You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांची संशयास्पद हत्या, घरातच आढळला मृतदेह
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांचा मृतदेह त्यांच्या घरातच आढळून आला आहे.
धारदार शस्त्राने गळा कापून त्यांची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मते, हेमंत लोहिया यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत मिळाला आहे. त्यांच्या घरी काम करणारा नोकर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हत्येचं कारण अजूनही समजलं नाहीये.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा
आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांना दोन महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या तुरूंग विभागाचे नवीन महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. ते शहराच्या बाहेर उदयवाला इथं राहत होते.
हेमंत लोहिया यांच्या हत्येनं पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे.
कारण, ही हत्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यापूर्वी झाली आहे. त्यामुळेच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)