मोस्ट वाँडेट गुन्हेगार 12 वर्षांनी 'असा' सापडला, वेशांतर करून निवांत राहायचा..

फोटो स्रोत, QUEENSLAND POLICE
तब्बल 12 वर्षांच्या शोधमोहिमेनंतर ऑस्ट्रेलियाला फरारी गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. ग्रॅहम पॉटर असं या 64वर्षीय गुन्हेगाराचं नाव आहे.
व्हिक्टोरिया राज्यात 2010 साली एका खूनाच्या खटलातील कथित आरोपी म्हणून त्याचं नाव होतं. ग्रॅहम न्यायालयात उपस्थित राहिला नव्हता. सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. क्वीन्सलँडमध्ये ग्रॅहम हजार किलोमीटर अंतरावर असल्याचं पोलिसांना कळलं होतं.
त्याच्या अटकेचं फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याला पडझडलेल्या एका घरातून त्याला पकडण्यात आलं. बेड्या घालून त्याला अटक करण्यात आली.
सोमवारी सकाळी 8.45 वाजता क्वीन्सलँड उत्तरेच्या रावेनशू इथे पॉटरला अटक करण्यात आली.
एका लहान मुलीचा शिरच्छेद करून तिच्या हत्येप्रकरणी दोषी आढळल्याने पॉटर याला 1981 मध्ये आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 15 वर्षं शिक्षा भोगल्यानंतर तो बाहेर आला आणि पुन्हा त्याने दुसरे गुन्हे केले.
फरार असताना पॉटर याच्यावर एक्सटसी आणि कोकेन या अंमली पदार्थांचा 440 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतक्या रकमेचा साठा केल्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त खूनाच्या कटाचा आरोपही पॉटर याच्यावर होता.
देशात काही ठिकाणी तो दिसला होता मात्र अधिकृत पातळीवर त्याला दुजोरा मिळाला नाही. 2017 मध्ये पोलिसांना पॉटरचा शोध घेण्यासंदर्भात कोणताही सुगावा मिळाला नाही असं ऑस्ट्रेलियाच्या द एज वृत्तपत्राने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने पॉटरला शोधून देणाऱ्याला 1 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
अटक टाळण्यासाठी पॉटरने त्याच्या दिसण्यात, वेशभूषेत बदल केला. त्याचा बदल कळू शकेल अशा हेअर डायसह तो पकडला गेला.
अतिशय गंभीर आरोपांप्रकरणी दोषी पॉटर सापडल्याने मोठ्या शोधमोहिमेचा शेवट झाला आहे असं अॅक्टिंग असिस्टंट कमिशनर ऑफ क्राईम कमांडचे मिक फ्रेवेन यांनी म्हटलं आहे.
पॉटर यांना क्वीन्सलँडहून व्हिक्टोरियाला पाठवण्यात येईल, तिथे त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























