सुपरटेक नोएडा : 32 मजली ट्विन टॉवर 12 सेकंदात कसे कोसळले? पाहा या 10 फोटोंमधून..

दिल्लीजवळच्या नोएडा येथे अनधिकृतरित्या बांधलेल्या दोन गगनचुंबी इमारती स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आज (रविवार 28 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता या इमारतींचं पाडकाम करण्यात आलं. यादरम्यान केवळ 12 सेकंदांत ट्विन टॉवरचं होत्याचं नव्हतं झालं. या पाडकामाची क्षणचित्रे आपण पुढील 10 फोटोंमधून पाहूयात -

दिल्लीजवळच्या नोएडा येथील सेक्टर 93A परिसरातील हे वादग्रस्त ट्विन टॉवर होते. पाडकामानंतर देशात पाडण्यात आलेल्या सर्वात उंच इमारती म्हणून या इमारतींची ओळख कायम राहील.

इमारत बांधताना नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे दोन्ही इमारती पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली.

या दोन्ही इमारती सुपरटेक बिल्डर्सने बनवल्या होत्या. त्यांना अपेक्स आणि सेयान असं नाव देण्यात आलं होतं.

दोन्ही इमारतींची उंची 320 फूटांपेक्षाही जास्त होती. नोएडातील घनदाट लोकवस्तीच्या परिसरात या इमारती होत्या.

इमारतीचं पाडकाम करण्याचं कंत्राट एडिफिस कंपनीला देण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या कामासाठी 3 हजार 700 किलो दारूगोळ्याचा वापर करण्यात आला.

सुरक्षेच्या कारणास्तव इमारतींच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना पाडकामापूर्वीच घर रिकामं करण्यास सांगण्यात आलं होतं.

नोएडा ऑथरिटीच्या माहितीनुसार, ट्विन टॉवर पाडल्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून परिसरात रस्ते, फुटपाथ, झाडे यांच्यावरील धूळ साफ करण्यासाठी 100 पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच 6 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन आणि 200 सफाई कामगारांनाही तैनात करण्यात आलं आहे.

इमारतीचं पाडकाम सुरू असताना जवळच असलेल्या नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवरील वाहतूक थांबवण्यात आली होती.
इमारती पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे धुळीचे प्रचंड लोट उडाले. रस्त्यावर पसरलेली धूळ हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























