You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'व्हॉट्सअॅप पे'वर ब्राझीलची बंदी
तुमच्या फोनवर तुम्ही सर्वाधिक वेळ कदाचित व्हॉट्सअॅपवर घालवत असाल. त्यासोबतच आता तुम्हाला पैसे पाठवायला इतर कोणतीही अॅप उघडण्याची गरज भासणार नाही, असा व्हॉट्सअॅपचा प्रयत्न आहे. मात्र ब्राझीलने यावर बंदी आणली आहे.
कारण भारत, इंडोनेशिया, मेक्सिकोसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आता व्हॉट्सअॅप पे सेवा लाँच होत आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या एखाद्या कॉन्टॅक्टला पैसे पाठवू शकाल किंवा एखाद्या गोष्टीची ऑर्डर देऊन पैसे भरू शकता.
अधिकाधिक ई-उद्योगांना व्हॉट्सअॅपवर आणण्याचा याच्या मालकीचे हक्क असलेली कंपनी फेसबुकचा प्रयत्न आहे. हे फेसबुकच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर पेमेंट सेवा देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असंही एका ब्लॉगमध्ये सांगण्यात आलं आहे.
"व्हॉट्सअॅप पे हे फेसबुक पेच्याच तंत्रज्ञानावर काम करतं, भविष्यात एकाच कार्डवरून युजर्सना सर्व फेसबुक प्लॅटफॉर्म्सवर लोकांना खरेदी-विक्री करता येईल, असा आमचा प्रयत्न असेल.
तुम्ही वापरत असलेलं फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारखे अॅप फेसबुकचेच आहेत.
भारतात सध्या व्हॉट्सअॅपचे 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत, आणि गेल्या अनेक काळापासून ही सेवेची चाचणी मर्यादित स्वरूपात व्हॉट्सअॅप भारतात घेतच होतं. पण नियामकांनी दोन वर्षांपासून ही सेवा काही कारणास्तव सुरू करण्यास परवानगी दिलेली नव्हती.
एप्रिल महिन्यात मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक कंपनीने मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. या करारानंतर फेसबुकचे रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्क्यांचे शेअर्स आहेत, आता फेसबुक रिलायन्स जिओमधली सर्वात मोठी शेअरहोल्डर कंपनी आहे.
चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने 38.8 कोटी लोकांना इंटरनेटशी जोडलं आहे. याने नवीन उद्योगांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकांना नव्या पद्धतीने जोडण्याचं काम केलं. "सर्व प्रकारच्या उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. विशेषतः संपूर्ण भारतात पसरलेल्या 6 कोटींहून जास्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणं हे आमचं लक्ष्य आहे. कारण, हेच लहान उद्योग देशात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देतात," असं तेव्हा फेसबुकने एका निवेदनात म्हटलं होतं.
रिलायन्सने नुकत्याच लाँच केलेल्या जिओमार्ट या सेवेसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
गेल्याच महिन्यात फेसबुकने इंडोनेशियाच्या गोजेक या टॅक्सी अॅपमध्ये मोठी गुंतवणूक जाहीर केली होती. गोजेकच्या गोपे या डिजिटल पेमेंट सेवेला अधिक विस्तृत करण्यासाठी ही भागीदारी मोलाची ठरणार आहे.
2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅपला जवळपास 20 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केलं होतं. कंपनीच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये व्हॉट्सअॅपचे जगभरात दोन अब्ज युजर्स होते.
- वाचा-मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा- लॉकडाऊन – 5 : महाराष्ट्र अनलॉक होतोय, जून महिन्यात काय सुरू काय बंद?
- वाचा -कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा - महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान गावी जायला ई-पास कसा मिळवायचा?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)