणांसाठीच्या संशोधनाला प्रोत्साहन
    • 400 जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचा डिजीटल सर्व्हे
    • 5 राज्यांत किसान क्रेडिट कार्ड लाँच होणार
    • 6 कोटी शेतकऱ्यांची आणि शेतजमिनींची नोंदणी होणार
    • 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन
    • 32 फळं आणि भाज्यांच्या 109 प्रजाती वितरीत करणार
  7. बजेटमध्ये मध्यम वर्ग आणि रोजगारांवर भर असणार, 4 कोटी युवकांना नोकऱ्या देणार- निर्मला सीतारामन

    निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

    • बजेटमध्ये मध्यम वर्ग आणि रोजगारांवर भर असणार.
    • 4 कोटी युवकांना नोकऱ्या देणार.
    • रोजगार, कौशल्य - 5 योजना - 2 लाख कोटींची तरतूद
    • शेती उत्पादन आणि संशोधनाला महत्त्व देणार
    • हवामान बदलात टिकून राहणाऱ्या शेती वाणांसाठीच्या संशोधनाला प्रोत्साहन
  8. बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय काय असतं?

    ब्रिटीशांच्या काळापासून दरवर्षी 28 फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर केलं जात होतं. आणि त्याआधी रेल्वेमंत्री रेल्वे बजेट वेगळ्याने सादर करत असत. पण आता गेली काही वर्षं बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलं जातं आणि रेल्वे बजेटचाही यातच समावेश असतो.सविस्तर वाचा- बजेट म्हणजे काय?

  9. अर्थसंकल्प म्हणजे काय? बजेट समजून घ्या सोप्या शब्दांत

  10. अर्थमंत्री निर्मला सीतारामन नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात उपस्थित

  11. तुम्हाला गृहकर्ज मिळू शकतं का? ते कसं काढायचं? EMI म्हणजे काय?

    आपलं स्वतःचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण घर घेण्याइतके पैसे सध्या हातात नसतील तर काय करायचं?

    अशावेळी पर्याय असतो गृहकर्जाचा. गृहकर्ज किंवा होमलोन म्हणजे घरखरेदीसाठी, घर उभारणीसाठी आणि घरात सुधारणा करण्यासाठी बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून दिलं जाणारं कर्ज.

    या कर्जावर व्याजही लागतं आणि हे कर्ज ठराविक काळात दर महिन्याला विशिष्ठ रक्कमेचा हफ्ता भरून फेडता येतं. हे कर्ज घेऊन तुम्ही घर विकत घेऊ शकता, पण जोवर कर्ज पूर्णपणे फेडत नाही, तोवर घर बँकेकडे तारण ठेवलं जातं.

    ही सगळी प्रक्रिया काहीशी किचकट वाटेल, पण ती आपण सोप्या शब्दांत समजून घेऊयात..

  12. चलनी नोटा छापून लोकांना वाटल्या म्हणजे आर्थिक प्रश्न सुटतील का?

    हे काय?... रिझर्व्ह बँक, छपाईयंत्रं हाताशी असताना सरकार धडाधड नोटा छापून मोकळं का होत नाही? पटापट नोटा छापायच्या आणि द्यायच्या लोकांमध्ये वाटून… असा विचार काही लोकांच्या डोक्यात आला असेल किंवा आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या मनात लहानपणी असा विचार एकदा तरी येऊन गेलेला असतोच.

    पण मग सरकार खरंच भरपूर नोटा का छापत नाही, त्या लोकांमध्ये वाटत का नाही, त्यामुळे एका दिवसात गरिबी नष्ट करता येईल. असा विचार तुमच्या मनात येत असेल तर थोडं थांबा.

    हा लेख वाचून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा- येथे क्लिक करा

  13. भारतीय अर्थव्यवस्थेचे चांगले, वाईट आणि सर्वांत वाईट पैलू 6 आलेखांतून समजून घ्या

    यावर्षी जानेवारी महिन्यात प्रचंड थंडी असूनही हजारो लोक दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी जमले होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात ‘विकसित भारत 2047’चा संदेश देत, देश 2047 पर्यंत विकसित करण्याचं वचन दिलं होतं.

    आकर्षक आश्वासनांसाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या मोदींचं हे सर्वात अलिकडील आश्वासन आहे.

    तसं पाहता ‘विकसित भारत’ हा एक अनिश्चित संकल्प आहे. पण एका दशकापूर्वी सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अत्यंत वेगानं आर्थिक विकासाचा पाया रचल्याचा दावा गेल्या 10 वर्षांमध्ये अनेकदा केल्याचं पाहायला मिळालं आहे.

    पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारला आधीच्या सरकारकडून वारशात नाजूक अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था मिळाली होती. विकासाचा वेग मंदावलेला होता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेला होता. भारताचे जवळपास डझनभर अब्जाधीश दिवाळखोरीत निघाले होते आणि त्यामुळे देशातील बँकांमध्ये अब्जावधींच्या कर्जाची परतफेडच करण्यात आलेली नव्हती.

  14. कोव्हिडनंतर पुरुषांच्या तुलनेत घटले महिलांचे आयुर्मान, ही आहेत कारणे?

  15. अर्थसंकल्प पाहण्यापूर्वी समजून घ्या या 5 संकल्पना

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

    इन्कम टॅक्स रचनेतील बदलांवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तसंच कोणत्या गोष्टी महाग किंवा स्वस्त होणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

    सीतारामन राज्यसभेत 2024-25 या वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विधान (Estimateed Receipts and Expenditure) पटलावर मांडतील. त्यानंतर लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील.

    याआधी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सीतारामन यांनी केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर त्या संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडतील.

    कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाण्यापूर्वी अर्थसंकल्प सादर करत असताना वापरल्या जाणाऱ्या या 5 संकल्पांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

  16. नरेंद्र मोदींच्या आगामी अर्थसंकल्पावर देशातील बेरोजगारीचं सावट

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीए सरकार, निवडणुकीत निसटता विजय मिळवल्यानंतर सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर करणार आहे.

    पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळं राजकीयदृष्ट्या कमकुवत स्थितीत असणारे नरेंद्र मोदी, सरकार चालवण्यासाठी पहिल्यांदाच एनडीए आघाडीतील घटक पक्षांवर विसंबून आहेत. पंतप्रधान मोदी वित्तीय शिस्त राखत त्यांच्या धोरणांची नव्यानं मांडणी करतील अशी अपेक्षा आहे.

    विश्लेषकांच्या मते, देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा श्रीमंतांइतका लाभ न झालेल्या बहुसंख्य ग्रामीण भागावर केंद्रातील नवीन सरकारला प्रकर्षानं लक्ष देण्याची आवश्यकता भासू शकते.पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- नरेंद्र मोदींच्या आगामी अर्थसंकल्पावर देशातील बेरोजगारीचं सावट

  17. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत निर्मला सीतारामन मोरारजी देसाईंचा 'तो' विक्रम मागे टाकणार

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

    इन्कम टॅक्स रचनेतील बदलांवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तसंच कोणत्या गोष्टी महाग किंवा स्वस्त होणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

    सीतारामन राज्यसभेत 2024-25 या वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विधान (Estimateed Receipts and Expenditure) पटलावर मांडतील. त्यानंतर लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील.

    याआधी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सीतारामन यांनी केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर त्या संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडतील.

    सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान सीतारामन यांना मिळणार आहे.

    याआधी मोराजी देसाई यांनी सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांचा हा विक्रम सीतारामन मागे टाकतील. देसाई यांनी 1959 ते 1964 या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पाचवेळा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. तर त्यानंतर एकदा अंतरिम अर्थसंकल्प मांडला.

    दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असल्याचा दावा, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी म्हटलं आहे.

    सोमवारी (22 जुलै) आर्थिक सर्व्हेक्षण सादर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी भारताचा विकास दर 6.5 ते 7 टक्के राहील, असंही म्हटलं

  18. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 : आज सादर होणार अर्थसंकल्प

    नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या पेजवर तुमचे स्वागत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे.

    या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, कोणत्या गोष्टी महाग होणार याकडे सर्वांते लक्ष आहे.

    पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जातील याचीही सर्वांना उत्सुकता आहे.