कोरोना विषाणूवर कधीच औषध मिळणार नाही, असं WHO प्रमुख का म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनावर लवकरच लस मिळेल अशी आशा आहे मात्र कदाचित अशी लस कधीच बनणार नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस गॅब्रिएसस यांनी दिला आहे.
अनेक लशींचं काम तिसऱ्या टप्प्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही लस कामी येईल अशी आशा आहे. मात्र अजूनही यावर ठोस औषधरुपी इलाज मिळालेला नाही आणि कदाचित कधीच मिळणारही नाही.
अशा परिस्थितीत आपल्याला कोरोना चाचणी, आयसोलेशन आणि मास्क परिधान करणं सुरू ठेवणं आवश्यक आहे असं डॉ. ट्रेडॉस म्हणाले.
कदाचित कोरोना समूळ नष्ट होणार नाही असं डॉ. ट्रेडोस याआधीही अनेकदा म्हणाले आहेत. आपल्याला कोरोनासह जगणं शिकावं लागेल असं ते म्हणाले होते.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

कोरोना हा अन्य विषाणूंच्या तुलनेत वेगळा आहे. त्याचं स्वरुप सातत्याने बदलत आहे. पाऊस आल्याने किंवा थंडी सुरू झाल्याने किंवा प्रचंड उकाड्याने कोरोनावर कोणताही परिणाम होणार नाही कारण कोरोनाचा हवामानाशी संबंध नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अर्थात एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं, हात साबणाने स्वच्छ धुणं, मास्क परिधान करणं, सॅनिटायझर लावणं हे नियम जगभरातल्या लोकांनी पाळणं आवश्यक आहे असं डॉ. ट्रेडोस सांगतात.
आतापर्यंत जगभरात एक कोटी, 81 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 6 लाख 89 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या नवमातांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा कोरोना संशयित आहेत त्यांनी बाळाला स्तनपान करणं बंद करायला नको.
मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी आहे. मात्र बाकी अनेक आजार लहान मुलांना प्रामुख्याने होतात. स्तनपान अशा आजारांना दूर ठेवतं. कोरोनाच्या धोक्यापेक्षा लहान मुलांना त्यांच्या आईने स्तनपान द्यावं असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला आहे असं डॉ. ट्रेडोस यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या आईला कोरोनाची शक्यता आहे किंवा कोरोना संशयित आहे किंवा कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करायला हवं असं डॉ. ट्रेडोस यांनी सांगितलं.
आईची प्रकृती खूप गंभीर नसेल तर बाळापासून तिला दूर करायला नको असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























