You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021 UAE: बदली खेळाडूंची चंगळ; 16 खेळाडूंचा प्रवेश
इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामाचा उर्वरित टप्पा आजपासून सुरू होतो आहे. विविध कारणांमुळे अनेक संघांमध्ये बदल झाले आहेत. एकूण 16 बदली खेळाडू हंगामाच्या उत्तरार्धात दिसतील.
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सऐवजी ऑस्ट्रेलियाच्या बेन ड्वारशियूसला संघात समाविष्ट केलं आहे.
युवा एम. सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाल्याने नेट बॉलर म्हणून संघाबरोबर असलेल्या कुलवंत खेजरोलियाला मुख्य संघात प्रवेश मिळाला आहे. खेजरोलिया याआधी मुंबई आणि बेंगळुरू संघात होता.
मुंबई इंडियन्सने मोहसीन खानऐवजी रुश कलारियाची निवड केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज रुश गुजरातकडून खेळतो.
पंजाब किंग्स संघाने कोट्यवधी रुपये खर्चून झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ यांना संघात समाविष्ट केलं होतं. हे दोघेही खेळू शकणार नसल्याने पंजाबने ऑस्ट्रेलियाचाच नॅथन एलिस आणि इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदला संघात घेतलं आहे.
एलिसने पदार्पणातच हॅट्टिकची किमया केली होती. इंग्लंडच्या डेव्हिड मलानने माघार घेतल्याने पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमला संघात पाचारण केलं आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अँड्यू टाय, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर हे प्रमुख खेळाडू नसतील.
राजस्थानने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सी, न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलीप, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस आणि आक्रमक फलंदाज एव्हिन लुईस यांना संघात समाविष्ट केलं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेंगळुरू संघातही घाऊक बदल झाले आहेत. अॅडम झंपा, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, फिन अलन आणि वॉशिंग्टन सुंदर खेळणार नाहीत. त्यांच्याजागी श्रीलंकेची जोडी वनिंदू हासारंगा आणि दुश्मंत चमीरा यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडचा जॉर्ज गार्टनला संघात घेण्यात आलं आहे. आक्रमक फटकेबाजी प्रसिद्ध टीम डेव्हिड तसंच आकाशदीपला प्रवेश मिळाला आहे.
सनरायझर्स हैदराबादने जॉनी बेअरस्टोऐवजी वेस्ट इंडिजच्या शेरफन रुदरफोर्डला संघात समाविष्ट केलं आहे. रुदरफोर्ड याआधी दिल्ली आणि मुंबई संघात होता.
कसे आहेत संघ?
सनरायझर्स हैदराबाद
डेव्हिड वॉर्नर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, केन विल्यमसन (कर्णधार), वृद्धिमान साहा, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, जेसन होल्डर, शाहबाझ नदीम, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, विजय शंकर, विराट सिंग, बसिल थंपी, रशीद खान, टी.नटराजन, खलील अहमद, केदार जाधव, जगदीश सुचिथ, मुजीब उर रहमान.
नवीन- शेरफन रुदरफोर्ड
किंग्ज इलेव्हन पंजाब
के.एल. राहुल (कर्णधार) ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नालकांडे, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, मॉइझेस हेन्रिके, फॅबिअन अॅलन, जलाज सक्सेना, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग.
नवीन- आदिल रशीद, एडन मारक्रम, नॅथन एलिस
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टिअर नील, अॅडम मिलने, पीयुष चावला, जेम्स नीशाम, युधवीर चरक, अर्जुन तेंडुलकर, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडुलकर.
नवीन- रुश कलारिया
कोलकाता नाईट रायडर्स
आयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरिन, राहुल त्रिपाठी , वरुण चक्रवर्ती, टीम सैफर्ट, शकीब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, शेल्डॉन जॅक्सन, वेंकटेश अय्यर, वैभव अरोरा.
नवीन- टीम साऊदी
दिल्ली कॅपिटल्स
श्रेयस अय्यर ,अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (कर्णधार), अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, मार्कस स्टॉइनस, प्रवीण दुबे, शिमोरन हेटमायर, अँनरिक नॉर्किया, ललित यादव, टॉम करन, स्टीव्हन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, ल्युकमन मेरिवाला.
नवीन- कुलवंत खेजरोलिया, बेन ड्वारशियूस
चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, , लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, सॅम करन, जोश हेझलवूड, के.गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के.भगत वर्मा, सी.हरिथ निसांथ, एम.हरिसंकर रेड्डी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल, शाहबाझ अहमद, जोश फिलीप, पवन देशपांडे, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभूदेसाई, के.एस.भरत.
नवीन- वानिंदू हासारंगा, दुश्मंत चमीरा, जॉर्ज गार्टन, टीम डेव्हिड.
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुस्ताफिझूर रहमान, लायम लिव्हिंगस्टोन, आकाश सिंग, के.सी.करिअप्पा, कुलदीप यादव.
नवीन- तबरेझ शम्सी, ग्लेन फिलीप, ओशाने थॉमस, इव्हिन लुईस
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)