नायजेरियातलं 'टॉर्चर हाऊस'मध्ये नेमकं काय घडलं?

साखळदंड

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

लोखंडी साखळदंड... एक टोक हाताला बांधलं आहे तर दुसरं पायाला. या साखळदंडांनी बांधलेल्या हातात आहेत मोठ-मोठ्या गाड्यांचे टायर. या टायरचे रबर काढून फक्त त्यातला लोखंडी भाग राहिला आहे.

हे टायर वजनाला इतके जड आहेत की खाली ठेवले तर चालण्यासाठी पाय उचलता येत नाही आणि हातात धरून चालायचं म्हटलं तर फार वेळ उचलताही येत नाही.

नायजेरितालं हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्यं तेव्हा उघड झालं जेव्हा तिथल्या काडुना शहरातल्या पोलिसांनी एका इमारतीत छापा टाकून तिथे कैद करून ठेवलेल्या 500 पुरूष आणि मुलांची सुटका केली.

बंदी बनवून ठेवलेल्या या पुरुष आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि अतोनात छळ व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हीडिओ कॅप्शन, नायजेरियातील 'यातना गृहा'तून 500 जणांची सुटका

या इमारतीत मदरसा चालतो, असा समज होता. मात्र, पोलीस कारवाईनंतर तिथून अगदी पाच वर्षांच्या मुलांचीही सुटका करण्यात आली आहे.

काडुनाचे मुख्य पोलीस अधिकारी अली जंग यांनी बीबीसीला सांगितलं की या इमारतीत संशयास्पद कारवाया चालत असल्याची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

नागरिकांवरील अत्याचार

फोटो स्रोत, Reuters

पोलिसांनी या इमारतीला 'टॉर्चर हाऊस' आणि 'गुलामगिरीचा अड्डा' म्हटलं आहे.

छाप्यानंतर 8 संशितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांपैकी बहुतांश शिक्षक आहेत.

सुटका केलेल्यांपैकी अनेकजण उपासमारीच्या उंबरठ्यावर होते. तर काहींच्या शरीरावर जखमांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

वर्षानुवर्ष सुरू होतं शोषण

काहींनी सांगितलं की ते अनेक वर्षांपासून या इमारतीत राहत होते आणि त्यांचं सर्व प्रकारचं शोषण व्हायचं.

काही मुलांनी सांगितलं की त्यांचे पालकच त्यांना इथे घेऊन आले होते. त्यांना वाटायचं की या इमारतीत कुराण शिकवतात.

नागरिकांवरील अत्याचार

फोटो स्रोत, Reuters

दोन मुलांनी सांगितलं की ते बुर्किना फासोचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या आई-वडिलांनीच त्यांना इथे आणलं. तर इतर मुलं नायजेरियातलीच असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या भागात इस्लामिक शाळांचं प्रस्थ आहे. मात्र, या शाळांमध्ये मुलांचं शोषण होतं, असे आरोप यापूर्वीही व्हायचे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)