व्हिएन्ना हल्ला: गोळीबारात दोघांचा मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरूच

पोलिस व्हिएन्ना

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सहा ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचं ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी सांगितलं.

व्हिएन्नाच्या मध्यवर्ती स्विडनप्लाट्स स्क्वेअर इथं गोळीबार करण्यात आला. पण हल्लेखोरांचे लक्ष्य नेमकी हीच जागा होती का, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

"गोळीबारात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या एका जखमी महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, " अशी माहिती महापौर मायकल लुडविग यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये आणखी 14 जणांवर उपचार सुरू असून यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ऑस्ट्रिया सरकारने नवीन निर्बंध लागू केल्यानंतर काही तासातच गोळीबार करण्यात आला. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार असल्याने अनेक लोक त्याठिकाणी होते.

युरोपियन नेत्यांनी या गोळीबाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'हा भयानक हल्ला पाहून धक्का बसला,' अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.

हल्ला कसा झाला?

पोलिसांनी सांगितलं की, व्हिएन्नामधील प्रसिद्ध सिनेगॉग सीटेन्स्टासे सभास्थानाजवळ ही घटना घडली. याविषयी बोलताना यहुदी समुदायाचे नेते ऑस्कर डॉइश यांनी ट्वीट करून म्हटलं की, 'गोळीबार रात्री आठ वाजता सुरू झाला त्यावेळी सभास्थान बंद करण्यात आले होते.'

क्रोनेन झिटुंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेगॉगचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ऑस्ट्रियाच्या माध्यमांनी एकाला अटक केल्याची माहिती दिली आहे. गोळीबारात किती हल्लेखोरांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

व्हिएन्ना हल्ला

फोटो स्रोत, Reuters

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फुटेजमध्ये गोळीबार सुरू असताना लोकं रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत होते.

गोळीबार सुरू झाला तेव्हा घटनेचे साक्षीदार ख्रिस झाओ जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये होते. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, "सुरुवातीला फटाक्यांसारखा आवाज आला. 20 - 30 वेळा आम्ही आवाज ऐकला आणि नंतर आमच्या लक्षात आले हा फटक्यांचा आवाज नसून गोळीबार आहे. गोळी लागलेले जखमी पीडित रस्त्यावर विव्हळत असताना आम्ही पाहिले. रुग्णवाहिकांचा आवाज आणि धावाधाव आम्ही पाहिली."

दहशतवादी हल्ल्याची तीव्रता पाहता पोलिसांनी स्थानिकांना परिसरात येण्यास मज्ज्व केला, तसंच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास टाळवण्याचेही आवाहन केले. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. ऑस्ट्रियाच्या सीमा भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया

आपण सध्या कठीण काळातून जात आहोत, अशी प्रतिक्रिया कुर्झ यांनी ट्विटवरून दिली. त्यांनी म्हटलं, "या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. दहशतवादाला आम्ही मुळीच घाबरलेलो नाहीत."

युरोपीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपने 'हार मानू नये' असे म्हटले आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"आज संध्याकाळी व्हिएन्नाच्या मध्यभागी झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. फ्रान्सनंतर आता आमच्या एका मित्रावर हल्ला केला जातो. हा आमचा युरोप आहे. ते कुणाला आव्हान देत आहेत हे आपल्या शत्रूंना माहीत असलं पाहिजे," असंही त्यांनी म्हटलं.

गेल्या आठवड्यात फ्रासन्मधील नाईस शहरात एका चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जण ठार झाले. मॅक्रॉन यांनी 'इस्लामी दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं होतं. युकेचे पंतप्रधान असेही म्हणाले की, 'आम्ही ऑस्ट्रियाचे दुःखात सहभागी आहोत.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)