थायलंड : पाळणाघर हत्याकांडात मुख्यत्वे चाकूचा वापर, दिसेल त्याची हत्या

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडमध्ये एका पाळणाघरात माजी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 22 लहान मुलांचाही समावेश आहे.
नोंग बुआ लंफु या शहरात हा हल्ला झाला. थायलंडच्या ईशान्य भागात हे शहर वसलं आहे.
या हल्ल्यात अनेक लहान मुलं आणि माणसं मारली गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचं नाव पान्या खामराब असं आहे. तो 34 वर्षांचा असून थायलंड पोलिसांत तो लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होता. पण त्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढूनही टाकण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Google
खामराब याच्यावर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणावरून त्याच्यावर खटलाही चालवण्यात येत होता.

फोटो स्रोत, CIB_THAILAND
संबंधित पाळणाघरात पान्या हा वारंवार आपल्या मुलांची भेट घेण्यास येत होता. त्याची वागणूक त्यावेळी सामान्य असायची. पण आज (गुरुवार) पान्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला असता तो तिथे दिसला नाही.

यानंतर त्याने पाळणाघरातील उपस्थितांवर अंदाधुंद गोळीबार केला. याशिवाय त्याने लोकांवर चाकूहल्लाही केला. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
यादरम्यान, त्याने पादचाऱ्यांवरही गाडी चढवली. यानंतर त्याने घरी जाऊन आपली पत्नी आणि मुलालाही ठार केलं. अखेरीस पान्या खामराब याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अशा प्रकारचे हल्ले थायलंडमध्ये दुर्मिळ आहे. 2020 मध्ये एका सैनिकाने 21 लोकांची हत्या केली होती आणि अनेक लोक जखमी झाले होते. नाखोन रचिश्मा भागात ही घटना घडली होती.
"मारेकरी लंचच्या वेळी आला आणि त्याने डे केअर सेंटरच्या चार पाच अधिकाऱ्यांना मारलं." असं स्थानिक अधिकारी जिडपा बोनसोम यांनी सांगितलं. त्या तिथे काम करत होता. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मारल्या गेलेल्या लोकांपैकी एक शिक्षिका होती आणि ती आठ महिन्यांची गरोदर होती.
"आधी लोकांना फटाक्याचा आवाज येतोय असं वाटलं." असं त्या म्हणाल्या. नंतर तो मारेकरी एका कुलुपबंद खोलीत गेला. तिथे लहान मुलं झोपली होती.
सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हीडिओ शेअर झाले आहेत. त्यात जी बालकं मारली गेली त्यांचे शोकमग्न पालक दिसत आहेत. ही घटना घडल्यानंतर ते तिथे गोळा झाले होते.
जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा विदारक दृश्य दिसलं. सगळीकडे मृतदेह होते. त्यात अनेक बालकंही होती.
"आम्ही जेव्हा घटनास्थळाचा आढावा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आलं की मारेकरी बळजबरीने तिथे घुसला होता. त्याने चाकूचा वापर केला. मारली गेलेली अनेक बालकं अगदी लहान वयाची होती." असं पोलीस प्रमुख दाम्रोनग्साक किट्टीपरत यांनी सांगितलं.
"त्यानंतर तो बाहेर आला आणि समोर जो व्यक्ती आला त्याची हत्या केली. नंतर तो घरी आला. आम्ही त्याच्या घराला वेढा घातला. नंतर त्याने आत्महत्या केल्याचं कळलं." ते पुढे म्हणाले.
ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं पंतप्रधान चान ओ-चा म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























