लिओनेल मेस्सीने मोडला पेलेंचा गोल विक्रम

मेस्सी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आणखी एक विक्रम रचला आहे. मेस्सीने ब्राझिलचे विख्यात फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडला आहे.

मेस्सीने बार्सिलोना या त्यांच्या क्लबसाठी रिअल वॅलाडोलिड क्लबविरोधात खेळताना दोन गोल करत एकूण 644 गोल केले आहेत. याआधी 1956 ते 1974 या कालखंडात पेले यांनी 19 व्या सिझनमध्ये ब्राझिलच्या सांतोस क्लबसाठी 643 गोल केले होते.

मेस्सी बार्सिलोनासाठी स्पॅनिश लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले आहेत. मेस्सीने 2005 साली बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. पुढे आपल्या रंगतदार खेळाच्या जोरावर मेस्सीने 10 ला लिगा टायटल्स आणि 4 चॅम्पियन्स लीग जिंकले.

स्पॅनिश फुटबॉलच्या ला लीगा स्पर्धेत बार्सिलोनाने रिअल वॅलाडोलिडला 3.0 ने पराभव केला. मेस्सीने दोन गोल केले. या विजयासह बार्सिलोना 8 अंकासह पाचव्या स्थानावर आहे. तर एटलेटिको मॅड्रीडने तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या रिअल सोशिदादला 2-0 ने नमवत आगेकूच कायम ठेवली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

बार्सिलोनासाठी विक्रम रचणाऱ्या मेस्सीचा पुढच्या वर्षी जूनमध्ये क्लबशी करार संपणार आहे. जानेवारीपासून तो नव्या करारासाठी इतर क्लबशी बोलणी सुरू करेल.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

लिओनेल मेस्सी

फोटो स्रोत, Reuters

मेस्सीने ऑगस्ट महिन्यातच बार्सिलोना सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या करारात निशुल्क ट्रान्सफरची तरतूद असल्याचं मेस्सीने म्हटलं होतं. बार्सिलोना क्लबने मात्र याचा इनकार केला आहे. क्लब सोडण्याआधी मेस्सीला 700 मिलियन युरो म्हणजे जवळपास 624 मिलियन डॉलर्सची अट पूर्ण करावी लाागेल, असं क्लबतर्फे सांगण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)