फिलीपिन्समध्ये लष्कराच्या विमानाला झालेल्या अपघातात 45 जण मृत्यूमुखी

दक्षिण फिलीपिन्समध्ये रविवारी (4 जुलै) लष्कराचं विमान कोसळलं. या विमानात 90 हून अधिक प्रवासी होते. यातील बहुतांश जण सैनिक होते.
आतापर्यंत या दुर्घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
मृतांमध्ये बहुतांश सैनिकांचाच समावेश आहे, तर तीन सामान्य नागरिकही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.
हे नागरिक विमानात नव्हते, तर विमान जिथे कोसळलं त्या ठिकाणी उपस्थित होते.
फिलीपिन्सचे लष्करप्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी या घटनेची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी AFP या वृत्तसेवा संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, C-130 हे विमान सुलु प्रांताच्या जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळलं.
विमान कोसळल्यानंतर आग लागली.
सोबेजाना यांनी सांगितलं की, बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानातील लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
AFP च्या वृत्तानुसार, नुकतीच लष्करी प्रशिक्षणाची पदवी प्राप्त केलेले सैनिक या विमानात होते. मुस्लीमबहुल अशांत क्षेत्रात कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी त्यांना तैनात केलं जाणार होतं.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण फिलीपिन्समध्ये अनेक कट्टरतावादी गट आहेत. त्यामुळे तिथं मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























