You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तरुणाईः वयाची तिशी येण्याआधी तरुणांनो 'या' 7 सवयी बदला
वयाची तिशी गाठल्यावर आपण आपल्या जीवनातील एका नवीन टप्प्यावर येतो. या काळात तुम्ही काही अनावश्यक सवयी बदलल्या पाहिजेत. काही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
तिशीमध्ये तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी काही सवयी तुम्ही बदलल्या पाहिजेत. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
1. ब्रेकफास्ट केलाच पाहिजे
तुम्ही कामात व्यग्र आहात म्हणून नाष्टा न करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य सवय आहे.
'द 30-डे हार्ट ट्यून-अप'चे लेखक डॉ. स्टीव्हन मास्ले यांच्या मते, तुम्ही नाष्टा न केल्यास, दीर्घकाळ उपवास केल्याने तुमचे पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन वाढू शकतं आणि वारंवार संसर्ग होऊ शकतात.
2. फॅट असणारे पदार्थ कमी करा
30 व्या वर्षी फॅटी बर्गर खाणं कमी केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या 30 व्या वाढदिवसाआधी तुमच्या खराब आहाराच्या सवयी बदलणे चांगलं.
तुमच्या आहारात फळे आणि भाज्या खा. सोबत घरी शिजवलेल्या आयोग्यदायी जेवणांना प्राधान्य द्या.
अर्थात फास्ट फूड पूर्णपणे कमी करणं गरजेचं नाही. पण चांगल्या पर्यायांची जाणीवपूर्वक निवड करायला आहे.
3. आजच मद्यपान थांबवा
बिअर पिणे आणि टकीलाचा एक राउंड घेणे हे अगदी विशीमध्ये सुरू होतं.
हे जितके रोमांचक आहे तितके किमान तुमच्या शरीरासाठी चांगले नाही.
वयाच्या तिशीकडे झुकताना अल्कोहोलचे सेवन कमी करणं आरोग्यासाठी चांगले आहे. तीच बाब धूम्रपानाबद्दलही लागू होते.
4. अनावश्यक भांडणात न पडण्याची कला शिका
जसं वय वाढत जावून तुम्ही मोठे होत जाता तसं तुमच्या लक्षात येतं की बहुतेक समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात किंवा त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
बारमध्ये मारामारी केल्यामुळे तुम्ही मूर्ख दिसता.
5. बांधिलकी म्हणजे शिक्षा नव्हे
वयाच्या विशीमध्ये अनेक पुरुष नातेसंबंध जोडण्यास घाबरतात, त्याचे कारण म्हणजे आयुष्यात अनुभव घेण्यासारखं खूप काही आहे.
पण वयाच्या तिशीपर्यंत एखाद्याने आधीच बराच अनुभव घेतला असेल तर बांधिलकी इतकी भीतीदायक वाटत नाही.
6. टेक्स्ट मेसेज टाळा, कॉल करा!
टेक्स्ट मेसेजवर अडचणींना सामोरे जाण्याची आणि फोन कॉल टाळण्याचा आग्रह ही खरं तर खूप वाईट सवय आहे.
टेक्स्ट मेसेज खऱ्या भावना व्यक्त करत नाहीत आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
जर्नल ऑफ कपल अँड रिलेशनशिप थेरपीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे पुरुष आपल्या जोडीदाराला दिवसातून अनेक वेळा वाद सोडवणे किंवा निर्णय घेणे यांसारख्या सांसारिक गोष्टींबद्दल टेक्स्ट मेसेज पाठवत होते त्यांच्या नात्यातील गुणवत्ता कमी असल्याचे नोंदवले गेले.
संशोधकांना खात्री आहे की टेक्स्ट मेसेजमुळे तुम्हाला वैयक्तिक संभाषण करताना मिळणार्या भावनिक प्रतिक्रियांना मुकावे लागते.
7. बेदरकार ड्रायव्हिंग बंद करा
वेगात गाडी चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि गाडी चालवत असताना टेक्स्ट मेसेज करणे हे कोणत्याही वयात घडतं आणि 30 व्या वर्षी असे वागणं अपरिपक्वपणाचं ठरतं .
कारण हे फक्त तुमचाच जीव धोक्यात घालत नाही तर इतरांसाठीही धोकादायक असतं.
कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, "गाडी चालवत असताना तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर स्वत:ला किंवा दुसऱ्याला मारण्यापूर्वी गाडीच्या चाव्या बंद करा. नाहीतर बसने प्रवास करा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)