इस्रायल: पॅलेस्टाईन कट्टरतावाद्याच्या मृत्यूनंतर गाझा पट्टीत हिंसाचार

इस्त्राइल, पॅलेस्टाईन, सीरिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, हल्ल्याचं चित्र
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाईन कट्टरतावाद्यांच्या कमांडरला ठार झाल्यानंतर कट्टरतावाद्यांनी रॉकेट्सनी जोरदार प्रतिहल्ला केला. इस्त्रायलने यानंतर गाझा पट्टीत नव्याने हल्ले केले आहेत.

पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद (PIJ) गटाच्या अतिरेक्यांच्या तळांवर हवाई हल्ला आणि जमिनीवरून हल्ला करण्यात आल्याचं इस्रायलने म्हटलंय. प्रतिहल्ल्यांमध्ये इस्रायलच्या सैन्यावर 150पेक्षा जास्त रॉकेट्सचा मारा करण्यात आला.

पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहादचा म्होरक्या बाहा अबू अल्-अता मारला गेल्यानंतर हिंसाचारात वाढ झालेली आहे. यामध्ये चार पॅलेस्टिनींचाही मृत्यू झालाय. तर रॉकेट हल्ल्यात एक इस्रायली व्यक्ती जखमी झाल्याचं इस्रायली आरोग्य सेवकांनी सांगितलं.

सध्या काय घडतंय?

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF)ने पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद गटाच्या तळांवर दिवसभर टप्प्याटप्प्याने अनेक हल्ले केले. यामध्ये IDFच्या 'टेरर टनेल' नावाच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या भुयाराचा वापर करत इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्याचा PIJचा बेत होता असं सांगण्यात येतंय.

याशिवाय या दहशतवादी गटाचे ट्रेनिंग कँप, हत्यारांचे कारखाने आणि गोदामांवरही हल्ला करण्यात आला.

गाझाच्या उत्तरेकडे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तीन पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय.

इस्त्राइल, पॅलेस्टाईन, सीरिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अबू अल आताच्या मृत्यूचा बदला घ्या असे आदेश देण्यात आले आहेत.

तर अतिरेक्यांनी पहाटेपासून सुरू केलेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये देशभरामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट देणाऱ्या सायरनचा आवाज घुमत होता.

हजारो इस्रायली नागरिकांनी बॉम्ब-प्रूफ खोल्यांमध्ये आसरा घेतला असून शाळा आणि उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. रॉकेट हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत जखमी झालेल्या काही डझन इस्रायली नागरिकांवर उपचार करण्यात येत आहेत. तर साधारण 30 जण इस्रायलने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्यम मंत्रालयाने म्हटलंय.

हिंसाचार का वाढला?

गाझामधल्या पूर्व शेजैया भागातल्या एका इमारतीवर मंगळवारी पहाटे इस्रायलने एक सर्जिकल स्ट्राईक करत बाहा अबू अल्-अता या कट्टरतावाद्याला ठार केलं.

अबू अल्-अता हा एखाद्या 'टिकिंग बाँब' म्हणजेच कधीही फुटू शकणाऱ्या बाँबसारखा होता, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू यांनी म्हटलंय.

इस्त्राइल, पॅलेस्टाईन, सीरिया
फोटो कॅप्शन, नकाशा

पण अबू अल्-अताच्या मृत्यूनंतर दहशतवाद्यांनी जोरदार प्रतिहल्ले सुरू केले. इस्रायलवर होणाऱ्या अनेक रॉकेट हल्ल्यांसाठी हे अतिरेकीच जबाबदार असल्याचं न्येतन्याहू यांनी म्हटलंय.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू यांनी म्हटलंय, "जर कुणाला असं वाटत असेल की ते आमच्या नागरिकांवर हल्ला करून पळून जाऊ शकतात, तर तसं होणार नाही. दहशतवादी जिथे कुठे लपले असतील तिथे आम्ही सर्जिकल स्ट्राईक करू शकतो हे आम्ही सिद्ध केलंय."

तर इस्रायलने मर्यादा ओलांडल्याचं गाझातल्या पॅलेस्टिनी गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलंय.

अबू अल्-अताच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी PIJचा नेता खालिद अल्-बताश याने एका जाहीरनाम्याद्वारे युद्ध सुरू झाल्याचं जाहीर केलं होतं.

इस्रायल हादरून जाईल अशा प्रकारे बाहा अबू अल्-अताच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं या अतिरेकी गटाने म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)