जॉर्ज फ्लॉईड : अमेरिकेत अजून एका कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलीस कारवाईत मृत्यू

अमेरिका आंदोलन

फोटो स्रोत, EPA

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

एका रेस्टॉरंटजवळ कारमध्ये झोपलेल्या आफ्रो-अमेरिकन वंशाच्या नागरिकाला गोळी मारल्याप्रकरणी अटलांटाच्या पोलिस प्रमुखांनी राजीनामा दिला आहे.

प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (12 जून) एका पोलिस अधिकाऱ्याने 27 वर्षांच्या रेशर्ड ब्रुक्स याला गोळी मारली होती.

महापौर केइशा लान्स बॉटम्स यांनी सांगितलं, की अटलांटाच्या पोलिस प्रमुख एरिका शिल्डस यांनी शनिवारी (13 जून) आपला राजीनामा दिला.

अटलांटामध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन ब्रुक्स यांच्या मृत्यूप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.

कोरोना
लाईन

वेंडीज नावाच्या ज्या रेस्टॉरंटच्या बाहेर ब्रुक्सचा मृत्यू झाला होता, त्या रेस्टॉरंटलाही आग लावण्यात आली.

जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकाच्या हत्येनंतर गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिकेत निदर्शनं सुरू आहेत.

एरिक शील्ड्स या डिसेंबर 2016 पासून पोलिस प्रमुख या पदावर होत्या आणि अटलांटा पोलिस विभागात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत होत्या.

महापौर बॉटम्स यांनी स्पष्ट केलं, की एरिका शिल्ड्स या आता दुसऱ्या भूमिकेतून विभागासोबत काम करतील.

महापौर बॉटम्स यांनी ब्रुक्सच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचेही आदेश दिले आहेत.

आंदोलक रस्त्यावर

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, आंदोलक रस्त्यावर

शनिवारी संध्याकाळी आंदोलकांनी अटलांटामधील इंटरस्टेट-75 नावाचा मुख्य हायवे बंद केला होता.

नेमकं काय घडलं?

जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ब्रुक्सच्या मृत्यूचा तपास करत आहे. वेंडीज रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींचाही तपास सुरू आहे.

वेंडीज रेस्टॉरंटनेच पोलिसांना बोलावलं होतं. कारण ब्रुक्स कारमध्येच झोपले होते आणि त्यांची कार रेस्टॉरंटमध्ये येण्याजाण्याच्या वाटेत उभी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रीथालायजर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ब्रुक्स आपल्या अटकेचा विरोध करत होते.

जिथे ब्रुक्सची हत्या झाली, त्या वेंडीज रेस्टॉरंटला आग लावण्यात आली.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, जिथे ब्रुक्सची हत्या झाली, त्या वेंडीज रेस्टॉरंटला आग लावण्यात आली.

जीबीआयच्या रिपोर्टनुसार वेंडीज रेस्टॉरंटमधून मिळालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे, की पोलिस अधिकारी ब्रुक्स यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते एका अधिकाऱ्याला टेसर गन दाखवत आहेत.

त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने ब्रुक्सवर गोळी झाडली, असं अहवालात म्हटलं आहे. ब्रुक्स जमिनीवर कोसळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित केलं गेलं.

या चकमकीत एक पोलिस अधिकारीही जखमी झाला.

फुल्टन काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नींच्या विभागाकडून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

ब्रुक्सच्या वकिलांनी म्हटलं, की पोलिस अधिकाऱ्यांकडे कोणाचा जीव घेण्याइतके अधिकार नाहीयेत. ब्रुक्सनं टेसर गन दाखवली होती, जी अजिबात घातक नसते.

या घटनेनंतर शुक्रवारी (12 जून) वेंडीजच्या बाहेर आंदोलक एकत्र जमले होते. शनिवारी अटलांटामधील केंद्रात आंदोलनं सुरू झाली, ज्यामध्ये ब्रुक्सचे फोटो होते आणि ब्लॅक लाइव्हज मॅटरचे फलक लावण्यात आले होते.

अटलांटामध्ये लोक आधीच जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर आंदोलन करत होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)