You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची ओळख 7 मुद्द्यांमध्ये
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधीवर (IMF) प्रमुख अर्थशास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. गोपीनाथ या भारतीय वंशाच्या आहेत. IMFने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
गोपीनाथ हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी इंटरनॅशनल फायनान्स आणि मायक्रोइकॉनिम्समध्ये संशोधन केलं आहे.
IMFच्या प्रमुख क्रिस्टिन लिगार्ड म्हणाल्या, "गीता जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव तर आहेच शिवाय त्यांची बौद्धिक क्षमता आणि या विषयातील ज्ञान उत्तम आहे."
1. या पदावर पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
2. गीता यांचा जन्म केरळमधील आहे. केरळ सरकारने गेल्या वर्षी गीता यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सरकारमधील काही लोक नाराजही झाले होते.
3. गीता अमेरिकन इकॉनिमिक्स रिव्ह्यूच्या सहसंपादक आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनिमिक रिसर्चमध्ये इंटरनॅशनल फायनान्स आणि मायक्रोइकॉनॉमिक्सच्या सहसंचालक आहेत.
4. गीता यांनी व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट, नाणेधोरण, कर्ज आणि विकसनशील बाजारांच्या समस्या अशा विषयांवर 40 रिसर्चपेपर लिहिले आहेत.
2001 ते 2005पर्यंत त्या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यपक होत्या. त्यानंतर त्यांची नियुक्ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून झाली.
5. 2010मध्ये त्या या युनिव्हर्सिटीत प्राध्यापक झाल्या त्यानंतर इंटरनॅशनल स्टडीज अँड इकॉनिमक्स या विषयाच्या त्या प्राध्यापक झाल्या.
6. गीता यांचं पदवीपर्यंतच शिक्षण भारतात झालेलं आहे. 1992ला त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अर्थशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला गेल्या.
7. 1996 ते 2001 या काळात त्यांनी प्रिंसटन युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)