लालूप्रसाद यादव म्हणतात, 'या लोकांना बाबासाहेबांची राज्यघटना घालवायची आहे'

लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्तानं महाराष्ट्रासह देशभरात घडणाऱ्या घडामोडी आपण इथून जाणून घेऊ.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार आज थांबणार
  • राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देत केकेआरला दोन विकेट्सनं पराभूत केलं
  • छत्तीसगडमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 29 माओवादी ठार
  • अमेरिका इराणवर निर्बंध लादण्याची शक्यता वाढली

लाईव्ह कव्हरेज

  1. लालूप्रसाद यादव म्हणतात, 'या लोकांना बाबासाहेबांची राज्यघटना घालवायची आहे'

    लालूप्रसाद यादव म्हणतात, 'या लोकांना बाबासाहेबांची राज्यघटना घालवायची आहे'

    फोटो स्रोत, Getty Images

    राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक वक्तव्य केलं आहे. भीमराव आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं ते म्हणाले आहेत.सारण येथे आपली मुलगी रोहिणी आचार्य हिच्यासाठी प्रचार करताना लालू प्रसाद यांनी हे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले, बाबासाहेबांच्या राज्यघटनेला पुसून टाकण्याचा, हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, लोकशाही हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. बाबासाहेबांची घटना नसती तर आम्हाला आरक्षण मिळालं नसतं. घटनेत आज असलेली लोकशाहीची व्याख्या राहिली नसती. बाबासाहेबांची राज्यघटना कदापिही नष्ट होणार नाही असा आपण आज सर्वांनी संकल्प केला पाहिजे.

    सारण येथून लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य निवडणूक लढवत आहे. लालू प्रसाद पहिल्यांदा खासदार झाले ते याच मतदारसंघातून. गेल्या दोन निवडणुकांत भाजपा इथं जिंकली आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी इथून 2014 पासून दोनवेळा निवडून गेले आहेत.

  2. व्यापार-उद्योगासाठी अनुकूल असणारे जगातील टॉप 10 देश, भारत कितव्या स्थानावर?

  3. दुबईमध्ये वर्षभराचा पाऊस एकाच दिवसात

    व्हीडिओ कॅप्शन, UAEची राजधानी दुबईला मंगळवारी वादळी पावसानं झोडपलं.
  4. ही निवडणूक दोन विचारधारांमधली लढाई आहे- राहुल गांधी

    ही निवडणूक दोन विचारधारांमधली लढाई आहे- राहुल गांधी

    फोटो स्रोत, Getty Images

    ही निवडणूक दोन विचारधारांमधली लढाई आहे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. ते कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात एका प्रचारसभेत बोलत होते.एका बाजूला घटनेसाठी लढा देणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला रा. स्व. संघ आणि भाजपा आहेत. जे लोकशाही संपवू पाहात आहेत.ते म्हणाले, "ही निवडणूक दोन विचारधारांमधली लढाई आहे. एका बाजूला काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, ज्यांनी घटनेसाठी लढा दिला, हिंदुस्थानाला घटना दिली आणि लोकशाही दिली. आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आहे, जो राज्यघटना संपवत आहे आणि हिंदुस्थानातील प्रत्येक संस्थेत आपले लोक घुसवत आहे."राहुल गांधी केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमेठीतून निवडणूक का लढवत नाही असं विचारल्यावर त्यांनी कोण कुठून लढणार याचा निर्णय पक्ष घेत असतो असं त्यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेसने अद्याप अमेठी आणि रायबरेलीचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. यूपीएससीमध्ये पहिला येईन असं वाटलं नव्हतं- आदित्य श्रीवास्तव

    यूपीएससीमध्ये पहिला येईन असं वाटलं नव्हतं- आदित्य श्रीवास्तव

    फोटो स्रोत, ANI

    केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या सिव्हिल सेवा परीक्षेत प्रथम येईन असं वाटलं नव्हतं असं आदित्य श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.एएनआयशी बोलताना आदित्य म्हणाले, सुरुवातीला थोडं अवघड वाटलं मात्र नंतर मला आनंद झाला.

    ते म्हणाले, मी फक्त पहिल्या 70 मध्ये य़ेण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो, जेणेकरुन आयएएसमध्ये मला प्रवेश मिळेल. या प्रवासात आलेल्या अडथळ्यांबद्दल ते सांगतात, अडथळे तर असतातच पण तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावं लागतं. चुका ओळखून त्यात सुधारणा करावी लागते. आपण चुका सुधारू शकतो हे आपल्याला एरव्ही माहितीही नसतं.

  6. लंडन : मुस्लिम विद्यार्थिनीची शाळेतल्या नमाज बंदीविरोधातली याचिका फेटाळली

    लंडन स्कूलमधील एका मुस्लिम विद्यार्थिनीची नमाज बंदीविरोधात अपील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

    वेम्बलीमधील मिशेला स्कूलमधील विद्यार्थिनी नमाज बंदी ही भेदभावपूर्ण असल्याचं म्हणत हाय कोर्टात पोहोचली होती.

    मिशेला स्कूलने हाय कोर्टात म्हटलं की, नमाज पढण्याची परवानगी देण्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये योग्य संदेश जाणार नाही.

    83 पानांच्या या निकालपत्रात जस्टिस थॉमस लिंडेन यांनी म्हटलं,“जेव्हा याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने शाळेत प्रवेश घेतला, तेव्हा धर्माचं प्रदर्शन करण्याच्या तिच्या क्षमतेवर मर्यादा येतील हे मान्य केलं होतं.”

    या फ्री स्कूलच्या संस्थापिका आणि हेड टीचर कॅथरिन बिरबल सिंह यांनी हायकोर्टाचा हा निर्णय सर्वच शाळांसाठी विजय असल्याचं म्हटलं आहे.

    याचिका फेटाळून लावल्यावर या विद्यार्थिनीनं म्हटलं की, ती शाळेतच राहील आणि आपलं लक्ष जीसीएसई परीक्षेवर केंद्रित करू.

    या विद्यार्थिनीने म्हटलं की, “न्यायालयात मी हरले असले तरी अपील करून मी योग्यच केल्याचं मला वाटतं. मी स्वतःप्रति आणि आपल्या धर्माप्रति प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला.”

    लंडन स्कूलमधील विद्यार्थिनी

    फोटो स्रोत, CABINET OFFICE

  7. नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे 'चॅम्पियन' आहेत - राहुल गांधी

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

    काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे, भाजप संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तर इंडिया आघाडी संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतेय.

    ते म्हणाले, “महागाई, बेरोजगारी आणि सहभाग हे या निवडणुकीचे मुद्दे आहेत. कधी मोदी समुद्राखाली जातात, कधी आकाशात जातात, पण मोदी किंवा भाजप या मुद्द्यांवर बोलत नाहीत."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    “अलीकडेच मोदींनी एएनआयला एक मुलाखत दिली, जी स्क्रिप्टेड होती. पारदर्शकतेसाठी इलेक्टोरल बाँड आणले होते, असे पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे, जर हे खरे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द का केले? जर तुम्हाला पारदर्शकता आणायची होती तर ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे का लपवायची?"

    ‘एखाद्या कंपनीला कंत्राट मिळाले तर भाजपला पैसे मिळतात’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. कंपनीवर ईडी, सीबीआय कारवाई होते, 10-15 दिवसांनी भाजपला डोनेशन मिळते, असंही ते म्हणाले.

    रस्त्यावर याला खंडणी म्हणतात. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला.