ICC महिला वर्ल्डकप : ऑस्ट्रेलियाची सातव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी

फोटो स्रोत, Getty Images
आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या फायनल्समध्ये इंग्लंडला हरवत ऑस्ट्रेलियन टीमने सातव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.
रविवारी (3 एप्रिल) न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे पार पडलेल्या महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी इंग्लंडचा पराभव केला.
महिला वर्ल्डकप 2022च्या अंतिम सामन्यासाठी नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड ठेवली. आणि पाच विकेट्सवर 356 धावसंख्या उभारली.
महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रचंड धावसंख्येमध्ये अॅलिसा हिलीने विक्रमी 170 धावा केल्या. तिने आपल्या खेळीसाठी 138 चेंडूमध्ये 26 चौकार मारले. हेलीशिवाय रेचेल हेन्स (68) आणि बेथ मुनी (62) यांनीही अर्धशतके झळकावली.

महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम हा हिलीच्या नावावर झालाय. तिने तिच्या 170 धावांच्या खेळीने हा विक्रम केला.
याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या नावावर होता. तिने 2005 मध्ये महिला वर्ल्डकप फायनलमध्ये भारताविरुद्ध 105 धावा काढल्या होत्या.
हिलीचं हे सलग दुसरं शतक आहे. सेमीफायनल्समध्ये ही तिने वेस्ट इंडिजविरुद्ध 129 धावांची खेळी केली होती.
शतकांच्या विक्रमाबरोबरच हिलीने तिच्या कोणत्याही वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केलाय.
हिलीने 62 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल आणि पुढच्या 38 चेंडूत तिने शतक ठोकलं.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 43.4 ओव्हर्समध्ये 285 धावा करून ऑल आऊट झाला आणि सामना 71 धावांनी गमवावा लागला.
इंग्लंडचा डाव
इंग्लंडकडून नताली सिव्हरने शतक झळकावलं. पण तिचं शतक व्यर्थ गेल. 45 ओव्हर पूर्ण होण्यापूर्वीच 285 धावांवरचं इंग्लंडचा डाव गुंडाळला गेला.
संघासाठी नताली सिव्हरने 121 चेंडूत सर्वाधिक 148 धावा काढल्या. तर उर्वरित खेळाडू 25 धावांच्या आसपासचं बाद झाले. नेट स्कीव्हरने 15 चौकार आणि 1 षटकार मारत ही धावसंख्या उभारली.
ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग आणि जेस जॉन्सनने प्रत्येकी तीन, तर मेगन स्कॉटने दोन आणि टालिया मॅक्ग्राथ आणि ऍशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























