अमेरिकेत लहान बाळांना मिळत नाहीये पुरेसं अन्न

बेबी फॉर्म्युला

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

लहान मुलांसाठी असलेल्या अन्नपदार्थांची (बेबी फॉर्म्युला) टंचाई असलेल्या अमेरिकेत आंतरराष्ट्रीय अन्नपदार्थ कंपन्यांनी अतिरिक्त उत्पादने पाठविण्यास सुरुवात केली आहे.

नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडमधून आपली काही उत्पादने अमेरिकेत पाठविली जातील, अशी घोषणा नेस्लेने केली.

यूकेमधील रेकिट बेन्किसर या कंपनीने अमेरिकेतील उत्पादन 30 टक्क्यांनी वाढविल्याचे जाहीर केले आहे.

काही काळापासून अमेरिकेत लहान मुलांसाठीच्या अन्नपदार्थांची गंभीर स्वरुपाची टंचाई आहे. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, ही समस्या सोडविण्यास पुढील काही महिन्यांचा कालावाधी लागेल.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कार्यवाही सुरू केली.

अमेरिकेतील बेबी फॉर्म्युला पावडरचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या अॅबॉट लॅबोरेटरीजने मिशिगन कारखान्यात उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी तजवीज करण्याचे मान्य केले आहे. पण कारखाना सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष उत्पादन पुन्हा सुरू होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागेल, असे सांगितले जाते.

हानिकारक जीवाणू आढळल्यानंतर दक्षिण डाकोटा येथील कारखाना फेब्रुवारीमध्ये बंद झाला; उत्पादन थांबविण्यात आले आणि बाजारात पाठविलेला बेबी फुड्स प्रकारातील माल परत मागविण्यात आला.

लहान बाळ

फोटो स्रोत, Getty Images

मध्यस्थांचा अभाव आणि लॉजिस्टिक्सच्या समस्यांमुळे इन्फंट फॉर्म्युला (12 महिन्यांखालील बाळांना पाजण्यात येणारा पदार्थ) क्षेत्रात आधीच कमतरता भासत होती. त्यात ही भर पडली. अखेर, बाजारात शिल्लक राहिलेल्या पदार्थांचा साठा करण्यासाठी पालकांनी बाजारात गर्दी केल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये बेबी फूड (लहान बाळांसाठी असलेले पदार्थ) मिळणे कठीण झाले आहे.

या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व्हाइट हाउसने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सोमवारी (1 ऑगस्ट) अमेरिकन अन्न व औषध प्रशासनालयाने घोषणा केली की, परदेशातून येणाऱ्या उत्पादनांसंदर्भातील काही नियम शिथिल करण्यासारख्या काही उपाययोजना करण्यात येत आहेत.

जानेवारीच्या तुलनेने एप्रिलमधील विक्री 13 टक्क्यांनी वाढल्याचे या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आणि बाजारात उत्पादनांची कमतरता असल्याची विधाने अतिशयोक्तीपूर्ण आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

विक्रीमध्ये वाढ होणे हा इन्फंट फॉर्म्युला सामान्यांसाठी अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याचा सकारात्मक संकेत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)