IND VS AUS तिसरी टेस्ट : पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 166/2

भारत वि. ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Ryan Pierse

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाअखेर दोन बाद 166 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे चार तास वाया गेल्याने केवळ 35 ओव्हर्सचा खेळ होऊ शकला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन 67 धावा तर स्टिव्ह स्मिथ 31 धावांवर खेळत होते.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने टॉस जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताकडून मोहम्मद सिराजने पहिली विकेट घेतली. सिराजच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने डेव्हिड वॉर्नरचा कॅच घेतला. यानंतर विल पुकोवस्कीची विकेट गेली. विलने 110 चेंडूत 62 धावा केल्या.

नवदीप सैनीने 35 व्या ओव्हरमध्ये पुकोवस्कीला एलबीडब्लू केलं.

चार सामन्यांच्या या सीरिजमध्ये दोन्ही संघ सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत. मेलबर्नमधली टेस्ट भारताने जिंकली, तर एडलेडमध्ये झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

तिसऱ्या टेस्टमध्ये मयंक अग्रवालच्या जागी रोहित शर्माला ओपनिंगला पाठवण्यात आलं. शेवटच्या दोन टेस्टमध्ये रोहित टिम इंडियाचा उप-कर्णधारही असेल. उमेश यादवला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्याजागी नवदीप सैनीला घेण्यात आलं आहे.

तर ऑस्ट्रेलियाच्या टिममध्ये जो बर्न्सच्या जागी वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेडच्या जागी पुकोवस्कीला टिममध्ये स्थान मिळालं आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Ryan Pierse

तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ असा आहे - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)