तैवान : झोपलेल्या शहरावर भूकंपाचा घाला

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान
Published

तैवानमधल्या हुआलीन शहरात झालेल्या भूकंपाने मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे शंभरहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं तैवान प्रशासनानं सांगितलं.

Taipei

स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या छायाचित्रांद्वारे इमारतींचं मोठ्य़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान
फोटो कॅप्शन, भूकंपामुळे तैवानमध्ये इमारतींचं नुकसान झालं आहे.

हुआलीन शहरातील एका हॉटेल खचलं असून, यामध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं.

दहा मजल्यांच्या मार्शेल हॉटेलच्या बेसमेंट आणि तळमजल्यावर तीनजण अडकल्याची शक्यता आहे.

हॉटेलमध्ये माणसं अडकली आहेत हे बाहेरून समजतं आहे. अनेक खोल्यांमधले दिवे सुरू आहेत. आत अडकलेले नागरिक मोबाइल लाइटच्या माध्यमातून सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला सूचित करत आहे, असं एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं.

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान
फोटो कॅप्शन, भूकंपामुळे हुआलीन शहरातील एक हॉटेल खचलं आहे.

हुआलीन शहरातील आपातकालीन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध इमारतींमध्ये अडकलेल्या 28 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान

मदतीसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आल्याचं या विभागाने स्पष्ट केलं. या भूकंपामुळे हायवे आणि पुलांचं नुकसान झाल्यानं रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तैवानच्या भौगोलिक स्थितीनुसार भूगर्भात दोन प्रतलांचं एकमेकांत घर्षण होत असल्याने वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)