'डोनाल्ड ट्रंप यांनी पराभव स्वीकारावा,' ट्रंप यांना त्यांच्याच सहकाऱ्याचा सल्ला

फोटो स्रोत, AFP/Getty Images
डोनाल्ड ट्रंप यांच्या सहकाऱ्यानेच आता त्यांना आपला पराभव मान्य करण्याचे आवाहन केले आहे. जो बायडन यांच्या बाजूने निकाल गेला असून तो बदलण्याचा प्रयत्न ट्रंप यांनी आता करू नये असंही ते म्हणालेआहेत.
न्यू जर्सीचे माजी राज्यपाल ख्रिस ख्रिस्टी यांनी राष्ट्राध्यक्षांच्या लिगल टीमला "नॅशनल शेम" असे संबोधले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला असून निकालात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
रिपब्लिकन सदस्यांनी ट्रंप यांच्या कायदेशीर लढाईला पाठिंबाही दिला आहे.
लाखो मते अवैध ठरवण्याची मागणी करणारा ट्रंप यांचा खटला न्यायाधीशांनी फेटाळल्यानंतर शनिवारी पेन्सलवेनियात ट्रंप यांना आणखी एक मोठा धक्का बसला.

फोटो स्रोत, Reuters
न्यायाधीश मॅथ्यू ब्रॅन यांनी निकाल देताना नमूद केले की, "खटल्याची सुनावणी होत असताना गुणवत्तेच्या आधारावार कायदेशीर युक्तिवाद करण्यात आला नाही तसंच वास्तवाच्या आधारावर आरोप करण्यात आले नाहीत."
या निकालामुळे सोमवारी (23 नोव्हेंबर) बायडन यांचा विजय अधिकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डेमोक्रॅटिकचे अध्यक्ष याठिकाणी 80 हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
अमेरिका निवडणुकीत जो बायडन यांनी ट्रंप यांचा 306 ते 232 असा पराभव केला आहे असा अंदाज आहे. 270 हून अधिक जागांवर विजय मिळवलेला उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनतो.

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिस ख्रिस्टी नेमकं काय म्हणाले?
रविवारी (22 नोव्हेंबर) एबीसीच्या कार्यक्रमात बोलताना न्यू जर्सीचे माजी राज्यपाल ख्रिस्टी यांनी सांगितले, "खरं सांगायचं तर राष्ट्राध्यक्षांच्या कायदेशीर टीमचे वर्तन ही आता "नॅशनल शेम"ची गोष्ट बनतचालली आहे."
ते म्हणाले, "ट्रंप यांचा गट कोर्टाच्या बाहेर निवडणुकीतल्या फसवणुकीसंदर्भात चर्चा करतो पण जेव्हा कोर्टात बाजू मांडण्याची वेळ येते तेव्हा फसवणुकीसंदर्भात युक्तिवाद करत नाहीत.
"मी राष्ट्राध्यक्षांचा समर्थक आहे. मी दोनवेळा त्यांना मत दिले. निवडणुकीचे परिणाम येत असतात पण आपण जे झाले ते झालेच नाही अशी भूमिका घेऊ शकत नाही," असे मत ख्रिस्टी यांनी मांडले.
2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ट्रंप यांना पाठिंबा देणारे ख्रिस्टी हे पहिले राज्यपाल होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी ट्रंप यांना बायडन यांच्या डिबेटसाठी तयारी करण्यातही मदत केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























