जॉर्डनमध्ये शक्तिशाली स्फोट, आकाशात दिसला आगीचा गोळा

जॉर्डन
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

जॉर्डनमध्ये शक्तिशाली स्फोट, आकाशात दिसला आगीचा गोळा जॉर्डनची राजधानी अम्मानजवळील एका लष्करी तळाजवळ अनेक जोराचे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील नागरिकांनी या स्फोटाचा आवाज स्पष्टपणे ऐकल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावरही स्फोटाबाबत चर्चा सुरू असून याच्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर केले जात आहेत.

सदर स्फोट इतके शक्तिशाली होते की आकाशात केशरी रंगाचा आगीचा गोळा दिसत असल्याचं व्हीडिओ आणि फोटोंमध्ये दिसत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जुन्या दारूगोळा व शस्त्रास्त्रं बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामात हे स्फोट झाले. शॉर्टसर्किट हे स्फोटाचं कारण असू शकतं.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "लष्कराची शस्त्रास्त्रं ठेवण्यात येणाऱ्या गोदामात शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. सदर ठिकाण हा रहिवासी भाग नाही. त्यामुळे इथं लोकांची वर्दळसुद्धा कमी असते, असं सरकारचे प्रवक्ते अमजद अदीला यांनी सांगितलं."

जॉर्डनमधील या स्फोटात जीवित किंवा वित्तहानी नेमकी किती झाली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र घटनास्थळापासून काही अंतरावरील अनेक घरांच्या खिडक्यांची तावदानं तुटल्याची माहिती आता समोर येत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)