ट्रंप महाभियोगः कॅपिटल गोंधळानंतर कारवाईसाठी डेमोक्रॅट्सचे प्रयत्न

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या महाभियोगावर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील सदस्य मंगळवारी मतदान करू शकतात असं एका डेमोक्रॅट पक्षाच्या खासदाराने सांगितलं आहे.
विद्रोहाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्याचा डेमोक्रॅट सदस्यांचा प्रयत्न आहे.
या आठवड्यात ही कारवाई करण्यात येईल असे हाऊस व्हीप जेम्स क्लेबर्न यांनी सीएनएनला सांगितले. ट्रंप यांनी त्यांच्यावर सोशल मीडिया स्थळांद्वारे बंदी घातल्यानंतर कोणतेही विधान सार्वजनिक केले नाही.
असं असलं तरी ते टेक्सास येथे जाऊन मेक्सिको-अमेरिकेदरम्यान बांधल्या जाणाऱ्या भिंतीची पाहाणी करतील असं व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात ट्रंप यांचा हात होता असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सिनेटमधील गोंधळाचा आरोप त्यांच्यावर ठेवल्यास मतदान करु असे एकाही रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर सांगितलेले नाही.

फोटो स्रोत, Reuters
पॅट टूमी या रिपब्लिकन सिनेटरनी ट्रंप यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ट्रंप यांनी राजीनामा देऊन लवकरात लवकर दूर जावे असं सेन टूमी य़ांनी एनबीसीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. हे असं होणार नाही हे मला माहिती आहे पण राजीनामा देणे सर्वात योग्य ठरेल असं ते म्हणाले.
लिसा मुर्कोवस्की या अलास्कामधील रिपब्लिकन सिनेटरनी सर्वात आधी ट्रंप यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. नेब्रास्का येथील रिपब्लिकन सिनेटर बेन सेस यांनी सभागृहाने मंजुरी दिल्यास महाभियोगाच्या विधेयकाचा विचार करू असं सांगितलं आहे.
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेची संसद असणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीवर हल्ला केल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाउसमधल्या समर्थकांच्या नाराजीचाही सामना करावा लागतोय.
रिपब्लिकन पक्षातले अनेक सिनेटर ट्रंप यांची साथ द्यायला तयार नाहीत. इतकंच नाही तर ट्रंप यांनी प्रशासकीय पातळीवर ज्या काही नियुक्त्या केल्या होत्या त्यातल्या काही जणांनीही कॅपिटल हिलच्या घटनेनंतर राजीनामा दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नियोजित कार्यक्रमानुसार मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊस सोडायचं आहे आणि त्याच दिवशी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदभार स्वीकारतील.
मात्र, कॅपिटल हिलवरच्या हिंसाचारानंतर डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आता 20 जानेवारपर्यंत प्रतीक्षा करायला तयार नाहीत. ट्रंप यांनी तात्काळ पदभार सोडावा, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांना पुन्हा अध्यक्षीय निवडणुकीला उभं राहण्यावर बंदी घालावी, अशीही त्यांची मागणी आहे.
ट्रंप यांनी लवकरात लवकर व्हाईट हाऊस सोडण्याची घोषणा केली नाही तर त्यांच्याविरोधात महाभियोग सुरू करू, असं अमेरिकेची संसद असलेल्या काँग्रेसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं आहे.
ट्रंप यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळेच हिंसाचार उफाळला आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचंही पेलोसी म्हणाल्या.
ट्रंप यांच्यावर याआधीही एकदा महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यावेळी जे रिपब्लिकन सिनेटर ट्रंप यांच्या बाजूने होते त्यातले बहुतेक सिनेटर यावेळी मात्र ट्रंप यांची साथ द्यायला तयार नाहीत.
याचा अर्थ ते ट्रंपविरोधात भूमिका घेणार, असं नाही. मात्र, यावरून ट्रंप यांनी आपल्या लाखो समर्थकांची सहानुभूती गमावल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, संसदेत अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाला आव्हान देऊन जो बायडन यांचा विजय न रोखणाऱ्या सर्वच रिपब्लिक सिनेटर्सच्या समानांतर नवीन उमेदवार देणार असल्याचा विडा ट्रंप यांनी उचलला आहे.
राजीनामा आणि शंका-कुशंका
कॅपिटल हिलवर ट्रंप समर्थकांनी केलेल्या हिंसाचारवर चहुबााजूंनी टीका झाली. ट्रंप यांच्या विश्वासातल्या अनेक रिपब्लिकन नेत्यांनीही या घटनेचा जाहीरपणे निषेध केला. टीका करणाऱ्यांमध्ये ट्रंप प्रशासनातील अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ अमेरिकन राजनयिकांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
कॅपिटल हिलवरील हिंसाचारानंतर संसदेच्या कामकाजात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या वर्तणुकीचा निषेध केला.
ट्रंप यांनी तात्काळ ऑफिस सोडावं, अशी मागणी डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनी केली. त्यांच्या मते, "ट्रंप देशासाठी मोठा धोका आहेत. त्यांचा अंदाज लावता येत नाही आणि म्हणूनच व्हाईट हाऊसमध्ये त्यांना आणखी 11 दिवस देण्याचं काहीच औचित्य नाही."
ट्रंप यांना वेळेआधीच पदावरून काढण्यात आलं तर ते पुढे कधीच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत.
मात्र, त्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचे पार्टनर असलेले माइक पेन्स आणि इतर मंत्र्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना निवृत्त करण्याची कार्यवाही सुरू करावी लागेल.
अमेरिकन राज्यघटनेच्या कलम-25 अंतर्गत ही कार्यवाही होऊ शकते. संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि सिनेटमधले डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार चक शूमर यांनीही पेन्स यांना ही कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. पेन्स यांनी अजून तरी या आवाहनावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, पेन्स अशी कार्यवाही करू शकतात, असं काहींना वाटतं. याचं कारण म्हणजे कॅपिटल हिलवरच्या घटनेचं ट्रंप प्रशासनातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध केला होता.
यापूर्वी डेमोक्रेटिक पक्षाने ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ट्रंप मंत्रिमंडळाचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना त्यात यश मिळालं नाही.
मात्र, यावेळी स्वतः सभापती नॅन्सी पेलोसी ट्रंप यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























