लॉकडाऊनमध्ये सकारात्मकतेचा शोध घेणारे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

अल्मा रोसाज यांच्या याच फोटोने प्रथम क्रमांक पटकावला

फोटो स्रोत, Alma rosaz

फोटो कॅप्शन, अल्मा रोसाज यांच्या याच फोटोने प्रथम क्रमांक पटकावला
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना लॉकडाऊनमुळे जगात सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. या काळात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचं वातावरण होतं. पण याच लॉकडाऊनमध्ये एक आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न लोक करत आहेत.

याअंतर्गतच 'लॉकडाऊन : टेकिंग पॉझिटिव्ह व्ह्यू' या थीमवर आधारित एक फोटोग्राफी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्यातून पुन्हा नॉर्मल आयुष्य जगण्याची आशा शोधण्यासाठी लोकांनी आपल्या सर्जनशीलतेची मदत घेतली. फोटोग्राफीतून सकारात्मकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

पॉझिटिव्ह व्ह्यू फाऊंडेशन आणि द रॉयल फोटोग्राफिक सोसायटीकडून ही स्पर्धा घेण्यात आली होती.

फाऊंडेशनचे संस्थापक अँड्र्यू पेज सांगतात, "कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. अलगीकरण, विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या गोष्टींमुळे 16 ते 25 वयोगटातील लोकांना याचे परिणाम जास्त प्रमाणात भोगावे लागले, असा अंदाज आहे."

कोरोना
लाईन

लोकांमध्ये सकारात्मकता जागवण्यासाठी फोटोग्राफी हा एक उत्तम मार्ग असू शकतो. अनेकवेळा ही गोष्ट सिद्ध झाली आहे. म्हणूनच आम्हाला या स्पर्धेची कल्पना सुचली.

रॉयल फोटोग्राफिक सोसायटीचे प्रमुख इव्हान डाऊसन यांच्या मते, तरूणांना फोटोग्राफी करायला नेहमीच आवडतं. त्यांचे वैयक्तिक अनुभव ते छायाचित्रित करून ठेवत असतात. कोरोना लॉकडाऊनचा काळ आव्हानात्मक होता. या काळातील त्यांचे अनुभव सर्वांना कळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचं स्वप्न रंगवणाऱ्या छायाचित्राचा प्रथम क्रमांक

या स्पर्धेत समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचं स्वप्न रंगवणाऱ्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला. अल्मा रोसाज यांनी हा फोटो काढला आहे. त्यांना एक हजार डॉलर्सची रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली.

कोरोनापूर्वीचा काळ आठवल्यानंतर या फोटोची कल्पना सुचली, सध्या आपण सर्वज जण कोरोना काळातून बाहेर पडण्याचे स्वप्न रंगवत आहोत. याच गोष्टीला प्रेरणा बनवून मी हा फोटो काढला, असं रोसाज यांनी सांगितलं.

अल्मा रोसाज यांच्या याच फोटोने प्रथम क्रमांक पटकावला

फोटो स्रोत, Alma rosaz

फोटो कॅप्शन, अल्मा रोसाज यांच्या याच फोटोने प्रथम क्रमांक पटकावला

तर, फेलिक्स झिग्लर यांच्या फोटोने दुसरा क्रमांक जिंकला. त्यांना 500 डॉलरची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.

द्वितीय क्रमांक विजेता छायाचित्र

फोटो स्रोत, Felix ziegler

फोटो कॅप्शन, द्वितीय क्रमांक विजेता छायाचित्र

17 वर्षीय फ्लो हेंन्ड्रिक्स यांच्या फोटोचा तिसरा क्रमांक आला. त्यांना 250 डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली.

तृतीय क्रमांक विजेता छायाचित्र

फोटो स्रोत, flo hendricks

फोटो कॅप्शन, तृतीय क्रमांक विजेता छायाचित्र

या तीन फोटोंशिवाय इतर काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, ते फोटो खालीलप्रमाणे...

व्यायाम करणारा तरुण - अॅशर लेव्ही लोपेझ

व्यायाम

फोटो स्रोत, ASHER LEVI LOPEZ

नवी उमेद - शार्लोट कीन

नवी उमेद

फोटो स्रोत, CHARLOTTE KEEN

स्पर्श - कॉनर हडसन

स्पर्श

फोटो स्रोत, CONOR HUDSON

कुणीतरी तुमच्यावर प्रेम करतं - डायलॅन लोंबार्ड

प्रेम

फोटो स्रोत, Dylan Lombard

हातमोजे - जॉर्जिया बेनेट

हातमोजे

फोटो स्रोत, GEORGIA BENNETT

निवांत क्षण - इज्जी स्क्रिबर

निवांत क्षण

फोटो स्रोत, IZZY SCHREIBER

हँडवॉश - जेसिका अँडरसन

हँडवॉश

फोटो स्रोत, JESSICA ANDERSON

नाईट लाईफ - जॉन मायकल कॅनिटा

नाईटलाईफ

फोटो स्रोत, JOHN MICHAEL CANITA

स्पर्श - जेसिका शॅकलफोर्ड

स्पर्श

फोटो स्रोत, JESSICA SHACKLEFORD

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)