कोरोना लसः लशीऐवजी दिलं सलाईन? 8000 लोकांना पुन्हा लस घ्यायला सांगितलं

फोटो स्रोत, HAUKE-CHRISTIAN DITTRICH/getty images
उत्तर जर्मनीतल्या जवळपास 8000 लोकांना प्रशासनाने पुन्हा लस घ्यायला सांगितली आहे.
या लोकांना एका परिचारिकेने लशीऐवजी सलाईन वॉटरचं इंजेक्शन दिल्याचा संशय आहे.
पोलीस आता या प्रकरणी पुढे चौकशी करत आहेत. ही घटना फ्राईजलँडमध्ये घडली आहे.
स्थानिक रेडिओ एनडीआरने म्हटलंय की जवळपास 8557 लोकांना पुन्हा लस घ्यायला सांगितली आहे आणि त्यातल्या 3600 लोकांच्या अपॉइंटमेटं कन्फर्म झाल्या आहेत.
या लोकांपैकी अनेक जण सत्तरीच्या वरचे आहेत आणि 'हाय रिस्क' गटातले आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात सुरुवातीला फक्त 6 जणांना या इंजेक्शनव्दारे सलाईन दिलंय असं वाटत होतं.
आपल्या हातून लशीची बाटली फुटल्यामुळे 6 लोकांना सलाईन टोचलं होतं, असं या परिचारिकेने एप्रिल महिन्यात मान्य केलं होतं.
पण पोलिसांच्या तपासात लक्षात आलं की फायजर लशीऐवजी अनेकांना सलाईन टोचलं गेलंय.
स्युडडॉयच झायटुंग या जर्मन वर्तमानपत्राने लिहिलंय की या प्रकरणी तपास करणारे पीटर बीअर यांनी म्हटलं, "ही 40-वर्षांची महिला 'कोरोनाशी संबधित संवेदनशील माहिती' सोशल मीडियावर शेअर करत होती आणि सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी उचललेल्या पावलांवर सतत टीका करत होती."
लोकांना लशीऐवजी सलाईन देण्यामागे काही राजकीय हेतू असू शकतो ही शक्यता अजून पोलिसांनी फेटाळून लावलेली नाही.
पण या परिचारिकेच्या वकिलांनी मात्र याचा इन्कार केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना लशीऐवजी सलाईन दिलं गेलं याचाही त्यांनी इन्कार केला आहे.
या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहे पण अजूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
जर्मनीत कोरोना व्हायरच्या काळात लशीविरोधात अनेक निदर्शनं झाली आहेत. अतिउजव्या लोकांचा लशींना विरोध आहे आणि त्यांनी कोव्हिडचे सरकारी आकडे मान्य करायला नकार दिला आहे. कोव्हिड -19 पसरतोय हे त्यांना मान्य नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























