लालूप्रसाद यादव म्हणतात, 'या लोकांना बाबासाहेबांची राज्यघटना घालवायची आहे'
राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक वक्तव्य केलं आहे. भीमराव आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं ते म्हणाले आहेत.सारण येथे आपली मुलगी रोहिणी आचार्य हिच्यासाठी प्रचार करताना लालू प्रसाद यांनी हे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले, बाबासाहेबांच्या राज्यघटनेला पुसून टाकण्याचा, हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, लोकशाही हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. बाबासाहेबांची घटना नसती तर आम्हाला आरक्षण मिळालं नसतं. घटनेत आज असलेली लोकशाहीची व्याख्या राहिली नसती. बाबासाहेबांची राज्यघटना कदापिही नष्ट होणार नाही असा आपण आज सर्वांनी संकल्प केला पाहिजे.
सारण येथून लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य निवडणूक लढवत आहे. लालू प्रसाद पहिल्यांदा खासदार झाले ते याच मतदारसंघातून. गेल्या दोन निवडणुकांत भाजपा इथं जिंकली आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी इथून 2014 पासून दोनवेळा निवडून गेले आहेत.