झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर शादाब भावुक, बाबर आझमवर वसीम अक्रम चिडले

फोटो स्रोत, Twitter
टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप -2 च्या सुपर 12 सामन्यात गुरुवारी (27 ऑक्टोबर) झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावाने पराभव केला.
या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेटवर टीका करण्यात येत आहे आणि चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केलीय. झिम्बाब्वे क्रिकेट टीमला पाकिस्तान टीमच्या तुलनेत कमकुवत मानलं जात होतं. परंतु या पराभवामुळे पाकिस्तान टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वी पाकिस्तानला भारताने चार विकेट्सने हरवलं होतं. सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्याने टी-20 वर्ल्ड कप सेमी-फायनलचा मार्ग पाकिस्तानसाठी आता कठीण आहे.
झिम्बाब्वेनं पाकिस्तानला 131 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि हे खूप कठीण लक्ष्य मानलं जात होतं. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सला आपल्याच लोकांची टीका ऐकावी लागत आहे.
पाकिस्तानचे कर्णधार बाबर आजम आणि विकेट कीपर मोहम्मद रिझवान लवकर आऊट झाले होते. दोघं आऊट झाल्याने पाकिस्तानची मिडल ऑर्डर कोलमडली होती.
शान मसूद पाकिस्तानला जिंकवण्यासाठी संघर्ष करताना दिसला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शान मसूद आणि शादाब खान यांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आलं. परंतु झिम्बाब्वेच्या बॉलिंगमुळे पाकिस्तानचा पराभव झाला.
या निकालाचा परिणाम केवळ चाहत्यांवर नाही तर खेळाडूंवरही दिसून येत आहे. खेळाडू हैराण आणि दु:खी आहेत. पाकिस्तानचे काही खेळाडू तर भावनिक होताना दिसले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
शादाब खान भावुक झाल्याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये शादाब पव्हेलियनमध्ये भावुक झाल्याची दृश्य दिसत आहेत. मीडिया मॅनेजर त्यांना सांभाळत आहेत आणि तिथून त्यांना आतमध्ये घेऊन जाताना दिसले.
पाकिस्तान मीडियानुसार, शादाबचा हा व्हीडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड केला आहे.
दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला आता आणखी तीन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाकिस्तानला हे तीन सामने जिंकावे लागतील.
पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम कर्णधार बाबर आजम यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलं. झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्याने टीमच्या निवडीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ए स्पोर्ट्सशी बोलताना वसीम अक्रम म्हणाले, "ऑस्ट्रेलियाच्या पिचबाबत तुम्हाला कल्पना आहे पण कोणतंही नियोजन नाही. हे सर्व काम कर्णधाराचे आहे. पाकिस्तानची मिडल ऑर्डर कमकुवत आहे हे आम्हाला माहिती आहे. आता हा मुलगा बसला आहे, शोएब मलिक. मी कर्णधार असतो तर माझं लक्ष्य केवळ वर्ल्ड कप असतं. त्यासाठी जर मला गाढवालाही बाप बनवावं लागलं तर बनवेन."
"मला शोएब मलिक हवा असल्यास मी निवड समितीला तसं सांगितलं असतं. तोपर्यंत मी खेळणार नाही अशीही भूमिका घेतली असती. बाबरला आणखी बुद्धीमान व्हावं लागेल. ही काही गल्लीतली टीम नाही की माझं कोणी ओळखीचं येईल. मी असतो तर सर्वप्रथम शोएब मलिकला मध्यक्रमात ठेवलं असतं,"
वसीम अक्रम जेव्हा ही प्रतिक्रिया देत होते तेव्हा त्यांच्यासोबत शोएब मलिक, वकार युनूस आणि मिसबाह उल हक होते. पाकिस्तानचा पुढचा सामना 30 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दरम्यान वकार युनूस यांना वाटतं की मध्य क्रमावर संताप व्यक्त केला जात असला तरी ओपनर्सनेही धावा केल्या नाहीत.
ते म्हणाले, "कर्णधार असता तेव्हा तुम्ही प्रयोग करता आणि इतरांनाही संधी देता. कर्णधार स्वत: असुरक्षित आहे. कर्णधाराला थोडा त्याग करावा लागेल. त्याला टीमचा विचार करावा लागेल. कर्णधार आणि लीडर यात हाच फरक असतो."
वसीम अक्रम म्हणाले की, त्यांनी पीएसएलमध्ये बाबर आजमला तिसऱ्या क्रमांकावर येण्यास सांगितलं होतं पण त्याने नकार दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये बाबर आजमवरून वाद सुरू आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर युनूस खान यांनी एआरवाय न्यूजशी बोलताना सांगितलं, "आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता खूप कमी आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर खूप निराशा आहे."
माजी क्रिकेटर कामरान अकमल म्हणाले, "झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तान काहीच खेळला नाही. शाहीन शाह अफरीदीला बॅटिंगसाठी पाठवलं जेव्हा की त्याची तब्येत बरी नाही. कर्णधार आणि कोच यांची भूमिका निराशाजनक होती. आमच्या टीमचे खेळाडू वैयक्तिक हेतू घेऊन गेले. सगळे आपल्या इगोमध्ये निर्णय घेत आहेत. बाबरने या वर्ल्ड कपनंतर कर्णधार राहू नये. तो खूप अंडर प्रेशर आहे. त्याची बॅटींग यामुळे राहिल. विराट कोहलीसोबतही असे झाले आहे."
युनूस खान म्हणाले, "बाबर वारंवार चुका करत आहे. बाबरच्या कर्णधारशीपमध्ये स्पार्क नाही. एका देशाला लीड करण्यासाठी मोठा लीडर बनावं लागतं. बाबरमध्ये हे दिसत नाहीय. बाबर चांगला बॅट्समन आहे. पण चांगला कर्णधार नाही. मी चार वेळा कर्णधार पद सोडलं होतं. तुम्हाला तुमच्या लोकांशी डील करायचं असतं तेव्हा लीडरशीपची कसोटी असते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)