कोरोना व्हायरस : संशयित रुग्णाची दवाखान्यातून उडी मारून आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णानं उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

दिल्लीतल्या सफदरजंग हास्पिटलमध्ये 18 मार्चला ही घटना घडली आहे. पीटीआयनं ही बातमी दिली आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

दरम्यान, कोरोना व्हायरस आणि त्यासंबंधीच्या उपाययोजना यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्चला रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे.

पंतप्रधान कार्यालयानं यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

पंतप्रधान कार्यालय

फोटो स्रोत, Twitter

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 156 वर पोहोचली आहे, तर राज्यात 45 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

कोरोना
लाईन

परदेशी प्रवाशांना प्रवेशबंदी?

अफगाणिस्तान, मलेशिया आणि फिलिपीन्समधून येणाऱ्या प्रवाशांना भारतात बंदी घालण्यात आली आहे.

31 मार्चपर्यंत ही बंदी कायम राहील असं भारत सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. या पत्रानुसार भारतीय विमानांनासुद्धा या देशांमध्ये उड्डाण करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे.

दुसरीकडे दुबईनंसुद्धा भारताबरोबरचा हावाई संपर्क तोडला आहे. 31 मार्च पर्यंत सर्व विमान उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. भारताच्या 8 शहरांमधून दुबईत आठवड्याला 30 उड्डाणं होतात.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

बाजारात पडझड

कोरोना व्हायरसचा बाजारपेठांवरील परिणाम कमी व्हावा यासाठी जगभरातल्या बँकांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तरीही ग्लोबल शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली.

अमेरिकेच्या शेअर बाजाराची घसरण 1987नंतरची सगळ्यांत मोठी घसरण आहे. डाओ जोन्सचा निर्देशांक 12.9 टक्के घसरून बंद झाला. अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

लंडनच्या FTSEC मध्येही 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. युरोपातील अन्य शेअर बाजारांमध्येही अशाच स्वरुपाची घसरण पाहायला मिळाली.

रविवारी युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दर जवळपास शून्यावर आणले आणि 700 अब्ज डॉलरची योजना कार्यान्वित केली जेणेकरून बाजाराची स्थिती सुधारेल.

अमेरिकेत कोरोना लसीची चाचणी

अमेरिकेने कोरोनावरच्या लसीची मानवी शरीरावर चाचणी केली. सिएटलमधल्या कैसर परमनेट संशोधन केंद्रातील चार रुग्णांना या लसीचा डोस देण्यात आला.

ही लस परिणामकारक ठरतंय का हे चाचपण्यासाठी अनेक महिने लागतील असं संशोधकांचं म्हणणं आहे. जगभरातील अनेक संशोधक कोरोनावर लस शोधण्यासाठी कार्यरत आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ संस्थेने या लसीकरता निधी पुरवठा केला होता.

भारत सरकारची अॅडव्हायझरी

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. भारतानं 18 मार्चपासून युरोपियन युनियनमधील देश तसंच ब्रिटन आणि तुर्कस्तानातून येणाऱ्या पॅसेंजर्स एअरलाइन्सवर निर्बंध घातले आहेत.

त्यासोबतच आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे, की जपान, दक्षिण कोरिया, इराण आणि इटलीमधील ज्या नागरिकांना 3 मार्चपूर्वी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला होता आणि जे आतापर्यंत भारतात आले नाहीयेत, त्यांचा व्हिसा तात्काळ रद्द करण्यात येत आहे.

या देशांचे जे नागरिक कोणत्याही परिस्थितीत आपला भारत दौरा टाळू शकत नाहीत, त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असंही आरोग्य मंत्रालयाच्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता दिल्ली सरकारनं 50 हून अधिक लोकांनी एकत्र जमण्यावर बंदी घातली आहे.

कोरोना
लाईन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (16 मार्च) साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 1897 साली संमत केलेल्या कायद्याचा आधार घेत सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी 50 हून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे.

सध्या तरी हा नियम विवाह समारंभांना लागू नाहीये. मात्र काही दिवसांसाठी लोकांनी लग्नांच्या तारखा पुढं ढकलण्याचा विचार करावा, असं आवाहन केजरीवाल यांनी दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

जर हा आदेश तत्काळ स्वरुपात लागू केला तर त्याचा परिणाम नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरही होऊ शकतो.

कोरोना विषाणूविषयक जगभरात सुरू असलेल्या ठळक घडामोडी

न्यूयॉर्क - शहरातील शाळा, कॉलेज, हॉटेल, बार आणि इतर सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लॉस एंजलिस - न्यूयॉर्कप्रमाणेच लॉस एंजलिस शहरातही बार, जिम, या गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत.

जर्मनी - जर्मनीने आपली बॉर्डर बंद केली आहे. आवश्यकता असेल तरच प्रवास करावा असे सरकारचे आदेश आहे.

चीन - चीनबाहेर ज्या चिनी नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना चीनमध्ये पाठवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबई - भारतीय चित्रपट उद्योगाने मार्च संपेपर्यंत चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी युरोपात सर्वाधिक बळींची नोंद

कोरोना व्हायरसचं केंद्र झालेल्या युरोपात रविवारी सर्वाधिक कोरोना बळींची नोंद झाली. तर चीनमध्ये रविवारी मात्र फक्त चार नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

इटलीमध्ये 368, स्पेनमध्ये 97 तर फ्रान्समध्ये 29 मृत्यू झाल्याने रविवारी युरोपात एका दिवसात कोरोनाने 288 लोकांचा जीव घेतला. एका दिवसात कोरोनाची शिकार ठरलेला हा बळींचा सर्वाधिक आकडा आहे.

युकेतही रविवार घातवार ठरला. एका दिवसात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे युकेत मृतांची संख्या आता 35 झाली आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले असून, देशांच्या सीमा ओलांडण्यासंदर्भात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जर्मनीने फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, लक्झम्बर्ग या देशांशी संलग्न सीमेवरून येण्याजाण्यावर निर्बंध आणण्याचं पक्कं केलं आहे. पोर्तुगालने स्पेनच्या सीमेवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेक प्रजासत्ताकमध्येही बाहेर पडण्यास बंदी

चेक प्रजासत्ताकने नागरिकांचं घराबाहेर पडणं मर्यादित केलं आहे. लोकांना कामावर जाण्याची मुभा आहे. ते घरातून बाहेर पडून औषधं, किराणा आणि कौटुंबिक भेटी घेऊ शकतात. परंतु बाकी जाण्यायेण्यावर निर्बंध आहेत. 24 मार्चपर्यंत हे प्रतिबंध लागू असतील.

ऑस्ट्रियाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. आयर्लंड प्रजासत्ताकने 29 मार्चपर्यंत पब्स बंद असतील असं जाहीर केलं आहे.

अनेक युरोपीय देशांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने युरोपला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला प्रदेश असं घोषित केलं होतं. चीनमधल्या वुहानमधून सुरू झालेला हा आजार आता 140हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.

चीनमध्ये रविवारी आढळलेले चारही नवे रुग्ण वुहानमध्ये आहेत.

व्हायरसचा प्रसार

स्वित्झर्लंडमध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 800ने वाढून 2,200 झाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातलं असून, तिथे 24,747 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 1,218 जण लोम्बार्डी या एकाच भागातले आहेत. व्यापारी केंद्र असलेल्या मिलानजवळ हा परिसर आहे.

कोरोना, युरोप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरीराचं तापमान चेक होताना

गेल्या सोमवारी सरकारने अख्खा देश लॉकडाऊन केला होता. लॉकडाऊन म्हणजे नागरिकांच्या जाण्यायेण्यावर पूर्णत: प्रतिबंध. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळं बंद करण्यात आलं होतं. शाळा-महाविद्यालयं, जिम, संग्रहालयं, नाईटक्लब्स सगळं बंद करण्यात आलं होतं.

स्पेनच्या सरकारनेही लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं होतं. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली होती.

फ्रान्समध्येही कॅफे, रेस्तराँ, सिनेमागृहं आणि बहुतांश दुकानं बंद होती.

युरोपियन युनियन देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, एकमेकांना सहकार्य करून या आजाराचा बीमोड करावा असं आवाहन युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर ल्युईन यांनी केलं आहे.

अन्य देशांमध्ये काय स्थिती?

संपूर्ण जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 162,687 एवढी आहे. यापैकी 81,003 जण चीनमध्ये आहेत. 6,065 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि यापैकी 3,085 जण चीनमधील आहेत.

दक्षिण आफ्रिकेने बुधवारपासून संलग्न सीमेवर विदेशी नागरिकांकरता निर्बंध लागू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेत 61 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आफ्रिकेत राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.

कोरोना, युरोप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना

युएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर जवळपास शून्यावर आणले आहेत. अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

युरोपातून परतणाऱ्या अमेरिकन नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला होता. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,244 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)