व्यायामः हा आरसा तुमच्याकडून व्यायाम करून घेईल

आरसा

फोटो स्रोत, Ifit

    • Author, किट्टी पलमाई आणि विल स्मेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

व्यायाम करताना स्वत:ला आरशात पाहणं ही कल्पना लोकांना फारशी रुचत नाही. कारण ती वजनं उचलताना, ट्रेड मिलवर चालताना घामेजलेल्या अवस्थेत काही फारसे चांगले दिसत नाही.

तरी जिममध्ये जाणाऱ्या लोकांना माहिती असेल की काही लोकांना व्यायाम करताना स्वत:ला भल्यामोठ्या आरशात न्याहाळणं फार आवडतं.

अशा लोकांसाठी एक स्मार्ट आरसा बाजारात आला आहे. हा आरसा सहा फुट उंच, उभा आरसा आहे. हा एकदम आधुनिक आहे. तो कॉम्प्युटरला जोडलेला असतो, इंटरनेटशी जोडलेला असतो, तसंच त्यात व्हीडिओ स्क्रीन आहे.

या स्क्रीनमुळे तुमच्या ऑनलाईन ट्रेनरशी थेट कनेक्ट होता येतं. तो तुमचं प्रतिबिंब जिथे पडते तिथे उभा असतो.

त्याशिवाय या आरशाला कॅमेरा आणि स्पीकर लागलेला असतो. त्यामुळे ट्रेनर तुमच्या हालचाली पाहून त्यात काही बदल सुचवू शकतो.

या आरशात वैयक्तिक क्लासेस किंवा गटागटात क्लसेस करू शकतो..त्यात वजन उचलणं, कार्डिओ, योगा असे अनेक व्यायामाचे प्रकार आहेत.

साध्या दर्जाच्या आरशांमध्ये व्हीडिओ आणि आवाज एकतर्फी असतो. तुम्ही ट्रेनरला ऐकू किंवा पाहू शकता. किंवा तो तुम्हाला ऐकू किंवा पाहू शकतो. व्यायामाचे धडे कायम लाईव्हच असतात असं नाही. त्यात वर्कआऊट किंवा व्यायाम करतानाचे रेकॉर्ड केलेले व्हीडिओ असतात.

जर तुम्ही उच्च दर्जाचं मॉडेल घेतलं तर तुम्हाला ते 1000 पौंडाला पडतं. त्यात महिन्याचं सबस्क्रिप्शन असतं.

टचस्क्रीन असलेल्या या आरशांना सेन्सर असतात. त्यात आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स असतं. त्यामुळे तुमच्या व्यायामाचं विश्लेषण होतं आणि सुधारणाही सुचवल्या जातात.

वाहा नावाचा पहिला आरसा इंग्लंडमध्ये विकला गेला. याच नावाच्या जर्मन कंपनीने त्याची निर्मिती केली होती. तो गेल्या वर्षी बाजारात आला होता. टोनल, मिरर, पोर्टल नावाच्या कंपन्या ही अशा प्रकारचे रसे तयार करतात.

पण व्यायाम करताना स्वत:ला असं पाहण्याचा खरंच काही फायदा होतो का ?

iFIt या कंपनीचे पब्लिक रिलेशन ऑफिसर कोलीन लोगन म्हणतात की आरशात पाहिलं की युझर योग्य पद्धतीने स्वत:ला अडजस्ट करू शकतात.त्यामुळे वजन उचलण्याच्या व्यायामाचा योग्य फायदा होतो, तसंच कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घेतली जाते.

फिटनेस सायकॉलॉजिस्ट डॉ. अँटनी पॅप्थॉमस ही या दाव्याला दुजोरा देतात पण त्याच वेळी ते काही वेगळे मुद्देही मांडतात.

आरसा

फोटो स्रोत, Ifit

"मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसलं तर तुमच्याच व्यायामात सुधारणा करू शकता. विशेषत: धावणं आणि वजन उचलण्याचा व्यायाम." ते सांगतात.

"असं केल्याने व्यायाम अधिक कलात्मक पद्धतीने करण्याची प्रेरणा मिळते. तुमची शरीराची रचना बदलते आणि त्याचे फायदे तुम्हाला थेट दिसत असतात."

पॅप्थॉमस पुढे म्हणतात, "ज्यांना आपल्या शरीराबद्दल असुरक्षित वाटतं त्यांना या आरशासमोर कसं वाटत असेल याची मला चिंता वाटते. विशेषत: ज्या लोकांनी नुकताच व्यायाम करायला सुरुवात केली आहे किंवा ज्यांना जीवनशैलीत बदल आणायचे आहेत."

"जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनाही हा प्रश्न पडू शकतो. कारण काही लोकांच्या शरीराचा विशिष्ट भाग वाढलेला असतो, काही लोकांना खाण्याचे आजार असतात. अशा लोकांना सतत आपलं प्रतिबिंब आरशात पाहणं अडचणीचं ठरतं."

तसंच स्मार्ट वेलनेस मिरर आता बाजारात आले आहेत. त्यात सेन्सर आणि AI चा वापर होतो. त्यामुळे युझरची स्कीन आणि शरीरातले अंतर्गत बदल ठळकपणे दिसून येतात.

डॉ. अनुब पाक्कर हार्ले स्ट्रीट स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये ब्युटी कन्सल्टंट आहेत. त्यांच्या मते 'mirror mirror on the wall, who's the fairest of them all' ही प्रसिद्ध ओळ आता प्रत्यक्षात आली आहे.

आरसा

फोटो स्रोत, Care OS

या आरशाला स्पर्श होत नाही त्यामुळे ते किती तंतोतंत आहेत याबद्दल पाक्कर यांना शंका आहे. काही आजारांचं निदान करण्यासाठी स्पर्श करण्याची गरज असते जेणेकरून रोगाचं योग्य पद्धतीने निदान होईल.

AI, Augmented reality, तसंच Facial recognition या तंत्रज्ञानामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याचं अवलोकन घरच्या घरी करण्याची संधी मिळाली आहे असंही ते पुढे म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ डॉ. एलेना टॉरोनी यांना फिटनेस आणि स्मार्ट मिरर यांच्याबद्दल शंका आहे.

त्या म्हणतात, "जे लोक स्वभावानेच आधीच फार परिपूर्ण असतात किंवा ज्या लोकांना त्यांच्या शरीराची पूर्ण माहिती असते त्यांना त्यांच्या शरीरातील अडचणी अशा पद्धतीने पाहणं वेदनादायी असू शकतं."

लोक परफेक्शन किंवा अती परिपूर्ण होण्याच्या मागे लागू शकतात असं मानसशास्त्रज्ञ ली चेम्बर्स यांना वाटतं. तरीही आरोग्यविषयक सुधारणा करण्याची ताकद या आरशांमध्ये असं त्यांना वाटतं.

ज्या लोकांना जिम मध्ये जायला वेळ नसतो तरीही त्यांच्यासाठी हा आरसा म्हणजे योगदान आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)