Karezza : सेक्स लाईफ सुधारण्यासाठीचं हे तंत्र आहे तरी काय?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

तुम्हाला तुमचं लैंगिक जीवन अधिक सुखकर करायचं आहे का? सेक्स गॅझेट्स आणि रोल प्ले ही सेक्स अधिक आनंददायी बनवण्याच्या मार्गांची फक्त दोन उदाहरणं आहेत. पण तुम्ही त्याहून अधिक चांगल्या पद्धतीनं सेक्स एन्जॉय करू शकता. यासाठी तुम्ही कधी करेझ्झा पद्धतीनं सेक्स करण्याचा विचार केला आहे का?

सेक्स करण्याचं हे केवळ एक तंत्र नसून ते तुम्हाला कामोत्तेजनाचे व्यवस्थापन करण्यास आणि शीघ्रपतनाचा सामना कसा करण्यास देखील शिकवतं.

एएनआय या वृत्तसंस्थेनं या तंत्राविषयी माहिती देणारी सविस्तर बातमी केली आहे.

करेझ्झा काय आहे?

करेझ्झा ही सभ्यपणे आणि हळूवार पद्धतीनं केलेली लैंगिक क्रिया आहे. करेझ्झाचा अर्थ अतिशय प्रेमानं केलेला शरीरस्पर्श असा होतो. carezza या इटालियन शब्दापासून करेझ्झा शब्दाचा उगम झाला आहे.

इतर प्रकारच्या लैंगिक क्रियांचा उद्देश हा सेक्स दरम्यान आनंद देण्यावर असतो. पण, करेझ्झाचा उद्देश आनंदापेक्षा आरामदायी पद्धतीनं आपल्या जोडीदारासोबत एकत्र राहणं हा आहे. करेझ्झामध्ये शारीरिक इच्छेपेक्षा दुसऱ्या व्यक्तीवरील आध्यात्मिक प्रेमावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

नेहमीच्या फोरप्लेच्याऐवजी करेझ्झाची सवय असणारी माणसं हसतमुख पद्धतीनं जवळ येतात आणि त्वचेचा त्वचेशी संपर्क ठेवण्यासारख्या क्रियांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवतात.

करेझ्झा तंत्र वापरणाऱ्या लोकांमध्ये सेक्स दरम्यानचा तणाव कमी असतो.

पण, मग करेझ्झा पद्धतीनं सेक्स कसा करायचा असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर इथं त्याविषयीच्या 6 सोप्या टीप्स देत आहोत.

1. तुमचा जोडीदार हुशारीने निवडा

करेझ्झा हे एका रात्रीच्या संबंधांसाठी वापरण्याचं तंत्र नाहीये. तर तुमच्यासोबत काही काळापासून रिलेशिनशिपमध्ये असलेला आणि तुम्ही विश्वास ठेवू शकत असलेल्या व्यक्तीसोबत सेक्स करताना हे तंत्र उत्तम पद्धतीन काम करू शकतं.

महिला

फोटो स्रोत, Thinkstock

दोन्ही जोडीदार जेव्हा सोबत असतात तेव्हा हे तंत्र वापरून सेक्स केल्यास ते एका उपचारात्मक पद्धतीसारखंच वाटतं. एका विश्वासार्ह पार्टनरसोबत हे तंत्र सर्वोत्तम परिणामकारक ठरतं.

2. हेतू स्पष्ट करा

हे तंत्र वापरण्यामागे तुम्ही आणि तुमच्या पार्टनरचा वेगवेगळा हेतू असू शकतो. त्यावेळी तुमच्या जोडीदाराला हे तंत्र वापरून सेक्स करण्याची इच्छा का आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.

3. आधी चांगला संवाद साधा

तुम्ही करेझ्झा तंत्र का वापरत आहात हे आधी एकमेकांसोबत संवाद साधून स्पष्ट करा. जेणेकरून दोघेही एकाच विचाराने पुढे जाल.

चांगल्या सेक्ससाठी एकमेकांची प्रेरणा जाणून घेणे आवश्यक असते. कारण दोन्ही पार्टनरचा सेक्ससाठीचा हेतू वेगवेगळा असू शकतो.

4. नेमकं काय करायचं? ते जाणून घ्या

तुम्हाला मिठी मारण्यासाठी वेळेची ठरावीक मर्यादा घालायची आहे किंवा संभोगाच्या टप्प्यात अधिक वेगाने पुढे जायचे असल्यास त्यासाठी तुमच्याकडे सुरक्षित शब्द आहेत का? तुमच्या शरीरावर असे काही भाग आहेत का जिथे तुम्हाला जास्त स्पर्श करायला आवडेल किंवा तुमच्या शरीराच्या कोणत्या भागाला स्पर्श केला जाऊ नये असे तुम्हाला वाटेल? तुम्हाला ऑर्गझमला उशीर करायचा आहे का किंवा तुम्ही आणि तुमचा प्रियकर ते कसे कराल? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं आधी तयार ठेवा.

सुरळीतपणे सेक्स करण्यासाठी या सर्व प्रकारच्या समस्या आणि कल्पनांचं निराकरण करणं श्रेयस्कर ठरतं. तसं न केल्यास इतर कोणत्याही लैंगिक तंत्राप्रमाणेच या पद्धतीनं केलेला सेक्स पूर्ण होईल.

Asexual

फोटो स्रोत, PeopleImages

5. कमी वेळेत अशी सुरुवात करा

करेझ्झा हा अध्यात्मिक संभोगाचा एक प्रकार आहे जो तासनतास करता येऊ शकतो. बर्‍याच लोकांना पाच ते दहा मिनिटांत सेक्स आटोपण्याची सवय असते किंवा या कालावधीत तो संपुष्टात येतो.

तुमच्या जोडीदाराच्या शरीरावरील वेगवेगळ्या भागांवर हळूवारपणे हात फिरवा, त्यांच्यावर प्रेम करा. तुम्हा दोघांना जे चांगले वाटेल, ज्यातून आनंद मिळेल, ते करा.

6.ऑर्गझमबाबत (orgasm) काळजी करू नका

जर एखाद्या व्यक्तीने करेझ्झा तंत्र वापरून सेक्स करताना ऑर्गझमचा अनुभव घेतला तर तेव्हाही त्याला करेझ्झा असंच संबोधलं जात का? या प्रश्नावर सेक्स थेरपिस्ट म्हणतात की, "जर तुम्ही पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा करेझ्झा प्रक्रियेचा अवलंब करत असाल तर अनावधानाने झालेला ऑर्गझम अनपेक्षित नसतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)