अतिशय आनंद झाल्यावर आपण जोरात का किंचाळतो?

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपण का ओरडतो?
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

"मी खूप घाबरले होते, मात्र हा क्षण मला अनुभवायचा होता. मी बराच काळ तिथे होते. पण माझे डोळे बंद होते. हे मी पुन्हा करणार नाही हे माझ्या डोक्यात होतं."

आठ वर्षांच्या अलेक्झांड्रा मेंडोजाने रोलरकोस्टरची सफर करताना हा निश्चय केला होता. पण तो टिकला नाही. तिने अनेकदा रोलरकोस्टर सफरीचा आनंद लुटला.

रोलरकोस्टर सफरीत आडवीतिडवी वळणं असतात, श्वास रोखून धरायला लावेल अशा उंचीवरून गाडी जात असते, अचानक धक्का लागतो आणि आपण थांबतो... अशी ही अविश्वसनीय अद्भुत अशी सफर असते. अलेक्झांड्रा रोलरकोस्टरचा आनंद लुटू लागली, मात्र या सफरीदरम्यान ती मोठ्याने ओरडत असे.

अमेरिकेतले मोठे थीम पार्क या महिन्याच्या शेवटी जनतेसाठी खुली होणार आहेत. कॅलिफोर्नियात रोलरकोस्टरची राईड करणाऱ्यांना आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवा आणि कमी ओरडा असं सांगण्यात आलं आहे. जेणेकरून कोव्हिडचा प्रसार होणार नाही.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, ALEJANDRA MENDOZA

फोटो कॅप्शन, अलेक्झांड्रा मेंडोजा

पण खरंच आपण ओरडण्यावर नियंत्रण ठेवू शकतो का? उत्तुंग सफरीचा आनंद न ओरडता घेता येऊ शकतो का? अतिशय आनंदाच्या क्षणी आपण का किंचाळतो?

किंचाळणं काय असतं?

इमोरी कॉलेजातील मानसशास्त्राचे प्राध्यापक हेरॉल्ड गुजूल सांगतात की, किंचाळणं हे अचंबित किंवा आनंदातिरेकानंतर निघणारे बिगरशाब्दिक उद्गार म्हणून गणलं जातं. ते सांगतात, की किंचाळणं म्हणजे तुमचाच आवाज असतो परंतु तुम्ही बोलत नाही.

किंचाळणं, ओरडणं हा एक स्वर असतो. त्याच्या ध्वनीलहरींची गुणवैशिष्ट्यं असतात. किंचाळणं किंवा ओरडणं सेकंदाच्या तीन चतुर्थांश किंवा दीड सेकंद वगैरे असते. सर्वसाधारणपण माणूस जोरात किंचाळतो आणि त्याची तीव्रता तशीच राहते.

प्राध्यापक हेरॉल्ड सांगतात की, किंचाळणं थोड्या वेळासाठी असतं. त्याने समोरचा चक्रावून जाऊ शकतो. आवाजाची पातळी वरची असते. किंचाळणं दूरपर्यंत ऐकायला जातं.

आपण का किंचाळतो?

प्राध्यापक हेरॉल्ड यांच्या मते, प्राचीन काळी समोर आलेल्या जंगली प्राण्यांना अवाक करण्यासाठी याचा उपयोग केलेला असावा. किंचाळल्यामुळे समोरचा प्राणी गोंधळून जाऊन आपण जीव वाचवू शकतो असंही कारण असू शकतं.

आपले पूर्वज घरातल्या माणसांना बोलावण्यासाठी ओरडून साद घालत असत. कारण तेव्हा कुटुंब मोठं असे. परंतु सध्याच्या काळात ओरडणं हे मौखिक हत्यार झालं असेल तर ते कुणासाठी झालं आहे हे तुम्हाला ओळखता यायला हवं.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोलरकोस्टर

आपण का ओरडतो किंवा किंचाळतो याच्या अभ्यासासाठी मौखिक हत्यार होणं ही प्रेरणा ठरू शकते. कमी धोकादायक अशा परिस्थितीत यासंदर्भात अभ्यास केला जाऊ शकतो.

रोलरकोस्टर सफरीत काय घडतं?

"ज्यावेळी एखाद्या धोकादायक प्रसंगातून आपण वाचतो त्यावेळी आपल्याला आनंद होऊन किंचाळतो. आपण सभ्य समाजात राहतो, त्यामुळे आपल्याला अशा प्रसंगाचा अभावानेच सामना करावा लागतो. मात्र काही वेळेला घाबरण्याचे क्षण येतात. त्यावेळी आपण जोरात ओरडतो किंवा किंचाळतो," असं प्राध्यापक हेरॉल्ड सांगतात.

ते सांगतात की, आपल्या पूर्वजांच्या ओरडण्याची जागा धबधबा किंवा ज्वालामुखी असू शकते. आधुनिक समाजातील माणसासाठी रोलरकोस्टर राईड किंवा थीम पार्क आहे.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोलरकोस्टर राईड

तुमच्या हृदयाची धडधड वाढते. रक्तदाब वाढतो. घाबरल्यानंतर तुमच्या शरीरात जे जे होतं तसं ओरडण्याच्या/किंचाळण्याच्या वेळेसही होतं. मात्र तुम्हाला माहिती असतं की, तुम्ही सुरक्षित आहात. तुमच्या शरीरात जो तणाव साचलेला असतो तो किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर निघतो.

त्यामुळे अलेक्झांड्रा रोलरकोस्टर सफरीदरम्यान किंचाळते तेव्हा वाटतं तिला भीती वाटत आहे. मात्र, प्रत्यक्षात तिला मजा येत असते.

25वर्षीय इक्वेडोर सांगतात की, किंचाळणं किंवा ओरडणं एकप्रकारे तणाव दूर करतं. कारण ओरडण्याच्या वेळेस तुम्ही बाकी सगळं विसरता. तुम्ही तेवढ्या क्षणापुरते जगता.

रोमांचकारी अनुभव

23वर्षीय ट्रॅव्हल ब्लॉगर डिंफ मेनसिंक या गोष्टीशी सहमत आहेत, त्या लहानपणापासून रोलरकोस्टर सफरीचा आनंद लुटत आहेत.

मला शहरातल्या थीम पार्कमध्ये जायला आवडतं. कारण रोमांचकारी जग अनुभवता येतं.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोलरकोस्टर

जेव्हा रोलरकोस्टरमध्ये जाण्याकरता तिकीटाच्या रांगेत तुम्ही उभे असता. अन्य माणसं रोलरकोस्टरचा आनंद लुटत असतात. तेव्हा तुम्हाला वाटलं की, बरंय आपण तिथे नाहीयोत. ज्या वेगाने ते फिरतं त्याने घाबरायला होतं. पण मी जेव्हा रोलरकोस्टरमध्ये बसते तेव्हा ते हळूहळू वर जायला लागतं.

मला खूप भीती वाटू लागते. जेव्हा ते खाली उतरू लागतं तेव्हा रोमांचकारी वाटतं. अद्भुत असा आनंद मिळतो. त्यावेळी जोरात ओरडावंसं वाटतं.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, DYMPHE MENSINK

फोटो कॅप्शन, डिंफ मेनसिंक

अॅमस्टरडॅममध्ये राहणाऱ्या डिंफ मेनसिंक सांगतात की, असं ओरडल्यामुळे भावना जगजाहीर होतात. रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन आयुष्यात हा क्षण तुम्हाला अनुभवता येत नाही. ओरडल्यामुळे रोमांच वाढतो.

जपानच्या उरायासू शहरात राहणाऱ्या आकी हयाशी सांगतात की, जगभरातील रोलरकोस्टरचा अनुभव घेणं हे त्यांच्या जगण्याची प्रेरणा आहे.

रोलरकोस्टरविनी मी आयुष्यातील आनंदाचा विचारच करू शकत नाही.

27वर्षीय हयाशी कोस्टर रायडर्स जपान ग्रुपचे प्रमुख आहेत. रोलरकोस्टर राईड आवडणाऱ्या मंडळींचा हा गट आहे. ते एकत्रित थीम पार्कमध्ये जातात.

साडेतीनशेहून अधिक रोलरकोस्टर सफरींचा आनंद घेतल्यानंतर आता ओरडण्यावर नियंत्रण ठेवू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

किंचाळणं, ओरडणं,

फोटो स्रोत, AKI HAYASHI

फोटो कॅप्शन, आकी हयाशी

हयाशी सांगतात की, मी रोलरकोस्टर सफरीवर एकटाच असेल तर उत्साह कमी असतो. राईडवरचे सगळे माझ्याकडे पाहू लागतात. पण आमची गँग असते तेव्हा पार्टी केल्यासारखं वातावरण असतं. आम्ही एकत्र ओरडतो, धमाल करतो. जेव्हा आम्ही ओरडतो तेव्हा छान वाटतं.

प्राध्यापक हेरॉल्ड यांच्या मते ओरडण्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे मात्र हे एक आव्हानही आहे. काही लोकांना हे जमतं तर काहींना नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)